नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी आनंद पटवर्धन दिग्दर्शित Bombay: Our City माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. देशात होणाऱ्या G२० समिट आणि त्याच्या निमित्ताने लपवल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांचे राजकारण समजून घेण्याकरता या माहितीपटाचे स्क्रिनिंग केले गेले होते. झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहण्याऱ्या लोकांचं आयुष्य दर्शविणारा हा माहितीपट आहे. शहरांना चकाचक करणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांना कसे कोंबडीच्या खुराड्यासारख्या घरांमध्ये राहायला मजबूर केले जाते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्या झोपड्यांना सरकारद्वारे तुडवले जाते ते ह्या माहितीपटात दाखविले आहे. मोठमोठाल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या समाजातील तथाकथित उच्चभ्रू लोकं कसे शहरं उभारणाऱ्या कामगार-कष्टकऱ्यांना…
Author: nbs_upload
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “Bombay: Our City / हमारा शहर” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!
नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी आनंद पटवर्धन दिग्दर्शित Bombay: Our City माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. देशात होणाऱ्या G२० समिट आणि त्याच्या निमित्ताने लपवल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांचे राजकारण समजून घेण्याकरता या माहितीपटाचे स्क्रिनिंग केले गेले होते. झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहण्याऱ्या लोकांचं आयुष्य दर्शविणारा हा माहितीपट आहे. शहरांना चकाचक करणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांना कसे कोंबडीच्या खुराड्यासारख्या घरांमध्ये राहायला मजबूर केले जाते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्या झोपड्यांना सरकारद्वारे तुडवले जाते ते ह्या माहितीपटात दाखविले आहे. मोठमोठाल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या समाजातील तथाकथित उच्चभ्रू लोकं कसे शहरं उभारणाऱ्या कामगार-कष्टकऱ्यांना…
नौजवान भारत सभा, मुंबई की तरफ से “छात्र नौजवान नयी शुरुआत कहा से करे?” इस पुस्तिका का सामूहिक अध्ययन और परिचर्चा का आयोजन किया गया
नौजवान भारत सभा, मुंबई की तरफ से “छात्र नौजवान नयी शुरुआत कहा से करे?” इस पुस्तिका का सामूहिक अध्ययन और परिचर्चा का आयोजन किया गया। अध्ययन के शुरुआत में शशिप्रकाश की कविता “अगर तुम युवा हो” का एक अंश पढ़ा गया। पिछले कई महीनों से शहीद भगत सिंह पुस्तकालय, मानखुर्द में नियमित रूप से हर गुरुवार दोपहर 3 से शाम 5 बजे तक नौभास द्वारा सामूहिक अध्ययन चक्र का आयोजन किया जाता है। इसमें शहीद भगत सिंह और अन्य क्रांतिकारियों के लेख, साहित्य और इतिहास से जुड़ी पुस्तकें पढ़ी जाती…
नौजवान भारत सभा (नौभास), मुंबई युनिटच्या वतीने तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालयात सदस्यता अभियान चालवण्यात आले.
देशात वाढती बेरोजगारी, शिक्षणाचा खर्च, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शिक्षणाचे भगवेकरण अशा अनेक ज्वलंत प्रश्नांपासून विचलित करण्यासाठी एक जालीम उपाय म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण पसरवले जात आहे आणि देशातील तरुण अस्मितेच्या राजकारणाला बळी पडत चालले आहेत. या सर्वांच्या विरोधात नौभास द्वारे देशातील विविध राज्यांमध्ये विध्यार्थी आणि तरुणांमध्ये एक मोहीम चालवली जात आहे. त्याच अनुषंगाने, नौभास चे मुंबई युनिट, विविध महाविद्यालयांमध्ये देखील ही मोहीम राबवत आहेत, ज्याद्वारे तरुणांमध्ये ही जाणीव निर्माण केली जात आहे कि ज्या देशाचे स्वप्न भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी पहिले होते त्याच्या अगदी उलट स्थिती आपल्या देशात…
नौजवान भारत सभा (नौभास), मुंबई युनिटच्या वतीने तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालयात सदस्यता अभियान चालवण्यात आले.
देशात वाढती बेरोजगारी, शिक्षणाचा खर्च, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शिक्षणाचे भगवेकरण अशा अनेक ज्वलंत प्रश्नांपासून विचलित करण्यासाठी एक जालीम उपाय म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण पसरवले जात आहे आणि देशातील तरुण अस्मितेच्या राजकारणाला बळी पडत चालले आहेत. या सर्वांच्या विरोधात नौभास द्वारे देशातील विविध राज्यांमध्ये विध्यार्थी आणि तरुणांमध्ये एक मोहीम चालवली जात आहे. त्याच अनुषंगाने, नौभास चे मुंबई युनिट, विविध महाविद्यालयांमध्ये देखील ही मोहीम राबवत आहेत, ज्याद्वारे तरुणांमध्ये ही जाणीव निर्माण केली जात आहे कि ज्या देशाचे स्वप्न भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी पहिले होते त्याच्या अगदी उलट स्थिती आपल्या देशात निर्माण झाली…
जालन्यातील मराठा-आरक्षण आंदोलनाच्या दमनाचा तीव्र निषेध!
युवकांनो-कामगारांनो, मराठा वा इतर कोणत्याच आरक्षणाच्या मृगजळामागे धावू नका; सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगाराच्या मूलभूत अधिकारासाठी संघटित व्हा! मराठा आरक्षणाचे आंदोलन परत पेटू लागले आहे. जालन्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समुदायाला शिक्षणात आणि रोजगारात आरक्षण मिळावे यासाठी तेथील स्थानिक मराठा नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. गेल्या शुक्रवारी आंदोलन सुरु असलेल्या आंतरवाली सराटी या गावात पोलीस पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीमार सुरु केला. त्यानंतर या लाठीमाराच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आले, आंदोलने झाली. सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. उस्मानाबाद येथे बंदला हिंसक वळण लागले. औरंगाबाद येथेही बंद…
नौजवान भारत सभेतर्फे बुधवारी पुण्यातील गुडलक चौक येथे पोस्टर प्रदर्शन लावून ‘देशाला पुढे न्या’ ह्या पथनाट्याचे 4 प्रयोग सादर करण्यात आले
नौजवान भारत सभेतर्फे बुधवारी पुण्यातील गुडलक चौक येथे पोस्टर प्रदर्शन लावून ‘देशाला पुढे न्या’ ह्या पथनाट्याचे 4 प्रयोग सादर करण्यात आले. ‘देशाचा विकास होत आहे म्हणजे नेमका कोणाचा विकास होत आहे’ यावर भाष्य करणाऱ्या या पथनाट्याला उपस्थितांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. पथनाट्य सादर केल्यानांतर पत्रकं वाटून सहयोग सुद्धा गोळा करण्यात आला. पथनाट्यानंतर अनेक तरुण-विद्यार्थ्यांसोबत देशातील आजच्या समस्यांवर चर्चा झाली. भगतसिंहाचा वारसा पुढे चालवण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या नौभाससोबत जोडून घेण्याची अनेकांनी इच्छा दर्शवली. सर्वांना समान, मोफत दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसुविधा, प्रत्येक हाताला काम या योग्य मागण्या असल्याचे आणि यांसाठी तरुणांनी एकत्र येऊन लढण्याची…
जालन्यातील मराठा-आरक्षण आंदोलनाच्या दमनाचा तीव्र निषेध!
युवकांनो-कामगारांनो, मराठा वा इतर कोणत्याच आरक्षणाच्या मृगजळामागे धावू नका; सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगाराच्या मूलभूत अधिकारासाठी संघटित व्हा! ✊✊✊✊✊✊✊✊✊✊ मराठा आरक्षणाचे आंदोलन परत पेटू लागले आहे. जालन्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समुदायाला शिक्षणात आणि रोजगारात आरक्षण मिळावे यासाठी तेथील स्थानिक मराठा नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. गेल्या शुक्रवारी आंदोलन सुरु असलेल्या आंतरवाली सराटी या गावात पोलीस पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीमार सुरु केला. त्यानंतर या लाठीमाराच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आले, आंदोलने झाली. सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. उस्मानाबाद येथे बंदला हिंसक वळण लागले. औरंगाबाद येथेही…
महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जन्मदिनानिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभेतर्फे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटाचे प्रदर्शन आणि चर्चा आयोजित करण्यात आली
महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जन्मदिनानिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभेतर्फे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटाचे प्रदर्शन आणि चर्चा आयोजित करण्यात आली. नागराज मंजुळेंच्या सुरुवातीच्या काळातील सिनेमांमध्ये समाजाचे चित्रण वास्तववादी आहे. ‘फॅंड्री’ चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जातिव्यवस्थेचे विदारक सत्य अचूकपणे समोर ठेवले आहे. चित्रपटामध्ये केलेला प्रतीकांचा वापर अत्यंत समर्पक आहे. ही एका दलित पार्श्वभूमीतून येणाऱ्या, जातिव्यवस्थेने पीडित आणि गरिबीमध्ये वाढणाऱ्या एका शाळकरी मुलाची कहाणी आहे. जातींच्या सीमा ओलांडून केलेले प्रेम, एक सन्मानजनक आयुष्य जगण्याची ओढ, जातिव्यवस्थेचा तिटकारा आणि शेवटी उच्चजातींयांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांना दगड मारत सुटणे अशा अनेक दृश्यांमधून…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे महान जातीविरोधी योद्धा अय्यंकाली यांच्या जन्मदिवसानिमित्त “फॅन्ड्री” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा!!
नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 3 सप्टेंबर रोजी केरळ मधील महान जातीविरोधी योद्धा अय्यंकाली यांच्या जन्मदिवसानिमित्त (28 ऑगस्ट) फॅन्ड्री या मराठी चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. अय्यंकाली यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जातीभेद आणि जातीय अत्याचार, दमन यांविरोधात उभ्या केल्या क्रांतिकारी, लढाऊ संघर्षाला आठवत असताना या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवले होते. चित्रपटात महाराष्ट्रातील पेरापेरात भिनलेल्या क्रूर जातीव्यवस्थेचे, त्यामुळे समाजात पसरलेल्या अन्यायी, अमानवीय विषमतेचे वास्तववादी चित्रण केले आहे. चित्रपटानंतर उपस्थित सर्वांसाठी खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. ज्यात सर्व उपस्थितांनी सहभाग घेत चित्रपटावर आणि अन्याय्य जातीव्यवस्थेबाबत आपले अनुभव सांगितले आणि मते…
