दिनांक ४/१२/२०१९ रोजी साठे नगर, मानखुर्द (मुंबई) मध्ये हैदराबाद येथील २७ वर्षीय महिला डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्या सामूहिक बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ रॅली चे आयोजन करण्यात आले होते

.
आज महिलांना दुहेरी गुलामीच्या बंधनात बांधून ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जाचे समजले जाते. एकीकडे महिला पुरुषांची गुलामी करत चूल आणि मुल या चार भिंतीच्या आत जीवन जगत आहेत. तर दुसरीकडे तथाकथित आधुनिक म्हणवली जाणारी भांडवली व्यवस्था वस्तू त्यांना वर्तमानपत्रे, चित्रपट, गाणे, जाहिराती इत्यादी मध्ये एखाद्या विक्रीय वस्तू सारखे सादर करत आहे. दोन्ही बाजूंनी स्त्री स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजातील बरोबरीची घटक म्हणून न स्वीकारता पुरुषांच्या अधिकाराची किंवा उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. हीच स्त्री विरोधी मानसिकता आणि महिलांना उपभोगाची वस्तू बनवून सादर करण्याची मानसिकता पुढे चालून अशा क्रूर अमानवीय अपराधांचे कारण बनत आहे.
अशा बलात्काराच्या घटना या अगोदर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार बीजेपी सरकार सत्तेत आल्यावर २०१४ नंतर यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोबतच चिन्मयानंद आणि कुलदीप सेंगर सारख्या आरोपींना वाचवण्यासाठी खुद सरकार त्यांच्या पाठीशी उभी राहत आहे. तर कठुवा सारख्या ठिकाणी बीजेपी कडून त्यांच्या समर्थनार्थ तिरंगा घेऊन रॅली केल्या जातात. त्यामध्ये बीजेपी ची खुद्द दोन मंत्री सुद्धा सहभागी होतात. आरएसएस, बीजेपी व इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून अशा घटनांचे सांप्रदायिक करून करून आरोपी हिंदू नाही आरोपी मुस्लिम आहे अशा पद्धतीचा खेळ खेळला जात आहे.
स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येताच निरंकुश पुरुषवादी मानसिकता स्त्रियांना पुन्हा घरामध्ये बंद करायला सुरुवात करते. प्राचीन सभ्य नारी बनून राहणे. ड्रेस कोड सारखे फतवे प्रसिद्ध केले जातात. त्यातून स्त्रियांना मिळणारी थोडेफार स्वातंत्र्य सुद्धा अतिशय निर्दयपणे निकालात काढले जाते. खरेतर या उपायांनी प्रश्न सुटणार नाहीत! कारण आज स्त्रियांसाठी ना घर सुरक्षित आहेत. ना रस्ते, ना नोकरी काम करण्याचे ठिकाण!
स्त्रीविरोधी अन्याय – अत्याचार आणि हिंसेला मुळापासून समाप्त करण्यासाठी एक दीर्घ संघर्षाची संघर्ष लढण्याची गरज आहे. हा संघर्ष हजारो वर्षापासून सुरू आहे. पुरुष प्रधान सामाजिक व्यवस्थेला भांडवली व्यवस्थेला नेस्तनाबूत करूनच समानता आणि यावर आधारित सामाजिक व आर्थिक संरचनेचे निर्माण करणे शक्य आहे. आपल्याला या संघर्षाला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रीतीने घेऊनच जावे लागेल.
कार्यक्रमाच्या शेवटी पितृसत्ताक मानसिकतेच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.

Related posts

Leave a Comment

four + four =