नौजवान भारत सभा तर्फे “नौकरी” हा चित्रपट दाखवला गेला

काल दिनांक 15 ऑगस्टला नौजवान भारत सभा तर्फे “नौकरी” हा चित्रपट दाखवला गेला. चित्रपट बीमल रॉय यांनी दिग्दर्शित केला होता. यात प्रमुख भूमिकेत किशोर कुमार यांनी काम केले आहे. ह्या चित्रपटात रतन (किशोर कुमार) याचा नोकरी मिळवण्याचा संघर्ष चित्रित केला आहे. चित्रपटाचा नायक स्वत: साठी आणि त्याच्या कुटुंबासाठी अनेक स्वप्न घेऊन शहरात येतो. पण नोकरीच्या शोधात शहरात आल्यावर वास्तव हे वेगळेच असते. त्याला त्याच्यासारखीच कित्येक महिन्यापासून बेरोजगार असलेले तरुण भेटतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात बेरोजगारीची भीषण समस्या या चित्रपटात दिसून येते.
चित्रपटानंतर चर्चेमध्ये सहभागी होताना साथी जयने मांडले की, “स्वातंत्र्यानंतर लगेचच अशाप्रकारे देशाचे जळजळीत वास्तव मांडणे हे वाखाणण्याजोगे आहे.”
साथी सुजाताने मांडले की, “चित्रपटात दाखवलेली सत्तर वर्षापूर्वीची बेरोजगारीची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये काहीच फरक नाहीये.” सुजाताने तिचे नोकरी शोधताना येणारे तिचे अनुभव मांडले की शंभर ठिकाणी फिरून सुद्धा काम नाही हेच ऐकायला मिळते.
साथी अश्विनीने मांडले की, “समाजात पितृसत्ता कशाप्रकारे काम करते हे याचे चित्रण चित्रपटात येते. सीमा (शिला रामणी) या पितृसत्तेविरोधात बंड करून तिचा जोडीदार स्वत: निवडते. समाजात अशा महिलांची गरज आहे ज्या रूढी परंपरांविरोधात बंड करतील.“
साथी निखिलने मांडले की, “आज देशात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना देशामध्ये 30 कोटी लोक बेरोजगार आहेत. हे स्वातंत्र्य नक्की कुणाचे आहे याचा विचार करण्याची गरज आहे. संविधानामध्ये जगण्याचा जगण्याचा अधिकार आहे पण रोजगाराचा अधिकार नाहीये. आज देशामध्ये आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही व्यवस्था अनेकांच्या जगण्याच्या इच्छेला सुद्धा मारण्याचे काम करत आहे. चित्रपटामध्ये सीमा तिचे कुटुंबीय तिच्या मर्जी विरुद्ध तिचे लग्न लावत असतात तेव्हा घरातून पळून रतनसोबत लिव-इन-रिलेशनशीप मध्ये राहते. सत्तर वर्षापूर्वी अशा प्रकारचे नाते खूप प्रचलित नव्हते.”
साथी सुस्मितने मांडले की, “आज अशा प्रकारचे वास्तववादी चित्रपट फारच अपवादस्वरूप बनत आहे. आज कलेचा वापर समाजाचे वास्तव लपवण्यासाठी, लोकांना खोटी स्वप्ने दाखवण्यासाठी, खोटा इतिहास रचून लोकांमध्ये धर्माच्या नावाने भांडण लावण्यासाठी होत आहे. चित्रपटामध्ये बेरोजगारी या मुद्यावर भाष्य येतेच सोबतच बेरोजगारीमुळे येणारी निराशा, त्यातून होणाऱ्या आत्महत्या यांचे सुद्धा चित्रण येते. चित्रपटाच्या शेवटाकडे दिग्दर्शक आपल्याला सांगतो की जर तुम्हाला रतन सारखा कुणी भेटला तर त्याला नोकरी द्यायचा प्रयत्न करा. पण खरा प्रश्न आहे की आपल्याला रोजगार द्यायची जबाबदारी सरकारची आहे ह्यावर दिग्दर्शक कुठलेही भाष्य करत नाही.”
नौजवान भारत सभा नियमितपणे देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा करणे किंवा चित्रपट बघणे यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. तुम्ही सुद्धा यात सामील होऊ शकता.
संपर्क – रवि 8956840785

Related posts

Leave a Comment

two × 5 =