नौजवान भारत सभेद्वारे शहीद सुखदेव फिरते वाचनालय मानखुर्द गोवंडीतील कष्टकरी वस्त्यांमध्ये नियमितपणे चालू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

नौजवान भारत सभा (नौभास), मुंबई तर्फे मानखुर्द-गोवंडी (मुंबई) च्या अण्णाभाऊ साठे नगर, गौतम नगर आणि रफी नगर येथील वस्त्यांमध्ये नियमितपणे शहीद सुखदेव फिरते वाचनालय चालवले जात आहे. नौभास द्वारे संचालित शहीद भगतसिंह वाचनालयाव्यतिरिक्त फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तरुणांपर्यंत विज्ञान, इतिहास आणि इतर प्रगतिशील आणि क्रांतिकारी साहित्य पोहचवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

आज कामगार कष्टकरी जनता आपले पोट भरण्यासाठी दिवसाचे 10, 12, 14 तास काम करण्यासाठी हतबल आहे आणि त्यासोबत आज सोशल मीडियाच्या वाईट प्रभावामुळे सामान्य जनतेत वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अशा परिस्थितीत तरुणांपर्यंत असे शिक्षण घेऊन जाणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून त्यांना सामाजिक रूढी व अंधश्रद्धा यांविरुद्ध लढण्यासाठी आणि आपल्या जीवनातील सामाजिक-राजकीय घडामोडींना पाहण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन मिळेल.

मानखुर्द-गोवंडी मध्ये सरकार द्वारे संचालित जनतेसाठी म्हणून एक सुद्धा वाचनालय नाही. जनतेचा सांस्कृतिक दर्जा उंचावण्याकरिता सरकारची नसलेली इच्छाशक्ती ह्यातून स्पष्टपणे दिसून येते. एकीकडे सरकार विद्यार्थी-युवकांसाठी वाचनालय आणि पुस्तके उपलब्ध करत नाहीत आणि दुसरीकडे आपण पाहतो की मागच्या दहा वर्षांमध्ये मोठमोठाल्या भांडवलदारांना 14.5 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. नौभास हे समजते की भांडवलदारांकडून आर्थिक निधी घेऊन काम करणारे कोणतेही राजकीय पक्ष, संघटना किंवा सामाजिक संस्था सामान्य जनतेला फसवण्याचे काम करतात.

नौभास आपली सर्व कामे कुठल्याही सरकारी अनुदानावर किंवा कंपन्यांच्या ‘सी.एस.आर फंडस्’ द्वारे पैसे उभे करून चालवत नाही तर फक्त कामगार कष्टकरी जनता आणि प्रगतिशील व्यक्तींच्या बळावर चालवते. आम्ही सर्व प्रगतिशील व्यक्तींना पुढे येऊन आमच्या सोबत सामील होण्याचे आणि नौभास च्या कामांसाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन करत आहोत.

Gpay/UPI – shashanksaurav1995-2@okicici

संपर्क – 7667230795, 9930095381

Related posts

Leave a Comment

two × 3 =