उद्योगपतींना पुन्हा कर्जमाफी ! 68000 कोटींचा फायदा !

मोदी सरकार आपल्या मालकांपुढे नतमस्तक!
कोरोनाच्या साथीत जनता होरपळत असताना पुन्हा समोर आले कडू सत्य!
मेहनत करणाऱ्यांनो, समजून घ्या की मोदी सरकार कोणाचे सरकार आहे, मिडीया कोणाच्या ताब्यात आहे , देशाचे चालविते धनी कोण आहेत!
भारताच्या रिझर्व बॅंकेने पुन्हा एकदा उद्योगपतींना भली मोठी कर्जमाफी यादी जाहीर केली आहे. आरटीआय खाली केलेल्या अर्जात ही माहिती त्यांना नाईलाजाने द्यावी लागली. तब्बल 68,000 कोटी रुपयांची कर्जमाफी 50 उद्योगांना जाहीर झाली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सतत *उद्योगपतींनी जनतेच्याच पैशातून आपले उद्योगधंदे उभे केले, नफा मात्र स्वत:च्या खिशात ते घालत होते.* यावर वरताण म्हणजे सतत विविध सरकारांनी सतत त्यांची कर्जे माफ करण्याचे काम केले आहे. *कॉंग्रेसने कधी हात आखडता घेतला नाहीच आणि भाजप सरकारांनीही नाही*. अशा बाततीत *मोदी तर ‘कार्यक्षम’ आहेतच, त्यामुळे कर्जमाफी करण्याच्या कामामध्ये त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन पुन्हा उद्योगपतींना फायदा पोहोचवला आहे.*
माफी मिळणाऱ्या उद्योगांमध्ये *विदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या आणि मेहूल चौक्शी* यांचाही समावेश आहे. *नरेंद्र मोदींनी एका भाषणात ज्याला ‘मेहुल भाई’ म्हटले होते* आणि हजारो कोटींचे कर्ज बुडवून जो विदेशामध्ये जाऊन सध्या ऐयाशी मध्ये रहात आहे, त्या मेहुल चोक्शी च्या गीतांजली जेम्स कंपनीला 5,492 कोटी रुपयांची, चोक्शीच्याच गिली इंडिया कंपनीला 1,447 कोटींची व नक्षल डायमंड कंपनीला 1,109 कोटींची कर्जमाफी दिली गेली आहे. म्हणजे या मोदींच्या *मेहुल भाई चोक्शीला एकून 8,048 कोटींची कर्जमाफी* मिळाली आहे. दारुसम्राट *मल्ल्याच्या कंपनीला 1,943* कोटी रुपयांची कर्जमाफी दिली गेली आहे.
झुनझुनवाला बंधूंची आरइआय अॅग्रोचे 4,314 कोटी रुपये तर विनसम डायमंडसचे 4,076 कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. आरइआय अॅग्रोची सक्तवसुली संचालनालयाकडून आणि विनसम डायमंडसची सीबीआय कडूनही चौकशी चालू आहे. आणि विक्रम कोठारींच्या रोटोमॅक ग्लोबलचे 2,850 कोटी माफ केले आहेत. लक्षात घ्या की या राहुल कोठारीला आणि त्याच्या मुलाला सीबीआयने बॅंकाचे कर्ज बुडवले म्हणून अटक केली होती. याशिवाय क्युडोस केमीकलचे 2,326 कोटी, झूम डेव्हलपर्सचे 2,012 कोटी रुपये याप्रमाणे इतर कंपन्यांची कर्जेही माफ करण्यात आली आहेत. फॉरएव्हर प्रेशियस ज्वेलरी अँड डायमंडसचे 1.962 कोटी, डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्जचे 1,915 कोटी रुपये कर्ज माफ करण्यात आले आहे.
एवढेच नाही तर *हिंदुत्ववाद्यांच्या गळ्य़ातले ताईत असलेले उद्योगपती (साधू नाही, उद्योगपती)*, आणि देशसेवेच्या नावाने उद्योगसाम्राज्य उभे करणारे *रामदेव बाबा* यांच्या पतंजली उद्योगातील रुची सोया कंपनीला पण *2,212 कोटी रुपये कर्जमाफी* दिली आहे!
विचार करा, *या लोकांना का दिली जाते सतत कर्जमाफी?* कोरोनामुळे सुद्धा मध्यमवर्गाला कर्जाचे हप्ते माफ झालेले नाहीत (फक्त पुढे ढकलले आहेत!). तुम्ही जर गाडी, घर इत्यादीचे कर्ज घेतले आणि हप्ते थकवले तर लागलीच *जप्ती आणली जाते आणि तुम्हाला-आम्हाला रस्त्यावर आणले जाते.* पण जनतेच्या पैशातून मजा मारणाऱ्या, जनतेच्याच पैशातून उद्योग चालवणाऱ्या या *उद्योगपतींनी कर्ज बुडवले तरी ते विदेशात जाऊन ऐयाशीत जगतात आणि त्यांची कर्जे चक्क माफ केली जातात !* याचे कारण आहे की वरवर भांडणारे आणि एकमेकांचे दिखाव्याचे उणे-दुणे काढणारे *भाजप-कॉंग्रेस सारखे भांडवली पक्ष हेच उद्योगपती पोसत असतात !* सत्ता मिळवण्यासाठी उद्योगपती-बिल्डरांच्या पैशांतून पक्ष पोसले जातात, आणि म्हणूनच सत्तेमध्ये आले की हे पक्ष उद्योगपतींचे हित पाहतात. *ध्यान्यात घ्या की कर्ज माफ करू शकणारे सरकार, जेव्हा जनतेला शिक्षण, औषध, घर अशा जीवनावश्यक गरजांसाठी पैसा नाही असे म्हणत असते तेव्हा ते धादांत खोटं बोलत असते!*
सामान्य काळातही रात्रंदिवस काबाडकष्ट करूनही घर चालवत येत नाही अशी मेहनत करणाऱ्यांची एकीकडे स्थिती आहे. *दुसरीकडे कोरोना मुळे * जनतेची दैन्यावस्था झाली आहे, *भुकेने लोक मरत आहेत*, कोट्यवधी प्रवासी कामगार अडकून पडले आहेत, काम नसल्यामुळे उत्पन्न ठप्प आहे, अर्थव्यवस्था कोसळलेली आहे, जनता हवालदील झालेली आहे. पण सरकारला काळजी पडलेली आहे उद्योगपतींच्या नफ्याची ! हे सगळे होत असताना मीडिया मात्र जनतेमध्ये खोट्या बातम्या पसरवून हिंदु-मुस्लिम तेढ निर्माण करून खऱ्या मुद्यांपासून लक्ष भरकटवण्याचे काम करत आहे. याचे कारण आहे की *मीडीया सुद्धा एक धंदा आहे आणि बहुसंख्य बातम्यांचे चॅनेल याच उद्योगपती वर्गाकडून चालवले जातात. कोणत्या बातम्या द्यायच्या, कोणत्या बातम्या लपवायच्या, कोणत्या बातम्यांवर जोर द्यायचा, कशावर चर्चा घडवायची, चर्चेला दिशा कोणती द्यायची याचे सर्व निर्णय चॅनेलचे मालक घेतात, पत्रकार किंवा संपादक नाही.* म्हणूनच आपल्या जीवनाला प्रभावित करणाऱ्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नांवर मीडीया गप्प असतो, पण जातीय-धार्मिक तणाव भडकावण्याचे काम तो व्यवस्थितपणे करतो. या देशाचे खरे चालविते धनी देशातील उद्योगपती वर्ग आहे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे!
एकजूट व्हा, आणि मागणी करा की या सर्व उद्योगपतींचे कर्ज माफ नाही तर यांच्या *उद्योगांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे*, *जनतेची संपत्ती जनतेच्या ताब्यात आली पाहिजे!*

Related posts

Leave a Comment

three × four =