निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध! गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या ! फॅसिस्ट गुंडागर्दी नाही चालणार! आज 9 फेब्रुवारी 2024 रोजी “निर्भय बनो”च्या कार्यक्रमात भाषण द्यायला येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हला केला. या अगोदर पुण्यामध्ये “निर्भय बनो”ची सभा होऊ देणार नाही अशी धमकी भाजप पुणे शहर अध्यक्षांनी दिली होती. पोलिसांना याची सगळी कल्पना असतानाही हा हल्ला झाला. भाजपचे गुंडे पूर्ण तयारीनिशी काठ्या, मोठे दगड घेऊन आले होते आणि त्यांनी हल्ला केला.अजूनसुद्धा भाजपाच्या गुंडांना अटक करण्यात आलेली नाहीये. एकीकडे शांततेच्या मार्गाने होत असलेल्या आंदोलनांना पोलिस परवानगी…
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी इकडे आड तिकडे विहीर!! तलाठी भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई झालीच पाहिजे!
बेरोजगारीचा फास दिवसेंदिवस आणखी आवळला जात असताना, हजारो तरुण व विद्यार्थी तणाव व भविष्याच्या असुरक्षिततेपायी आत्महत्येला जवळ करत असताना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ई. विविध पक्षांची भांडवली सरकारे मात्र त्यांच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट मित्रांना, उद्योगपतींना सवलती देण्यात मग्न आहेत. हे सर्व पक्ष दिखाव्यापुरते अशा मुद्यांवर आंदोलने करतात, परंतु या सर्वांनी सत्तेत असताना हीच धोरणे राबवली आहेत, कारण त्यांच्या बोलवत्या धन्यांची म्हणजे भांडवलदार वर्गाची तीच इच्छा आहे. त्यांच्या फायद्यासाठी कंत्राटीकरण, खाजगीकरण पुढे रेटले जात आहे आणि कोट्यवधी तरुणांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना धरून आहे. पण हे आंदोलन फक्त तलाठी भरतीमधील घोट्याळ्यापुरते मर्यादित नसले पाहिजे. सध्या वाढत असलेली बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे प्रश्न आज सर्वच तरुणांसमोर आ वासून उभे आहेत. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक करत सर्व विद्यार्थी तरुणांनी आज एकत्र येणे गरजेचे आहे. मालक वर्गासाठी चालत असलेल्या या भांडवली सत्तेचे खरे चरित्र ओळखणे आज विद्यार्थी युवकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आपले खरे हित लक्षात घेऊन जाती-धर्माचे सगळे भेद बाजूला सारत विद्यार्थी-युवकांनी आज सर्वांसाठी शिक्षण व रोजगाराच्या अधिकाराच्या योग्य मागणीभोवती संघटित होणे आज काळाची गरज आहे, अन्यथा विद्यार्थी तरुणांचे जीव भांडवली पक्षांच्या राजकारणाला बळी पडत राहतील.
देशातील युवकांच्या आणि जनतेच्या नावाने एक महत्वाचे आवाहन! – ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ सारख्या पक्षपाती कायद्यांचा विरोध करा!
जनतेचे अधिकार हिसकावण्याचा, विरोधकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचा आणि जनतेचे दमन करण्याचा भाजपचा अजेंडा इथेच थांबणार नाही. उद्या येन-केन प्रकारेण राजकीय विरोधकांना सुद्धा नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र रचल्या जाऊ शकते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. जनतेला शिक्षण-रोजगार-आरोग्य यासारख्या त्यांच्या खऱ्या मुद्द्यांवर संघटित करणाऱ्यांना त्यांचे सर्व कायदेशीर अधिकार हिसकावून तुरुंगात किंवा डिटेन्शन सेंटर (स्थानबद्ध केंद्र) मध्ये टाकून दिल्या जाईल! जनतेचा संघटित विरोधच संघींच्या समाजविघातक कारवायांचे उत्तर असू शकतो, तसेच सर्व तऱ्हेच्या जनविरोधी धोरणांचा विरोधच आपण जिवंत असल्याचा पुरावा होऊ शकतो.
भगतसिंह – न्यायालय एक थोतांड आहे! (सहा सहकाऱ्यांची घोषणा)
कायदा जोपर्यंत जनतेचे मानस म्हणजे तिच्या भावना प्रकट करतो, तोपर्यंतच कायद्याचे पावित्र्य टिकून राहते. तो जेव्हा शोषक समूहांच्या हातातला कागदाचा कपटा बनून जातो, तेव्हा त्याचे पावित्र्य आणि महत्त्व तो हरवून बसतो. न्याय द्यायचा तर प्रत्येक प्रकारच्या लाभांचा आणि हितसंबंधांचा खातमा करणे ही मूलभूत गोष्ट आहे. कायदा जसजसा सामाजिक गरजा भागवणे बंद करत जातो; तसतसा तो जुलूम आणि अन्याय वाढवण्याचे हत्यार बनत जातो. असे कायदे चालू ठेवणे याचा म्हणजे सार्वजनिक हितावर विशेष हितसंबंधांची ढोंगी जबरदस्ती आहे, दुसरे काहीही नाही,
अय्यंकाली जयंती – महान अय्यंकाली यांच्या वारशाला लक्षात ठेवा! क्रांतिकारी जातिअंताच्या आंदोलनाला पुढे न्या!
अनेक जाती विरोधी व्यक्तीत्वांना खुद्द भारत सरकारनेच स्वातंत्र्यानंतर प्रचारित-प्रसारित केले आहे, पण अय्यंकालींना नाही. का? कारण अय्यंकाली मुलगामी पद्धतीने आणि झुंझार पद्धतीने रस्त्यांवर उतरून संघर्षांचा रस्ता स्विकारत होते, कारण अय्यंकाली सरकारच्या सदिच्छेवर किंवा समजदारीवर भरवसा करत नव्हते, उलट जनतेच्या पुढाकारावर भरवसा करत होते. सत्ताधारी वर्ग सुद्धा त्यांच्या जीवनकार्याच्या या बाजूवर गप्प बसून असतो आणि फक्त पूजा आणि सन्मानाच्या गप्पा करतो, कारण जर कष्टकरी दलित आणि दडपलेली जनता त्यांच्याबद्दल जाणेल, तर त्यांच्या मार्गाबद्दलही जाणेल आणि हे सध्याच्या भांडवली आणि जातीयवादी सत्तेला कधीच मान्य नसेल की त्यांच्या विरोधात मुलगामी संघर्षांच्या रस्त्याने जनतेने जावे आणि स्वत:च्या पुढाकारावर भरवसा निर्माण करावा. हेच कारण आहे की अय्यंकालींच्या वारशाला जनतेच्या शक्तीने लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या स्मृतींना प्रगतीशील शक्तींनी जिवंत ठेवले पाहिजे. त्यांच्या आंदोलनाच्या रस्त्याला व्यापक कष्टकरी आणि दलित जनतेमध्ये आपल्याला घेऊन जावे लागेल.
क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या १११ व्या जयंती निमित्त
राजगुरू यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे स्वप्न एक शोषणमुक्त, समतामूलक, धर्मनिरपेक्ष, समाजाचे निर्माण करणे हे होते. पुढे चालून एका निश्चित वैचारिक विकासानंतर आपले ध्येय स्पष्टपणे आपल्या संघटनेच्या नावात असायला पाहिजे. त्यामुळे ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेच्या नावात बदल करत सोशलिस्ट (समाजवाद) शब्द या सर्व क्रांतिकारकांनी जोडला आणि या क्रांतिकारी संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ म्हणजे एच.एस.आर.ए. (HSRA) असे ठेवण्यात आले. फक्त स्वतंत्र नाही तर नफ्या-तोट्यावर आधारित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन, कामगार वर्गीय सत्तेचे निर्माण, म्हणजेच ‘क्रांती’ हे त्यांचे ध्येय होते.
झुंजार जनएकजूट अभियान – गरीबी, शिक्षणाचा अभाव ,बेरोजगारीच्या कारणांना ओळखा!
शहिदे आजम भगतसिंह यांनी म्हटले होते की सामान्य गरीब कष्टकरी जनतेचा एकच धर्म असतो – वर्गीय एकजूट! आपल्याला सर्व प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना नाकारावे लागेल आणि त्यांच्या विरोधात लढावे लागेल. आपल्याला शपथ घ्यावी लागेल की आपण आपल्या गल्लीबोळात, मोहल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना सांप्रदायिक उन्माद भडकवू देणार नाही आणि त्यांना पिटाळून लावू!
सावित्रीबाई फुले जयंती – नव्या ज्ञानबंदीच्या विरोधात, सर्वांना मोफत शिक्षणासाठी, कटिबध्द होऊयात…!
सावित्रीबाई स्वतःच्या प्रयत्नातून साक्षर झाल्या, पुढे शिक्षकही झाल्या. सामाजिक प्रश्नांबाबत तर त्यांनी अतिशय क्रांतिकारी भूमिका घेतल्याच, पण जोतिराव फुलेच्या मृत्यूनंतर मागे हटल्या नाहीत, तर अंतिम श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहिल्या आणि शेवटीसुद्धा पुण्यातल्या प्लेगच्या साथीत लोकांची सेवा करतानाच त्यांना मरण आले. त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याला दिशा विद्यार्थी संघटना क्रांतिकारी अभिवादन करत आहे व सर्वांना मोफत शिक्षण-सर्वांना काम मिळवण्याच्या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
शहीद भगतसिंहाच्या जन्मदिवसा (28 सप्टेंबर) निमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान
स्वातंत्र्याच्या ज्या रोपट्याला भगतसिंहांसारखा महान शहीदांनी आपल्या रक्ताने शिपलं होतं ते सुकू लागले आहे. या शहीदांची स्वप्ने आमच्या डोळ्यात डोकावत आहेत. चला, या शहीदांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याच्या संघर्षात प्राणपणाने सामील होऊयात. हे पत्रक केवळ नौजवान भारत सभेचा परिचय नाही, तर आवाहन आहे कि तुम्ही नौजवान भारत सभेचे सदस्य बना आणि भगतसिंहांच्या विचारांना पुढे न्या.
कोणीच वाचणार नाही
काय नोटबंदीमुळे मृत्यू होताना जात धर्म विचारला होता काय? जीएसटी लागू झाल्यानंतर जेवढे उद्योग बरबाद झाले आणि त्यामुळे कितीतरी लोक मजबुर होऊन रस्त्यावर आलेत त्यात किती हिंदू होते? मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे देशात जी हलाखी पसरली आहे तीने हिंदू-मुस्लिम भेद नाही केला! परंतु जेव्हा मत घ्यायची वेळ येते तेव्हा हिंदू-मुस्लिम विभाजन पद्धतशीरपणे केले जाते.