देशातील युवकांच्या आणि जनतेच्या नावाने एक महत्वाचे आवाहन! – ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ सारख्या पक्षपाती कायद्यांचा विरोध करा!

जनतेचे अधिकार हिसकावण्याचा, विरोधकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचा आणि जनतेचे दमन करण्याचा भाजपचा अजेंडा इथेच थांबणार नाही. उद्या येन-केन प्रकारेण राजकीय विरोधकांना सुद्धा नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र रचल्या जाऊ शकते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. जनतेला शिक्षण-रोजगार-आरोग्य यासारख्या त्यांच्या खऱ्या मुद्द्यांवर संघटित करणाऱ्यांना त्यांचे सर्व कायदेशीर अधिकार हिसकावून तुरुंगात किंवा डिटेन्शन सेंटर (स्थानबद्ध केंद्र) मध्ये टाकून दिल्या जाईल! जनतेचा संघटित विरोधच संघींच्या समाजविघातक कारवायांचे उत्तर असू शकतो, तसेच सर्व तऱ्हेच्या जनविरोधी धोरणांचा विरोधच आपण जिवंत असल्याचा पुरावा होऊ शकतो.

दि. ०९/१२/२०१९ रोजी नागरिकत्व संशोधन विधेयक citizenship amendment bill (CAB) च्या विरोधात गोवंडी (मुंबई) रेल्वे स्टेशनच्या समोर निदर्शने…

IIPS, TISS मधील विद्यार्थी, नौजावन भारत सभाच्या कार्यकर्त्यांसह इतर सहयोगी संघटनांनी या मध्ये सहभाग घेतला होता. ‘नौभास’ कडून अविनाशने म्हणणे मांडत असताना सांगितले की, आज संसदेत या विधायकला मंजुरी देण्यात आली आहे हे सर्व आरएसएस च्या विचारा अंतर्गत करण्यात येत आहे. यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत जे हिंदू, सिख, इसाई, जैन, पारसी जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशावरून भारतात येवून राहत आहेत. त्यांना भारतीय नागरिकत्व दिल जाईल पण, या मध्ये मुस्लिम धर्मियांना जाणीवपूर्वक धर्माच्या आधारावर वगळण्यात आले आहे. काय जे मुस्लिम स्वतःच नागरिकत्व सिध्द करू शकले नाहीत काय त्यांना डीटेन्शन सेंटर…

वाढत्या महिला आत्याचारा च्या घटना च्या विरोधात ” नौजवान भारत सभेने ” केले प्रतीकात्मक पितृसत्ताक व्यवस्थेचे दहन.

वाढत्या महिला आत्याचारा च्या घटना च्या विरोधात ” नौजवान भारत सभेने ” केले प्रतीकात्मक पितृसत्ताक व्यवस्थेचे दहन. अहमदनगर : दि. ८/१२/२०१९ अहमदनगर सहित संपूर्ण देशभरात वाढ झालेल्या महिला विरोधी अपराधाच्या निषेधार्थ प्रतीकात्मक मनुवादी,भांडवली पितृसत्ताक व्यवस्थेचा पुतळा सिद्धार्थनगर भागातील अण्णाभाऊ साठे चौकात सायंकाळी पाच वाजता दहन करण्यात आला.या कार्यक्रमाला विभागातील महिलां सहित नौजवान भारत सभेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नौजवान भारत सभेचे संदीप सकट यांनी हैदराबाद येथील पशुवैद्यक युवती वर झालेल्या बलात्कार व हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला व सोबतच ज्या चार आरोपींना पोलिसांनी चकमकीत वस्तुतः खोट्या…

अत्याचाराच्या विरोधात मानखुर्द मधील महिला रस्त्यावर…

जब तक स्त्रिया तंग रहेंगी, तब तक जारी जंग रहेंगी। पुरुषसत्ताक मानसिकता व स्त्रियांवरील अन्याय – दिनांक ०५/१२/२०१९ रोजी पि एम जी पी कॉलेनी, साठे नगर, ते लल्लुभाई कंपाऊंड संविधान चौक, मानखुर्द (मुंबई) या ठिकाणी प्रियंका रेड्डी यांना न्याय मिळण्यासाठी व महिला विरोधी अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटनाच्या विरोधात मध्ये निषेध रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रलीमध्ये ‘नौजवान भारत सभा’ व इतर सहयोगी संघटनांनी एकत्रित सहभाग घेतला होता

दिनांक ४/१२/२०१९ रोजी साठे नगर, मानखुर्द (मुंबई) मध्ये हैदराबाद येथील २७ वर्षीय महिला डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्या सामूहिक बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ रॅली चे आयोजन करण्यात आले होते

. आज महिलांना दुहेरी गुलामीच्या बंधनात बांधून ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जाचे समजले जाते. एकीकडे महिला पुरुषांची गुलामी करत चूल आणि मुल या चार भिंतीच्या आत जीवन जगत आहेत. तर दुसरीकडे तथाकथित आधुनिक म्हणवली जाणारी भांडवली व्यवस्था वस्तू त्यांना वर्तमानपत्रे, चित्रपट, गाणे, जाहिराती इत्यादी मध्ये एखाद्या विक्रीय वस्तू सारखे सादर करत आहे. दोन्ही बाजूंनी स्त्री स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजातील बरोबरीची घटक म्हणून न स्वीकारता पुरुषांच्या अधिकाराची किंवा उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. हीच स्त्री विरोधी मानसिकता आणि महिलांना उपभोगाची वस्तू बनवून सादर करण्याची मानसिकता पुढे चालून अशा…

दि.२८/११/२०१९ रोजी जाती विरोधी समाजसुधारक, योद्धा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.

दि.२८/११/२०१९ रोजी जाती विरोधी समाजसुधारक, योद्धा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून भारतीय समाजाला लागलेली घान आहे व आज पर्यंत सर्व सत्ताधाऱ्यांनी जातीचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे काम केले व आपली सत्ता टिकवली आहे. तर दुसरीकडे जातीव्यवस्था संपवण्यासाठी अनेक समाजसुधारक व क्रांतिकारी योद्ध्यांनी संघर्ष केला आहे. त्यात जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचे अन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. ‘ब्राम्हणाची आणि इग्रजांची चामडी सोलल्यावर दिसून येते की, दोघांचे देखील रक्त एकच आहे.’ इंग्रजांनी ब्राम्हणी व्यवस्थेला सोबत घेऊन जनतेचे शोषण…

16 नोव्हेंबर रोजी पुण्यात पूरग्रस्तांचे आंदोलन.

हलगर्जी प्रशासनाला हलवले ! शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नौजवान भारत सभा आणि आंबिलओढा परिसर पूरग्रस्त नागरिक संघर्ष समिती, पुणे तर्फे अतिरिक्त नुकसान भरपाई, थकीत असलेली रु. 15,000 ची मदत, पंचनामे, वीज बील माफी, शैक्षणिक सामान भरपाई, उपजीविका नुकसान भरापाइ, घरभाडे, इत्यादी प्रश्नांवर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले गेले. आंबिल ओढा परिसरातील 129 दांडेकर पूल, 130 दांडेकर पूल, 133 दांडेकर पूल, 134 दांडेकर पूल, 214 दांडेकर पूल, आंबेडकर वसाहत, टांगेवाला कॉलनी, राजेंद्रनगर , अण्णाभाऊ साठे वसाह्त, येथील शेकडो नागरिक आजच्या आंदोलनामध्ये सामील झाले होते. यापूर्वी…

अतिरिक्त नुकसान भरपाई करिता विविध वसाहतींमधील नागरिक एकजूट

अतिरिक्त नुकसान भरपाई करिता विविध वसाहतींमधील नागरिक एकजूट दिनांक 3 नोव्हेंबार रोजी आंबिल ओढा (पुणे) परिसरातील *129 दांडेकर पूल, 130 दांडेकर पूल, 133 दांडेकर पूल, 134 दांडेकर पूल, 214 दांडेकर पूल, आंबेडकर वसाहत, टांगेवाला कॉलनी, राजेंद्रनगर , अण्णाभाऊ साठे वसाह्त,* येथील 200 पेक्षा जास्त पूरग्रस्त नागरिकांनी मिळून, नौजवान भारत सभेच्या समन्वयाने एकत्र येऊन, निळू फुले सभागृह (साने गुरुजी शाळा परिसर) येथे आंबिल ओढा पुरग्रस्त नागरिक संघर्ष समिती स्थापन केली आहे. सरकार देऊ करत असलेली रु. *15,000 मदत ही अत्यंत अपुरी आहे* आणि उपजिवीका, जीवनावश्यक वस्तू, रोजगार, घर, मुलांचे शालेय साहित्य,…

आंबिलोढा परिसर पूरग्रस्त आंदोलन अपडेट आज अण्णाभाऊ साठे वसाहत येथे पूरग्रस्त नागरिकांशी चर्चा करण्यात आली व नुकसानीचे व्हिडीओ डॉउमेन्टेशन केले तसेच विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. शासनाने देऊ केलेली रु 15000 मदत अत्यंत कमी आहे अशी संतप्त भावना सर्वांनी व्यक्त केली