शहीद राजगुरु शिक्षा सहायता केंद्र के तहत शहीद भगत सिंह पुस्तकालय, मानखुर्द में नौजवान भारत सभा की तरफ से ‘मकड़ी’ फिल्म दिखाई गई, जिसके बाद चर्चा सत्र भी रखा गया। समाज में प्रस्थापित तमाम अंधविश्वास, गलत मूल्य-मान्यताओं, रूढ़ी परंपराओं के बारे में बात रखते हुए, बच्चो को जीवन में एक वैज्ञानिक दृष्टिकोण रखने के महत्व के बारे में बताया गया। सभी ने फिल्म को बहुत दिलचस्पी से देखा और चर्चा में भी हिस्सा लिया। दिव्या ने बताया कि भूत प्रेत जैसी कोई चीज नही होती है। गोकुल ने इसमें आगे…
नौजवान भारत सभा तर्फे “नौकरी” हा चित्रपट दाखवला गेला
काल दिनांक 15 ऑगस्टला नौजवान भारत सभा तर्फे “नौकरी” हा चित्रपट दाखवला गेला. चित्रपट बीमल रॉय यांनी दिग्दर्शित केला होता. यात प्रमुख भूमिकेत किशोर कुमार यांनी काम केले आहे. ह्या चित्रपटात रतन (किशोर कुमार) याचा नोकरी मिळवण्याचा संघर्ष चित्रित केला आहे. चित्रपटाचा नायक स्वत: साठी आणि त्याच्या कुटुंबासाठी अनेक स्वप्न घेऊन शहरात येतो. पण नोकरीच्या शोधात शहरात आल्यावर वास्तव हे वेगळेच असते. त्याला त्याच्यासारखीच कित्येक महिन्यापासून बेरोजगार असलेले तरुण भेटतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात बेरोजगारीची भीषण समस्या या चित्रपटात दिसून येते. चित्रपटानंतर चर्चेमध्ये सहभागी होताना साथी जयने मांडले की, “स्वातंत्र्यानंतर…
नौभासच्या राष्ट्रीय संमेलनाची तयारी सुरू!
नौभासच्या राष्ट्रीय संमेलनाची तयारी सुरू! नौभास, मुंबईच्या नुकत्याच झालेल्या युनिट मीटिंगमध्ये नौभासच्या द्वितीय राष्ट्रीय संमेलनाच्या तयारी संबंधित चर्चा करून कार्यक्रम ठरवले गेले व नवीन साथींना सदस्यता देखील देण्यात आली. मिटिंगच्या सुरुवातीला साथी शशांक यांनी नौभासची भूमिका मांडली व मुंबई युनिटने केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. साथी राहुल यांनी नौभासची संघटनात्मक रचना आणि सदस्यत्वाच्या अटींबद्दल माहिती दिली. साथी अविनाश यांनी आज युवकांनी नौभासमध्ये का सामील व्हावे यावर सविस्तरपणे मांडणी केली आणि राष्ट्रीय संमेलनाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. साथी शशांक यांनी आजच्या सरकारचे फॅसिस्ट चारित्र्य थोडक्यात रेखाटण्याचा प्रयत्न केला. नौभासची सभासदसंख्या वाढवण्यासाठी…
भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौभासचे सदस्यता अभियान सुरू केले गेले आहे
मागील दोन दिवसांपासून 28 सप्टेंबर, भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौभासचे सदस्यता अभियान सुरू केले गेले आहे. त्याचा भाग म्हणून पुण्यातील तळजाई उद्यानासमोर आणि अझम कॅम्पसला बुक स्टॉल लावण्यात आला. ह्यावेळी तरुण-तरुणींशी साथींनी संवाद साधला. तरुण-विद्यार्थांना नौभासच्या क्रांतिकारी वारशाचा परिचय करून देणे, आज आपल्यासमोर असलेल्या महत्त्वाच्या समस्यांना चर्चेचे मुद्दे बनवून त्यावर सखोल चर्चा करणे, तरुणांच्या समस्या जाणून घेणे व त्यावर कृतिशील होऊन संघटित होण्याचे आवाहन करत हे अभियान चालवले गेले. यामध्ये तरुणांचा छान प्रतिसादही मिळत आहे. ह्या अभियानांमधून तरुणांपर्यंत भगतसिंहासोबतच इतर प्रगतिशील साहित्य सुद्धा पोहचवले जात आहे. नौजवान भारत सभा संपर्क: 8956840785
बजरंग दलाच्या गुंडांनी हरियाणातील नरवाना येथे सुरू असलेल्या झुंजार जनएकजूट अभियानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. जनतेने त्यांना चांगलाच चोप दिला!
बजरंग दलाच्या गुंडांनी हरियाणातील नरवाना येथे सुरू असलेल्या झुंजार जनएकजूट अभियानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. जनतेने त्यांना चांगलाच चोप दिला! सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात जनतेला एकजूट करण्याचा आमचा प्रयत्न नेहमी सुरू राहील! जातीची अस्मिता सोडा, कामकर्यांची एकजूट करा! हरियाणातील नुंहू, मेवात, आणि इतर काही जिल्ह्यांमधे सांप्रदायिक दंगे भडकवणाऱ्यांच्या विरोधात नौजवान भारत सभा व अन्य जनसंघटनांद्वारे सुरू असलेले झुंजार जनएकजूट अभियान अविरतपणे सुरू आहे. आज याच अभियानाला पुढे नेण्यासाठी नरवानामधील नेहरू पार्कमधे जनतेची एकजूट प्रस्थापित करण्यासाठी व्यापक चर्चा करून पत्रक वाटत अभियान सुरू होते. हे सुरू असतांनाच अभियानात बाधा आणण्यासाठी काही गुंड…
पुण्यातील जनता वसाहत येथे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात!
पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पर्वती पायथ्याला वसलेल्या जनता वसाहत येथे नौभास तर्फे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात करण्यात आली. जनता वसाहतीच्या काही गल्ल्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी अभियान चालवले, ज्यात नौभासची ओळख, शिक्षण सहाय्यता केंद्र सुरू करण्यामागची भूमिका आणि शिक्षणाच्या अधिकाराविषयी लोकांसोबत बोलण्यात आले. अभियानानंतर 8वी ते 10वी चे विज्ञान, गणित आणि इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कामकरी पार्श्वभूमीतून येणारी मुलं खूप उत्साहाने वर्गाला येत आहेत. शिक्षक स्वयंसेवकसुद्धा मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी सृजनशील मार्गांचा अवलंब करत आहेत. दिवसेंदिवस सरकारी शाळांची होत चाललेली दयनीय स्थिती आणि शिक्षणाचे वाढते बाजरीकरण यामुळे कामगार-कष्टकरी वर्गातून येणाऱ्या…
पुण्यातील जनता वसाहत येथे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात!
पुण्यातील जनता वसाहत येथे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात! पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पर्वती पायथ्याला वसलेल्या जनता वसाहत येथे नौभास तर्फे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात करण्यात आली. जनता वसाहतीच्या काही गल्ल्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी अभियान चालवले, ज्यात नौभासची ओळख, शिक्षण सहाय्यता केंद्र सुरू करण्यामागची भूमिका आणि शिक्षणाच्या अधिकाराविषयी लोकांसोबत बोलण्यात आले. अभियानानंतर 8वी ते 10वी चे विज्ञान, गणित आणि इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कामकरी पार्श्वभूमीतून येणारी मुलं खूप उत्साहाने वर्गाला येत आहेत. शिक्षक स्वयंसेवकसुद्धा मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी सृजनशील मार्गांचा अवलंब करत आहेत. दिवसेंदिवस सरकारी शाळांची होत चाललेली दयनीय स्थिती…
रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पुण्यातील काही साथींना नौभासची वार्षिक सदस्यता देण्यात आली
रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पुण्यातील काही साथींना नौभासची वार्षिक सदस्यता देण्यात आली. सदस्यतेची शपथ सर्वांनी एकत्र घेतली आणि क्रांतिकारकांच्या मार्गावर चालण्याचा निर्धार केला. ‘सर्वांना समान, मोफत आणि दर्जेदार शिक्षण’ आणि ‘प्रत्येक हाताला काम’ हा नौभासचा मुख्य कार्यक्रम आहे. शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार मिळवण्यासाठी देशभरात अनेक तरुण नौभाससोबत जोडून कटिबद्ध होत आहेत. संपर्क: 8956840785
शहीद राजगुरू शिक्षा सहायता केंद्र के तहत रविवार को भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, एच एस आर ए, नौजवान भारत सभा और क्रांतिकारी आंदोलन की धारा पर बातचीत व ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’ फिल्म दिखाई गई।
शहीद राजगुरू शिक्षा सहायता केंद्र के तहत रविवार को भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, एच एस आर ए, नौजवान भारत सभा और क्रांतिकारी आंदोलन की धारा पर बातचीत व ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’ फिल्म दिखाई गई। बच्चों ने फिल्म को बहुत ही दिलचस्पी से देखा व बाद में चर्चा भी की। अलीशा ने बताया कि फिल्म से पता चला कि एक समय था, जब देश पर अंग्रेजो का राज था, देश में शोषण और अत्याचार था, मगर तब से अब तक देश के हालात बहुत बदले नहीं है। परवेज़ ने…
शहीद भगत सिंह वाचनालयाच्या साप्ताहिक कार्यक्रमात विजय तेंडुलकर लिखित “घाशीराम कोतवाल” हा चित्रपट पाहून त्यावर चर्चा करण्यात आली
शहीद भगत सिंह वाचनालयाच्या साप्ताहिक कार्यक्रमात विजय तेंडुलकर लिखित “घाशीराम कोतवाल” हा चित्रपट पाहून त्यावर चर्चा करण्यात आली. हा चित्रपट तेंडुलकरांच्या याच नावाच्या नाटकाचे रूपांतरण आहे. हा चित्रपट ह्याच्या निर्मितीपासून ते चित्रपट विषयाच्या मांडणी पर्यंत एक अनोखा प्रयोग होता. FTII च्या विद्यार्थ्यांनी ‘युक्त’ नावाची collective बनवून या चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाबद्दल चर्चा करताना साथी जयने मांडले की, “चित्रपट आणि नाटकाच्या मांडणीमध्ये बराच फरक आहे. नाटकामध्ये घाशीराम या व्यक्तिरेखेचा उदय आणि अस्त दाखविला आहे. चित्रपटामध्ये घाशीरामचे पात्र तात्कालीन सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवरचे एक लहान पात्र म्हणून पुढे येते. चित्रपटात पेशवेकालीन समाजातील…
