जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत! हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे! फॅसिस्ट मोदी-योगी सरकार मुर्दाबाद !

जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत!
हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे!
फॅसिस्ट मोदी-योगी सरकार मुर्दाबाद !
न्यायप्रिय मित्रमैत्रिणींनो,
गेले दशकभर स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात देशात आंदोलन चालू आहे, पण जेव्हा बलात्कारी आणि त्यांचे पाठीराखेच सत्तेत असतात तेव्हा गुन्हे थांबतील काय? बलात्कार, जातीय अत्याचार, पोलिसी दमन आणि राज्यसत्तेकडून मुस्कटदाबी आता योगी-मोदी सरकारच्या काळात शिगेला पोहोचले आहेत. पीडीत महिलेचा मृतदेह सुद्धा जेव्हा नातेवाईकांना न देता सरकार परस्पर अंत्यविधी उरकून टाकत आहे, तेव्हा देशामधील लोकशाही संपण्याची ही नांदी आहे हे ध्यानात घ्या आणि वेळीच जागे व्हा!
14 सप्टेंबर 2020 रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्यातील चंदाप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोट्याश्या गावात 19 वर्षांच्या मनीषा वाल्मिकीवर सवर्ण जातीतील चौघांनी मारहाण करून बलात्कार केला. मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. रुग्णालयात आणले तेव्हा तिची जीभ कापलेली होती, मान मुरगळलेली होती, तिच्या मणक्याला बसलेल्या जबरदस्त मारामुळे तिचे हात आणि पाय लुळे पडले होते. तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांत गावातीलच संदीप, त्याचा काका रवि, लव आणि कुश असे चौघे जण होते. सहाशे उंबऱ्यांच्या त्या गावात 15 कुटुंब दलितांची आणि अर्ध्याहून अधिक कुटुंब ठाकुरांची आहेत. घडलेल्या बलात्काराच्या घटनेत पितृसत्ताकतेबरोबरच तीन पिढ्यांपासून असलेली जातीयभेदाची तेढदेखील आहे.
काही वर्षांपूर्वी घटनेतल्या मनीषाच्या आजोबांनी केलेल्या एट्रोसिटीच्या तक्रारीवरून संदीपच्या आजोबांना तीन महिने तुरुंगात जावे लागले होते. हा राग त्यांच्या मनात धुमसत होता ज्यामुळे 2015 मध्ये रविने या कुटुंबाला बेदम मारहाण केली होती. परंतु रविला कुठलीही शिक्षा झाली नाही.
लहानपासूनच ठाकुरांविषयी मनीषाच्या मनात प्रचंड भीती होती ज्यामुळे ती कधी शाळेत देखील गेली नाही. संदीपच्या कुटुंबीयांचा संपूर्ण गावावर वाचक असल्यामुळे कुणालाही न घाबरता गावभर मुलींची छेड काढत फिरणारा संदीप गेली सहा-सात महिने मनीषाला त्रास देत होता. घाबरलेली मनीषा घराच्या परसातील गोठ्यातही जायला भीत होती. अखेर 14 सप्टेंबर रोजी आईसोबत गवत कापायला गेलेल्या मनीषाला या चौघांनी शेतात ओढत घेऊन जाऊन मारहाण करत तुच्यावर निर्घृण बलात्कार केला. आईला कमी ऐकू येत असल्यामुळे स्वतःला वाचवण्याची तिची आर्जव हवेतच विरून गेली. शोधाशोध केल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर आईला ती रक्ताच्या थारोळ्यात सापडली. मनीषावरचे अत्याचार एवढ्यावरच थांबले नाहीत. पोलिसांनी तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी न नेता मध्यरात्रीच स्मशानभूमीत जाऊन कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नसताना अंत्यविधी करून टाकला. पोलिसांकडून तिच्या नातेवाईकांना दमदाटी आणि मारहाण देखील करण्यात आली.
मित्रांनो, या बर्बर घटनेबद्दल जर आपल्या मनात क्रोध उत्पन्न होत नसेल, जर या घटनेविरोधात आपण आवाज उठवत नसू तर आपण या बलात्काराच्या घटनेला मौन समर्थनच करत आहोत. सत्तेत बसलेल्या फासीवादी आणि महिलाविरोधी योगी आणि मोदी सरकारमुळे देशभरात महिला आणि दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 2018 मध्ये उत्तरप्रदेशात महिला अत्याचाराचे 59445 नोंदवलेले गुन्हे आहेत. अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची हत्या हि उत्तरप्रदेशची खास ओळख झाली आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरण असो व कठुआ. आपण पाहिले आहे की बलात्काऱ्यांच्या समर्थनामध्ये आपल्या जातीय़ अस्मितेची ढाल करून भाजपचे समर्थक रस्त्यांवर येत आहेत. मोदी-योगी सरकारचे मंत्रीच जेव्हा बलात्काराच्या आरोपींसोबत अभिमानाने मिरवतात, त्या समाजात बलात्काराच्या घटना वाढणार नाहीत तर काय? ‘बहुत हुआ नारी पर वार, अबकी बार मोदी सरकार’ असे म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी-योगी यांच्या फॅसिस्ट सरकारचे खरे चरित्र हेच आहे!
संपत्तीधारक वर्ग आज आपल्या पूर्वापारच्या जातीय़ अस्मितांचा वापर करत शोषित, दलित, कामगार-कष्टकऱ्यांवर आपले प्रभुत्व गाजवण्याच्या हत्याराच्या रुपाने स्त्रियांवर बलात्काराच्या हत्याराचा वापर करत आहेत. म्हणून आता संघटित होऊन ह्या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि समतामूलक आणि न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी एकीकडे भांडवलशाही आणि दुसरीकडे जातीव्यवस्था आणि पितृसत्तेला पायदळी तुडवले पाहिजे.
आम्ही या घटनेतील चारही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच महिलाविरोधी आणि फासीवादी योगी आदित्यनाथने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा हि मागणी करतो. सर्वांना या संघर्षात एकजूट होऊन रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करतो.
मार्ग मुक्तिचा बनवावा लागेल, जगायचे असेल तर लढावे लागेल!
✊नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना
पुणे
डॉ. निखिल 8669735643
रवि पुर्णे 8956840785,
प्रविण एकडे 9923875414
पत्ता: शहिद भगतसिंह वाचनालय, बिडकर चौक, सर्वे नं 133, दांडेकर पूल, पुणे
मुंबई
अविनाश: 9082861727
बबन: 9619039793
पत्ता: रूम क्र 209, शहीद भगतसिंह वाचनालय, बिल्डिंग 7बी, हिरानंदानी आकृती, लाल्लूभाई कंपाउंड, मानखुर्द
अहमदनगर
अविनाश: 7499264646
अतुल: 9403317106
पत्ता: शहीद भगतसिंह पुस्तकालय, सिद्धार्थ नगर, बौद्ध वस्ती, पंचशील विद्या मंदिर जवळ, अहमदनगर

Related posts

Leave a Comment

four × two =