स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन! राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक राजगुरू यांचा आज जन्मदिवस आहे. इंग्रज सत्तेच्या काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील खेड येथे 24 ऑगस्ट 1908 रोजी राजगुरू यांचा जन्म झाला. आज खेड हे राजगुरूंच्या स्मृतीमध्ये राजगुरूनगर म्हणून ओळखले जाते, जे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. शिवराम हरी राजगुरू हे त्यांचे पूर्ण नाव. महाराष्ट्रात जन्माला आलेले राजगुरू तारुण्याच्या सुरूवातीलाच क्रांतिकारक वैशंपायन ह्यांच्या सोबत झालेल्या आकस्मिक भेटीनंतर चंद्रशेखर आझादांच्या संपर्कात आले व त्या काळातील मुख्यतः पंजाब, बंगाल,…
Author: nbs_upload
शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनी पुण्यातील एफ.सी. रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला
शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनी पुण्यातील एफ.सी. रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी गाणी सादर केली आणि जनतेसोबत संवाद साधला. पोस्टर प्रदर्शन लावल्यामुळे नौभासची संक्षिप्त ओळख जनतेला मिळाली. यावेळी विद्यार्थी-तरुणांना नौभासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. शेवटी घोषणा देऊन राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले.
क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला
24 ऑगस्टला सुपर बिबवेवाडी येथे क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात ‘आ रे नौजवान तेरी बेड़ीयाँ रही हैं टूट’ ह्या क्रांतिकारी गीताने झाली. त्यानंतर साथी सुस्मितने शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला. शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव वयाच्या तरुणपणात एका सुंदर समाजाचं स्वप्नं बघत हसत हसत फासावर गेले. भगतसिंहाचे स्वप्न होते की अशी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण होणार नाही, जिथे नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था नसून मानवकेंद्री व्यवस्था असेल. त्यांचे जे स्वप्न आज अधुरे राहिले…
राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात निदर्शने
नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचाच्या वतीने आज पुणे येथे दांडेकर पुलाजवळ राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचारातून इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्याच्या संस्थाबद्ध हत्येविरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी आणि युवक यावेळी आंदोलनात सहभागी झाले. जालोर मध्ये इंद्र हा 9 वर्षाचा शाळकरी मुलगा शाळेत तहान लागली म्हणून एका मडक्यातून पाणी पिला. ते मडके त्याच्या एका जातीयवादी शिक्षकानुसार सवर्णांसाठी राखीव होते. मग जातीयवादी प्रतिक्रियावादी अहंकारातून त्या शिक्षकाने इंद्रला मारहाण केली. या मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीतून त्याला बाहेर आणण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना अनेक आठवडे अनेक हॉस्पिटल्सच्या चकरा माराव्या लागल्या, परंतु हे सर्व…
नौजवान भारत सभा कडून बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना गुजरात सरकारने कैदेतून सोडून दिल्याच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला
आज नौजवान भारत सभा कडून बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना गुजरात सरकारने कैदेतून सोडून दिल्याच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 2002 च्या गुजरात दंगलीच्या वेळी बिल्कीस बानो गर्भवती असताना तिच्यावर 11 जणांनी बलात्कार केला आणि तिच्या 14 कुटुंबीयांना मारून टाकण्यात आले ज्यामध्ये तिची तीन वर्षाची मुलगी सुद्धा होती. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना गुजरात सरकारने त्यांची शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सोडून दिले आहे. इतकेच नाही तर त्यांचे हार, पेढे घालून स्वागत सुद्धा केले. सोडण्या अगोदर सुद्धा यापैकी अनेक गुन्हेगारांना अनेकदा पॅरोलवर सतत बाहेर सोडले जात होते हे सुद्धा समोर आले आहे. सोडण्याच्या…
राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात निदर्शने
नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचाच्या वतीने आज पुणे येथे दांडेकर पुलाजवळ राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचारातून इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्याच्या संस्थाबद्ध हत्येविरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी आणि युवक यावेळी आंदोलनात सहभागी झाले. जालोर मध्ये इंद्र हा 9 वर्षाचा शाळकरी मुलगा शाळेत तहान लागली म्हणून एका मडक्यातून पाणी पिला. ते मडके त्याच्या एका जातीयवादी शिक्षकानुसार सवर्णांसाठी राखीव होते. मग जातीयवादी प्रतिक्रियावादी अहंकारातून त्या शिक्षकाने इंद्रला मारहाण केली. या मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीतून त्याला बाहेर आणण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना अनेक आठवडे अनेक हॉस्पिटल्सच्या चकरा माराव्या लागल्या, परंतु हे सर्व…
नौजवान भारत सभा द्वारा 15 अगस्त “आजादी” के 75वें साल के अवसर पर *आजादी का (अ) मृत महोत्सव* आर्टिकल पढ़ा गया व उस पर परिचर्चा आयोजित की गई।
चर्चा के दौरान बात रखते हुए कहा गया कि एक तरफ तो बेरोजगारी, भुखमरी और अशिक्षा के चलते आम जनता की कमर टूट गई है। आज देश में 30 करोड़ से ज्यादा लोग बेरोजगारी के चलते चप्पलें घिसने को मजबूर है और वही इससे हताश निराश युवा आबादी दिशाहीन होकर नशे के शिकार हो रहे है ,यहां तक की आत्महत्या तक करने को मजबूर है। सुप्रीत ने समाज में बढ़ती असमानता पर बात करते हुए कहा कि आज देश के बड़े बड़े पूंजीपति और धन्नासेठ अडानी, अंबानी, टाटा, बिरला की…
दिनांक 17.08.22 को मानखुर्द के संविधान चौक में अखिल भारतीय जाति विरोधी मंच द्वारा राजस्थान के जालौर में 9 साल के बच्चे इंद्र मेघवाल की जातिगत उत्पीड़न और हत्या के खिलाफ विरोध प्रदर्शन आयोजित किया गया
दिनांक 17.08.22 को मानखुर्द के संविधान चौक में अखिल भारतीय जाति विरोधी मंच द्वारा राजस्थान के जालौर में 9 साल के बच्चे इंद्र मेघवाल की जातिगत उत्पीड़न और हत्या के खिलाफ विरोध प्रदर्शन आयोजित किया गया। प्रदर्शन में नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ति लीग, लोकशाही युवा आघाड़ी, ऑल इंडिया यूथ फैडरेशन एवं अन्य संगठनों ने भाग लिया। नौजवान भारत सभा की तरफ से राहुल ने पिछले कुछ सालों के अनेक जातिवादी उत्पीड़न की घटनाओं का उल्लेख करते हुए कहा कि सरकार चाहती है कि हम जाति, धर्म और नस्ल के…
नौजवान भारत सभेतर्फे चालवण्यात येणाऱ्या फिरत्या वाचनालयात सहभागी व्हा!!
नौजवान भारत सभेतर्फे मानखुर्द – गोवंडी मधील काही वस्त्यांमध्ये फिरते वाचनालय चालवण्यात येते. कष्टकरी वस्त्यांमधील अबाल – वृद्धांपर्यंत भांडवली – चंगळवादी संस्कृती पोहचवण्यासाठी अनेक माध्यमं आहेत, परंतु कामगार – कष्टकऱ्यांचा, सामान्य जनतेचा इतिहास, संवेदनशील मानवी मूल्ये, सांस्कृतिक जडण घडणीचा ठेवा पोहचवण्यासाठी जवळपास काहीच नाही!! अत्यंत गरीब असलेल्या वस्त्यांमधील अशिक्षित, बेरोजगार युवक नशेखोरीच्या आहारी गेलेले दिसतात, खून, भांडणं ही तिथे नित्य नियम बनलेली असतात. तिथे राहणाऱ्या लोकांची घरं आणि संपूर्ण शहराची घाण वाहून नेणारा, बाजूने वाहणारा नाला जणू एकच आहेत अशी परिस्थिती असते! सांडपाण्याच्या गटारांतून पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकलेले असतात, ज्यात…
देवनार पोलिसांनी अटकेत घेतलेल्या एस.एम.एस प्लांट हटाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना त्वरित सोडा!!
गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द – गोवंडीतील हवेत विषारी धूर सोडून हवा प्रदूषित करणाऱ्या एस.एम.एस प्लांट विरोधात शांतता पूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या एस.एम.एस प्लांट हटाव संघर्ष समिती 30 – 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी एस.एम.एस प्लांट च्या गेट समोरून अटक केली आहे ज्यामध्ये नौजवान भारत सभेच्या सदस्यांचा देखील समावेश आहे. ह्या प्रदूषित हवेमुळे मानखुर्द – गोवंडी मधील लहान – मोठ्यांना कॅन्सर, टीबी सारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्याविरोधात आवाज उठवत संघर्ष करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने काल पासून 149 ची नोटीस देण्याचे सत्र सुरू केले होते. तरीही आज मोठ्या संख्येने आंदोलनाच्या ठिकाणी स्थानिक लोक जमा…
