दिनांक 16/ 2/ 2020 रोजी सायंकाळी 7:00 ते रात्री 9:00 या वेळेमध्ये अहमदनगर शहरातील सिद्धार्थ नगर, म्युनिसिपल कॉलनी परिसरात NRC,NPR,CAA या गरीब विरोधी विभाजन कारी कायद्याबद्दल नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी जनजागृतीपर अभियान चालविले. यावेळी परिसरात ठिक-ठिकाणी चौक सभा घेऊन या कायद्याबद्दल उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच या कायद्याअंतर्गत होणार्या सर्वे ला विरोध करण्याबद्दल सांगण्यात आले. तसेच सायं. 5:00 ते रात्री 9:00 या वेळेत अहमदनगर येथील फकीर वाडा, रहेमानिया कॉलनी या ठिकाणी अहमदनगर शाहीन बाग सूरू झाला असून काल (दि.16) पासून या आंदोलनास सुरुवात झाली अाहे. आणखी दोन दिवस 16,17 फेब्रुवारीस हे आंदोलन चालणार असून या शाहीन बागेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी या सभांना मोठा प्रतिसाद देत आम्ही कागद नाही दाखवणार अशी घोषणा केली. #anticaanrcnpr#antinrc#antinpr#fascism#antifascism#campaign#campaignagainstcaanrcnpr#ahmadnagar#nbs#youthagainstfascism#youngindia #naubhas
जाती-धर्म में नही बटेंगे,मिलजूल कर संघर्ष करेंगे।
