पुण्यातील जनता वसाहत येथे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात!

पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पर्वती पायथ्याला वसलेल्या जनता वसाहत येथे नौभास तर्फे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात करण्यात आली. जनता वसाहतीच्या काही गल्ल्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी अभियान चालवले, ज्यात नौभासची ओळख, शिक्षण सहाय्यता केंद्र सुरू करण्यामागची भूमिका आणि शिक्षणाच्या अधिकाराविषयी लोकांसोबत बोलण्यात आले. अभियानानंतर 8वी ते 10वी चे विज्ञान, गणित आणि इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कामकरी पार्श्वभूमीतून येणारी मुलं खूप उत्साहाने वर्गाला येत आहेत. शिक्षक स्वयंसेवकसुद्धा मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी सृजनशील मार्गांचा अवलंब करत आहेत.
दिवसेंदिवस सरकारी शाळांची होत चाललेली दयनीय स्थिती आणि शिक्षणाचे वाढते बाजरीकरण यामुळे कामगार-कष्टकरी वर्गातून येणाऱ्या मुलांचे शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दर्जेदार शिक्षणाचा अधिकार फक्त श्रीमंत वर्गाकडे उरला आहे. बेरोजगारी आणि महागाईच्या गर्तेत फसलेल्या कामकारी जनतेला आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देता येईल, अशी परिस्थिच नाही. नौभास ‘सर्वांना समान, मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे’ या मागणीसाठी कटिबद्ध आहेच आणि सोबतच, जनतेची सेवा करणे हे सुद्धा आपले कर्तव्य मानते. म्हणूनच जनतेच्या सहयोगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे.
आपण सुद्धा या वर्गांमध्ये शिक्षक स्वयंसेवक बनून आपले योगदान देऊ शकता. तसेच, नौभासच्या कामांसाठी आर्थिक सहयोग करू शकता.
✊ सर्वांना समान, मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे!
✊ शिक्षण आहे सर्वांचा अधिकार, बंद करा त्याचा व्यापार!
संपर्क: रवि 8956840785

Related posts

Leave a Comment

two + 19 =