नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई में ‘भगत सिंह और हमारा समय’ विषय पर चर्चा आयोजित की गई।

मुम्बई के एक संस्थान में बच्चों के बीच ‘भगत सिंह और हमारा समय’ विषय पर चर्चा आयोजित की गई। चर्चा में साथी संजीव ने नौजवान भारत सभा के कामों और भगत सिंह के जीवन व संघर्षों के बारे में बताते हुए कहा कि कैसे अंग्रेजों की साम्राज्यवादी लूट के खिलाफ़ संघर्ष करते हुए भगत सिंह और उनके साथियों ने हिन्दुस्तान सामाजवादी प्रजातंत्र संघ (HSRA) और नौजवान भारत सभा जैसे क्रान्तिकारी संगठन का गठन किया। अविनाश ने सामाजिक, राजनीतिक परिस्थितियों पर बात रखते हुए कहा कि जब महँगाई, बेरोज़गारी, भ्रष्टाचार और…

शहीद दिनानिमित्त नौजवान भारत सभा, पुणे युनिट ची वार्षिक बैठक आणि पदयात्रा संपन्न

आज 23 मार्च शहीद दिवसानिमित्त नौजवान भारत सभेची वार्षिक बैठक पार पडली. गेल्या वर्षभरातील पुणे तसेच देशभरातील नौजवान भारत सभेच्या कामांचा आढावा, नवीन कार्यकारिणीची निवड तसेच पुढील कामांच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना यासाठी ही बैठक झाली. मीटिंगच्या सुरुवातीला साथी स्वप्नजा यांनी शहीद दिनानिमत्त प्रास्ताविक केले आणि जोरदार घोषणा देत मीटिंगची सुरुवात करण्यात आली. साथी सुस्मित यांनी पुण्यातील नौजवान भारत सभेचा वर्षभरातील अहवाल सादर केला. यामध्ये वर्षभरात पार पाडलेली चर्चासत्रे, अभियाने, बुक स्टॉल्स, नौभास द्वारे आंदोलनातील सहभाग, भगतसिंह जनअधिकार यात्रेमधील सहभाग, शिक्षण सहायता केंद्र, फिरते वाचनालय इत्यादी कामांचा संक्षिप्त आढावा मांडण्यात आला.…

भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 23 मार्च ला येणाऱ्या 93 व्या शहादत दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या वतीने आचार्य महाविद्यालय (चेंबूर) समोर क्रांतिकारी साहित्याचा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला.

विद्यार्थी व तरुणांना समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठीच्या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करत आज भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 23 मार्च ला येणाऱ्या 93 व्या शहादत दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या वतीने आचार्य महाविद्यालय (चेंबूर) समोर क्रांतिकारी साहित्याचा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला. भगतसिंहाने विद्यार्थी आणि तरुणांना आवाहन केले होते की त्यांनी क्रांती चा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायला हवा. हे लक्षात घेऊन नौजवान भारत सभेचे सदस्य भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे समाज परिवर्तनाचे मूळ विचार युवकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मानखुर्द गोवंडी च्या भागात सातत्याने क्रांतिकारी साहित्य असलेल्या पुस्तकांचा स्टॉल लावतात. आजवर आपल्या देशातील…

७ मार्च रोजी साठे नगर, मानखुर्द येथे नौजवान भारत सभा (नौभास) चे सहयोग अभियान चालवण्यात आले.

अभियानात लोकांना आपल्या शहिदांच्या स्वप्नांची आठवण करून दिली गेली. भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, ज्या स्वातंत्र्यासाठी लढले होते ते आज ही आपल्याला मिळाले नाहीये. शिक्षणाचे बाजारीकरण आज कामगार कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून दूर करत आहे. बेरोजगारी ची अवस्था इतकी वाईट आहे की आज ३२ कोटी तरुण बेरोजगार आहेत. आणि अशा मुद्द्यांवर युवकांनी सत्तेत बसलेल्या धनदांडग्यांना जाब विचारू नये  म्हणून त्यांच्यात जाति धर्माची भांडण लावली जात आहेत. अभियानात नौजवान भारत सभेच्या विविध क्रांतीकारी सुधार कामांबद्दल लोकांना सांगितले गेले जसे की शहिद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र, शहिद सुखदेव फिरते वाचनालय, त्याच सोबत सध्या दहावीच्या…

भगतसिंह जनअधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी आयोजित आंदोलनाला थांबवण्याच्या प्रयत्नात दिल्ली पोलिसांनी त्याला आणखी यशस्वी बनवले.

काल ३ मार्च ला जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे गेल्या तीन महिन्यांपासून चालु असलेल्या भगतसिंह जनअधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शेवट होणार होता. ही यात्रा 10 डिसेंबर 2023 पासून सुरू होती आणि 13 राज्य, 85 जिल्हे आणि 8500 किलोमिटर चा प्रवास पार करून 26 फेब्रुवारी 2024 ला दिल्लीत पोहोचली होती आणि तेव्हापासून दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात चालु होती. यात्रेचा भाग म्हणून बवाना इण्डस्ट्रियल एरिया, ट्रॉनिका सिटी इण्डस्ट्रियल एरिया, करावलनगर, खजूरी इत्यादी भागातील कामगारांनी संप पुकारला होता. तसेच 12 राज्यांमधून कामगार, स्त्रिया, विद्यार्थी तरुण आज दिल्लीला पोहोचले होते. सकाळी 11 वाजता कामगार, स्त्रिया, विद्यार्थी…

नौजवान भारत सभेच्या शिक्षण सहायता केंद्राकडून जनता वसाहत येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 12 दिवसांच्या गणिताच्या क्रॅश कोर्सचे आयोजन.

साथींनो, मागच्या 7-8 महिन्यांपासून जनता वसाहत येथे नौजवान भारत सभेकडून 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येते. ज्यात गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय शिकवले जातात. वैज्ञानिक प्रयोग, मुव्ही स्क्रिनिंगसारखे उपक्रम देखील जनतेच्या आर्थिक सहयोगातून दाखवले जातात. 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरु होत आहेत, विद्यार्थी आणि पालकांकडून गणित विषयाचा क्रॅश कोर्स घ्यावा ही मागणी येत होती. त्यासाठी मागच्या 12, 13 फेब्रुवारीला वस्तीमध्ये घरोघरी जाऊन क्लाससाठी 10 वीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी अभियान चालवले आणि 14 फेब्रुवारीपासून 12 दिवसांचा गणिताचा क्रॅश कोर्स चालू केला आहे. शिक्षण सहायता केंद्र आणि यासारखे उपक्रम…

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात ‘द लेजंड ऑफ भगतसिंह’ चित्रपट दाखवला गेला.

केंद्रातील फॅसिस्ट मोदी सरकार दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा भव्य देखावा करण्याच्या फक्त दोन दिवस आधी 24 जानेवारी रोजी मुबई, मानखुर्द, साठे नगर मधील तब्बल 1200 हून अधिक घरे असलेल्या वस्तीवर महाराष्ट्रातील भाजप – शिंदे सरकार द्वारे बुलडोझर चालवला गेला. नौजवान भारत सभा सक्रियपणे या भागात कार्यरत आहे आणि वस्तीतील लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या घराच्या हक्कासाठी लढत आहे. भगतसिंहाचे शब्द – “दिल्लीतील गोऱ्या सरकारच्या जागी भुरे सरकार” साठे नगरमधील प्रत्येकाच्या कानात दुमदुमत आहेत. सर्वांना घरे देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या फॅसिस्ट सरकारने गेल्या 10 वर्षांत देशातील कामगार कष्टकरी जनतेलाच विस्थापित करण्याचे…

एफ.टी.आय.आय. व ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या फॅसिस्ट हल्ल्याच्या विरोधात काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नौजवान भारत सभा आणि इतर सहयोगी संघटनांच्या सहभागाने विरोध प्रदर्शन करण्यात आले

पुणे शहरातच गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची ही चौथी घटना आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) येथे ‘राम के नाम’ या चित्रपटाचे प्रदर्शन केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेच्या गुंडांनी येथील विद्यार्थ्यांवर नियोजनबद्धपणे हल्ला केला. तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडले. 23 जानेवारी रोजी झालेल्या या हल्ल्यामध्ये स्पष्टपणे पोलीसही सहभागी होते हे दिसून आले, कारण पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असून सुद्धा मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही, उलट ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांनाच ताब्यात घेऊन त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. ही घटना ताजी असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील…

नौजवान भारत सभेच्या आणि स्त्री मुक्ती लीग वतीने मुंबईच्या साठे नगर (खाडी) भागात प्रशासनातर्फे तोडण्यात आलेल्या कष्टकरी वस्तीत चालवले जात आहे शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र आणि सावित्री फातिमा अभ्यास गट!!

मुंबई येथील मानखुर्दच्या साठे नगर (खाडी) भागात 24 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेद्वारे 500 ते 700 कष्टकऱ्यांची घरं उध्वस्त करण्यात आली. आज आपल्या मेहनतीने संपूर्ण मुंबई चमकवणाऱ्या कामगार कष्टकरी जनतेच्या डोक्यावरचे छत प्रशासनाने हिरावून घेतले आहे. प्रशासनाद्वारे कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली असून इथल्या लोकांना कुठलीही पर्यायी व्यवस्था सुद्धा देण्यात आली नाही. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि भाजपचे खासदार मनोज कोटक यांसारख्या भांडवली निवडणूकबाज-धंदेबाज पक्षाचे नेते एकदा सुद्धा ह्या तोडलेल्या झोपड्या बघण्यासाठी किंवा लोकांच्या भेटीला आलेले नाहीत. अशा परिस्थितीत नौजवान भारत सभा…

नौजवान भारत सभा तर्फे “स्पर्धा परीक्षा घोटाळा आणि रोजगाराची स्थिती” या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र!

 साथीनो महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती मध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्र सरकारने तलाठी भरतीची परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस या खाजगी कंपनीला दिली होती. यामध्ये 4793 जागांसाठी 11.5 लाखाच्या  वर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. टीसीएस कंपनीशी संबंधित असलेल्या अनेक लोकांच्या नातेवाईकांना या परीक्षेत जास्त गुण मिळाले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही सेंटर वर तर पेपर सुरू होण्याच्या आधीच पेपर फुटल्याच्या सुद्धा बातम्या बाहेर आल्या आहेत. अनेक टप्प्यांमध्ये परीक्षा झाली असल्यामुळे नॉर्मलिझशन (normlization) ची जी पद्धत वापरण्यात…