गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या विविध कामगार वस्त्यांमध्ये महिला अत्याचारावर भाष्य करणारे ‘बाईचीच चूक’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. कोलकाताच्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देश हादरून गेला होता. पण ती घटना अपवाद नव्हती. उलट दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे. आज महिला घरी, कामाच्या ठिकाणी आणि समाजात वावरताना कुठेच सुरक्षित नाहीयेत. ही सामाजिक स्थिती हे नाटक दाखवते आणि विचार करायला भाग पाडते. महिलांवरील अत्याचारांकरिता भांडवली पितृसत्ताक मुल्यमान्यता आणि ह्या पितृसत्तेला टिकवणारी आणि पोसणारी भांडवली व्यवस्था कारणीभूत आहे. हा संघर्ष महिला विरुद्ध पुरुष नसून कामगार कष्टकरी महिला आणि पुरुषांच्या एकजुटीने ह्या व्यवस्थेविरोधात करायचा संघर्ष आहे.
शहीद भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी निश्चितच अशा समाजाचे स्वप्न नव्हते पाहिले जिथे कामगार कष्टकरी महागाई, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्यांच्या प्रश्र्नांशी झगडत असतील. त्यांनी एका शोषणविरहित आणि समतामुलक समाजाची कल्पना केली होती. आजही क्रांतिकारकांचे ते स्वप्न अपूर्ण आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुण तरुणींना पुढे यावे लागेल.
28 सप्टेंबर शहीद भगतसिंह जन्मदिनानिमित्त “शहीद भगतसिंग स्मृती संकल्प अभियान” देशभर येथे चालवले जात आहेत. या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रामधील कार्यक्रमांमध्ये सामील होण्यासाठी संपर्क करा.
8956840785, 8329869421
