शहीद–ए–आजम भगतसिंह यांच्या 117 व्या जन्मदिनानिमित्त नौभासच्या वतीने 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान ‘शहीद भगतसिंह स्मृति संकल्प’ अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून नौभास च्या वतीने अ,नगर शहरातील विविध वस्त्यांमध्ये अभियान चालविण्यात येत आहे. ज्यात शहरातील चितळे रोड, गवळीवाडा, तेलिखुंट या भागात क्रांतिकारी गीते व ‘देशाला पुढे घेऊन जा!’ या पथनाट्याचे सादरकरीकरण करण्यात आले, तसेच सोबतच पत्रके वितरीत करण्यात आली. “आज देशामध्ये विकासाचे जे चित्र आपल्यासमोर उभे केले जात आहे. विकासाच्या नावाने काही मूठभर लोकांना फायदा पोहचवण्याचे काम केले जात आहे तर दुसऱ्या बाजूला देशात मोठ्यासंख्येने असणाऱ्या कामगार-कष्टकरी…
Category: Activities
क्रांतिकारी उधमसिंह यांच्या १२५व्या जन्मदिनानिमित्त!
भगतसिंह यांच्या पिढीतील क्रांतिकारकांप्रमाणेच उधमसिंह हे देखील विचारशील क्रांतिकारी होते. भगतसिंहांप्रमाणे उधमसिंह सुध्दा तर्कशील नास्तिक होते. 1930 च्या दशकात राष्ट्रीय राजकारणात साम्प्रदायिकतेच्या वाढत्या प्रभावामुळे ते फार अस्वस्थ आणि चिंतेत राहायचे. लहानपणीच त्यांनी गरिबीच्या कठोर यातना भोगल्या होत्या आणि दलित पार्श्वभूमीतून आल्यामुळे त्यांनी जातीय भेदभाव, अन्याय आणि छळ प्रत्यक्ष अनुभवला होता. या अनुभवांनी उधमसिंह यांना एक कट्टर धर्मनिरपेक्ष आणि जातिव्यवस्थेविरोधी लढणारे क्रांतिकारी बनवले. त्यांचा ठाम विश्वास होता की भारतीय जनता साम्प्रदायिक शक्तींच्या फूट पाडणाऱ्या धोरणांना अपयशी ठरवून आणि जातीय भेदभाव दूर करून जेव्हा मजबूत एकी निर्माण करेल तेव्हाच ती गुलामगिरीच्या बेड्यांमधून…
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : मुंबई, 25 सप्टेंबर 2024
आज जेव्हा आपण देशाच्या परिस्थितीकडे पाहतो तेव्हा एक गंभीर चित्र डोळ्यासमोर दिसते. झपाट्याने वाढणारी बेरोजगारी आणि महागाई, केंद्र आणि राज्य सरकारे, जी “शायनिंग इंडिया” चे खोटे चित्र दाखवत आहेत, त्याचे पितळ उघडे पाडतात. एकीकडे बहुसंख्य लोकसंख्या दर दिवस उदरनिर्वाहासाठी संघर्ष करताना दिसते तर दुसरीकडे, आपल्याला अल्प असा धनाढ्य वर्ग ऐषोआरामात आनंदात जगताना दिसतो. आपण अशा देशात राहतो जिथे एका कुटुंबाकडून लग्नासाठी 5000 कोटी रुपये खर्च केले जातात, तर दररोज 5 वर्षांखालील 4500 मुलं भुकेमुळे मृत्यू पावतात. ही परिस्थिती आपल्याला शहीद भगतसिंह यांच्या लिखाणाची आठवण करून देते, जेव्हा त्यांनी ब्रिटिश सत्ताधीशांच्या…
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : पुणे, 25 सप्टेंबर 2024
28 सप्टेंबर शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त देशभरामध्ये शहीद स्मृती संकल्प अभियान राबविले जात असून त्या अंतर्गत पुस्तक प्रदर्शन, पथनाट्य इत्यादींच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात शहिदांचा वारसा घेऊन जाण्याचे काम नौजवान भारत सभेतर्फे केले जात आहे. पुण्यातील तळजाई, व्हीआयटी कॉलेज चौक इत्यादी ठिकाणी बुकस्टॉलच्या माध्यमातून शहीद क्रांतिकारकांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम याअंतर्गत केले जात आहे. गुडलक चौक, अप्पर वसाहत, जनता वसाहत इत्यादी ठिकाणी “बाईचीच चूक” या पथनाट्याचे प्रयोग करण्यात आले. या नाटकाच्या माध्यमातून महिलांची सुरक्षितता आणि पुरुषसत्ताक समाजव्यवस्था यावर समाजप्रबोधन करण्यात आले. शहीद भगतसिंह यांनी एका समतामुलक समाजाचे स्वप्न बघितले होते, ज्यामध्ये एका…
शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे “बाईचीच चूक” या पथनाट्याचे सादरीकरण
गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या विविध कामगार वस्त्यांमध्ये महिला अत्याचारावर भाष्य करणारे ‘बाईचीच चूक’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. कोलकाताच्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देश हादरून गेला होता. पण ती घटना अपवाद नव्हती. उलट दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे. आज महिला घरी, कामाच्या ठिकाणी आणि समाजात वावरताना कुठेच सुरक्षित नाहीयेत. ही सामाजिक स्थिती हे नाटक दाखवते आणि विचार करायला भाग पाडते. महिलांवरील अत्याचारांकरिता भांडवली पितृसत्ताक मुल्यमान्यता आणि ह्या पितृसत्तेला टिकवणारी आणि पोसणारी भांडवली व्यवस्था कारणीभूत आहे. हा संघर्ष महिला विरुद्ध पुरुष नसून कामगार कष्टकरी महिला आणि पुरुषांच्या…
नौजवान भारत सभेद्वारे शहीद सुखदेव फिरते वाचनालय मानखुर्द गोवंडीतील कष्टकरी वस्त्यांमध्ये नियमितपणे चालू आहे.
नौजवान भारत सभा (नौभास), मुंबई तर्फे मानखुर्द-गोवंडी (मुंबई) च्या अण्णाभाऊ साठे नगर, गौतम नगर आणि रफी नगर येथील वस्त्यांमध्ये नियमितपणे शहीद सुखदेव फिरते वाचनालय चालवले जात आहे. नौभास द्वारे संचालित शहीद भगतसिंह वाचनालयाव्यतिरिक्त फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तरुणांपर्यंत विज्ञान, इतिहास आणि इतर प्रगतिशील आणि क्रांतिकारी साहित्य पोहचवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. आज कामगार कष्टकरी जनता आपले पोट भरण्यासाठी दिवसाचे 10, 12, 14 तास काम करण्यासाठी हतबल आहे आणि त्यासोबत आज सोशल मीडियाच्या वाईट प्रभावामुळे सामान्य जनतेत वाचन संस्कृती लोप पावत…
नौजवान भारत सभा (नौभास) द्वारा आयोजित महान जातीविरोधी योद्धा अय्यंकाली यांच्या जन्मदिनानिमित्त चित्रपट स्क्रिनिंग आणि चर्चासत्र!
मानखुर्द, मुंबईतील शहीद भगतसिंह पुस्तकालयात नौभासच्या वतीने नागराज मंजुळेच्या ‘फँड्री’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आली. अय्यंकाली यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात केरळमध्ये जातीयवादी समाजाविरोधात लढा सुरू केला होता आणि राज्याच्या दडपशाही स्वरूपाला ओळखून जनतेच्या शक्तीवर विश्वास ठेवला होता. ‘फँड्री’ चित्रपट जब्याच्या अपूर्ण स्वप्नांचे दारुण वास्तव सांगताना समाजाच्या प्रत्येक स्तरांत रुजलेल्या क्रूर जातिव्यवस्थेचे चित्रण करतो. ग्रामीण महाराष्ट्रातील समाजाचे विस्तृत चित्रण करत हा चित्रपट भारतात हजारो वर्षांपासून रुजू असलेल्या जातीयवादी मानसिकतेला दर्शवतो. कार्यक्रमाची सुरुवात अय्यंकाली यांच्या जीवनाविषयी, त्यांचा क्रांतिकारी वारसा…
महान जातिविरोधी योद्धा अय्यंकालींच्या १६१व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना क्रांतिकारी सलाम, नौजवान भारत सभा तर्फे साठेनगर, मानखुर्द च्या कामगार वस्तीत पोस्टरींग केले गेले
आज अय्यंकालींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा वैचारिक वारसा आणि जतिविरोधी संघर्ष कामगार कष्टिकरी जनतेत घेऊन जाण्याच्या हेतूने नौजवान भारत सभा तर्फे साठेनगर, मानखुर्द च्या कामगार वस्तीत पोस्टरींग केले गेले. अय्यंकालींनी ब्राह्मणवाद आणि त्यांच्या सत्तेपासून समानतेचा हक्क मिळवण्यासाठी एक संघर्षशील लढा दिला होता आणि यशस्वी झाले होते. अय्यंकाली अमूलगामी आणि संघर्षशील पद्धतीने रस्त्यावर उतरून लढाईचा मार्ग स्वीकारत असत. त्यांनी सरकारच्या कृपेवर किंवा समजुतीवर विश्वास ठेवला नाही, तर जनतेच्या पुढाकारावर विश्वास ठेवला.…
शहीद राजगुरु के 116वें जन्मदिवस के अवसर पर नौजवान भारत सभा द्वारा आयोजित की गयी ‘चित्रकला प्रतियोगिता’!
नौजवान भारत सभा मानखुर्द, मुम्बई की तरफ़ से दिनांँक 25 अगस्त को ‘शहीद राजगुरु शिक्षा सहायता केन्द्र’ के तहत ‘चित्रकला प्रतियोगिता’ का आयोजन किया गया। कार्यक्रम की शुरुआत बच्चों के बीच शहीद राजगुरु की क्रान्तिकारी विरासत के बारे में बात करते हुए हुई। बच्चों को उनके संस्मृतियों के ज़रिये उनके जीवन के अनुभव और क्रान्तिकारी उसूलों के बारे में बताया गया। राजगुरु ने क्रान्तिकारी संगठन हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ (HSRA) के सदस्य के रूप में एक बेहतर समाज बनाने के संघर्ष में…
प्रसिद्ध व्यंगकार हरिशंकर परसाई के 100वें जन्म दिवस के अवसर पर उनके प्रसिद्ध व्यंग कथा- “इंस्पेक्टर मातादीन चाँद पर” का पाठ
नौजवान भारत सभा, मुम्बई द्वारा संचालित शिक्षा सहायता केन्द्र में बच्चों के बीच प्रसिद्ध व्यंगकार हरिशंकर परसाई के 100वें जन्म दिवस के अवसर पर उनका जीवन परिचय दिया गया और उनके प्रसिद्ध व्यंग कथा – “इंस्पेक्टर मातादीन चाँद पर” का पाठ किया गया। बच्चों ने काफी उत्साह और ग़ौर से पूरी कहानी सुनी। परसाई की लेखन पद्धति पर बात करते हुए साथी संजीव ने कहा कि, “परसाई ने समाज में व्याप्त हर उस बुराई, भ्रष्टाचार और अनैतिक चीजों के बारे में लिखा जो आम मेहनतकश जनता के लिए अहितकर था।”…
