नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे महान जातीविरोधी योद्धा अय्यंकाली यांच्या जन्मदिवसानिमित्त “फॅन्ड्री” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा!!

नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 3 सप्टेंबर रोजी केरळ मधील महान जातीविरोधी योद्धा अय्यंकाली यांच्या जन्मदिवसानिमित्त (28 ऑगस्ट) फॅन्ड्री या मराठी चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. अय्यंकाली यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जातीभेद आणि जातीय अत्याचार, दमन यांविरोधात उभ्या केल्या क्रांतिकारी, लढाऊ संघर्षाला आठवत असताना या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवले होते. चित्रपटात महाराष्ट्रातील पेरापेरात भिनलेल्या क्रूर जातीव्यवस्थेचे, त्यामुळे समाजात पसरलेल्या अन्यायी, अमानवीय विषमतेचे वास्तववादी चित्रण केले आहे. चित्रपटानंतर उपस्थित सर्वांसाठी खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. ज्यात सर्व उपस्थितांनी सहभाग घेत चित्रपटावर आणि अन्याय्य जातीव्यवस्थेबाबत आपले अनुभव सांगितले आणि मते मांडली. देशातील आणि चित्रपटाच्या संदर्भाने महाराष्ट्रतील जाती व्यवस्थेच्या तत्कालीन स्वरुपावर चर्चा करण्यात आली. जातीव्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी अय्यंकालींचा मार्ग एक दिशा दर्शक असून त्या प्रमाणेच संपूर्ण कष्टकरी वर्गाला एकजूट होऊन एक संघटित ताकद उभी करावी लागेल यावर सहभागी सर्वांनी एकमत दर्शविले. चर्चेत प्रज्ञा, सुप्रीथ,आशय, मीरा, रुचिर, संदेश, विवेक, हुजैफ, अब्दुल्ला, साक्षी, हर्ष, जय, राहुल, इमरान आणि शशांक सहभागी होते.
नौभास तर्फे असे अनेक कामं मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागात केले जातात. नौजवान भारत सभेसोबत जोडून घ्या आणि एका समतामूलक समाजाच्या जडणघडणीत आपले योगदान द्या.
संपर्क – 9930095381
जातीवाद हो बर्बाद!
इंकलाब जिंदाबाद!!

Related posts

Leave a Comment

9 + eight =