दि.२८/११/२०१९ रोजी जाती विरोधी समाजसुधारक, योद्धा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.
जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून भारतीय समाजाला लागलेली घान आहे व आज पर्यंत सर्व सत्ताधाऱ्यांनी जातीचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे काम केले व आपली सत्ता टिकवली आहे.
तर दुसरीकडे जातीव्यवस्था संपवण्यासाठी अनेक समाजसुधारक व क्रांतिकारी योद्ध्यांनी संघर्ष केला आहे. त्यात जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचे अन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. ‘ब्राम्हणाची आणि इग्रजांची चामडी सोलल्यावर दिसून येते की, दोघांचे देखील रक्त एकच आहे.’ इंग्रजांनी ब्राम्हणी व्यवस्थेला सोबत घेऊन जनतेचे शोषण केले व जातिव्यवस्थेच्या कायदेशीर आकार देत कधी नव्हे एवढे मजबूत करण्याचे काम केले. याच दरम्यान वैज्ञानिक, तार्किक शिक्षण देऊन एक स्वतंत्र विचार शक्ती निर्माण करण्याचे काम करत हजारो वर्षाच्या ज्ञानबंधिला फोडण्याचे फुले यांच्या संघर्षाने केले आहे.
आज सुद्धा फासिवादी, धार्मिक ताकती समाजात जाती, धर्माच्या नावाने फूट पाडून कष्टकऱ्यांच्या एकतेला संघटित होण्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा ठरत आहेत. अशामध्ये फुले यांच्या संघर्ष आज देखील जातीविरोधी क्रांतिकारी आंदोलनामध्ये नव्याजोमाने ऊर्जा निर्माण करण्याचे काम करत आहे व यासाठी फुले यांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहील.
चर्चासत्र संपल्यानंतर फुले यांच्या जीवनावर आधारित लघुपट पाहण्यात आला.


