नौभासच्या राष्ट्रीय संमेलनाची तयारी सुरू!

नौभासच्या राष्ट्रीय संमेलनाची तयारी सुरू!
नौभास, मुंबईच्या नुकत्याच झालेल्या युनिट मीटिंगमध्ये नौभासच्या द्वितीय राष्ट्रीय संमेलनाच्या तयारी संबंधित चर्चा करून कार्यक्रम ठरवले गेले व नवीन साथींना सदस्यता देखील देण्यात आली. मिटिंगच्या सुरुवातीला साथी शशांक यांनी नौभासची भूमिका मांडली व मुंबई युनिटने केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. साथी राहुल यांनी नौभासची संघटनात्मक रचना आणि सदस्यत्वाच्या अटींबद्दल माहिती दिली. साथी अविनाश यांनी आज युवकांनी नौभासमध्ये का सामील व्हावे यावर सविस्तरपणे मांडणी केली आणि राष्ट्रीय संमेलनाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. साथी शशांक यांनी आजच्या सरकारचे फॅसिस्ट चारित्र्य थोडक्यात रेखाटण्याचा प्रयत्न केला. नौभासची सभासदसंख्या वाढवण्यासाठी जोरदार मोहीम राबवण्याची गरज आहे यावर सर्व सदस्यांनी मान्यता दर्शवली. नौभासच्या मोहिमेचे स्वरूप काय असेल त्याचा आराखडा साथी राहुल यांनी मांडला, तो सदस्यांनी एकमताने मान्य केला.
मुंबई युनिट येत्या चार आठवड्यांत नाटक, गाणी, भाषण, बुक स्टॉल यांच्या माध्यमातून, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसरात नौभासच्या आगामी संमेलनाचा प्रचार करेल आणि नौभासची सदस्य संख्या वाढविण्याचा प्रयत्न करेल.
नौजवान भारत सभेचे काम जनतेच्या आर्थिक व वेळेच्या सहयोगानेच चालते. नौजवान भारत सभा सर्व न्यायप्रेमी नागरिकांना नौभास च्या विविध उपक्रमांसाठी आर्थिक हातभार लावण्याचे आणि नौभास चे सदस्य होण्याचे आवाहन करत आहे.
AVINASH KUMAR
STATE BANK OF INDIA.
A/C NO. – 33887284635
IFSC CODE – sbin0016612
Google pay and
phone pay: 8826265960
संपर्क: +919930095381

Related posts

Leave a Comment

three − 2 =