ह्याच मदतकार्याअंतर्गत कात्रज मधील सर्व्हे क्र ६२ येथील प्रवासी कामगारांसोबत २१ दिवसांपासून सामुदायिक किचन चालवले जात आहे. किचन १७ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले होते. एकतेच्या भावनेतून जनतेकडून मिळालेल्या सहयोगाच्या बळावरच किचन ३ आठवडे सतत चालू आहे. जनतेची कामगारवर्गाशी एकजूट हीच कोरोनामुळे आणि त्यानंतरच्या दुर्व्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्याची वाट आहे. हे किचन कार्यकर्त्यांच्या आणि कामगारांच्या सामूहिक श्रमातून चालवले जाते. सोबतच कामगारांनी राशन व निधी रूपाने देखील सहयोग दिलेला आहे. किचन सर्वार्थाने सामुदायिक पद्धतीने सुरु आहे.
किचन मध्ये काम करताना सर्व कार्यकर्त्यांकडून व कामगारांकडून योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेतली जाते. वारंवार सॅनिटायझरचा वापर केला जातो व शारीरिक अंतर देखील पाळले जाते.
लॉकडाऊन संपेपर्यंत व लॉकडाऊन संपल्यानंतरही कामगारांना काम मिळेपर्यंत किचन चालू ठेवणे गरजेचे आहे.
