शहीद भगतसिंह, सुखदेव और राजगुरु की शहादत दिवस (23 मार्च) के अवसर पर मुम्बई में नौजवान भारत सभा की तरफ़ से ‘शहीद स्मृति संकल्प अभियान’ चलाया जा रहा है। मानखुर्द-गोवंडी, मुम्बई की मज़दूर बस्तियों व अन्य इलाकों में पुस्तक प्रदर्शनी, फिल्म स्क्रीनिंग, प्रचार अभियान आदि के माध्यम से नौजवानों और आम मेहनतकश आबादी के बीच क्रान्तिकारियों की विरासत को लेकर जाने का काम किया जा रहा है। कल मानखुर्द के लाल्लूभाई कंपाउंड के पास पुस्तक प्रदर्शनी आयोजित की गई। इसमें युवाओं ने क्रान्तिकारियों की किताबों के बारे में जानने की…
Author: nbs_upload
नौजवान भारत सभे तर्फे अप्पर, बिबवेवाडी, पुणे भागातील तरुण कामगारांसोबत चर्चेचे आयोजन
नौजवान भारत सभेकडून 23 मार्च शहीद दिनानिमित्त सदस्यता अभियान राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी 16 मार्च रोजी तरुण कामगारांसोबत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू सारख्या क्रांतिकारकांनी केलेली देशाच्या स्वातंत्र्याची व्याख्या मांडली गेली. फक्त ब्रिटिशांना या देशातून घालवणे एवढेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट नव्हते तर एक असा समातमूलक समाज निर्माण करणे, जिथे कुठल्याही प्रकारचे शोषण नसेल, जिथे स्त्री-पुरुष भेद नसतील, जिथे जातीय-धार्मिक भेद नसतील, हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. या देशात कामगार-कष्टकऱ्यांचे राज्य आले पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे…
♦️नौजवान भारत सभा, पुणे तर्फे राबवल्या जाणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानातून जनतेला क्रांतिकारकांच्या विचारांची ओळख♦️
♦️नौजवान भारत सभा, पुणे तर्फे राबवल्या जाणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानातून जनतेला क्रांतिकारकांच्या विचारांची ओळख♦️ 23 मार्च, शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे क्रांतिकारी विचार, त्यांची प्रासंगिकता, त्यांच्या स्वप्नातील भारत व आजचा भारत यात असलेलं जमीन-आसमानाचं अंतर आणि ते भरून काढण्याची दिशा, ह्याचा विद्यार्थी-तरुणांत आणि कष्टकरी जनतेत प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने नौजवान भारत सभा तर्फे पुणे शहराच्या विविध भागांत विभिन्न स्वरूपांची अभियाने राबवली जात आहेत. पोस्टर प्रदर्शने, भेटीगाठी, बैठका अशा अनेकविध अभियानांतून भेटलेल्या तरुणांनी बेरोजगारी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, महागाई, असुरक्षा अशा अनेक नैराश्यमयी गोष्टी आणि हे देणाऱ्या भांडवली व्यवस्थेविरुद्ध…
नौजवान भारत सभे तर्फे सुप्पर, बिबवेवाडी, पुणे येथे सुरू असलेला शहीद आझाद स्पोर्ट्स क्लब निरंतर सुरू
नौजवान भारत सभे तर्फे सुप्पर, बिबवेवाडी, पुणे येथे सुरू असलेला शहीद आझाद स्पोर्ट्स क्लब निरंतर सुरू गेल्या महिनाभर सुरू असलेल्या आझाद स्पोर्ट क्लब मध्ये आतापर्यंत बॅडमिंटन आणि फुटबॉल शिकवले गेले होते. त्यामुळे या आठवड्यात जेव्हा क्रिकेट खेळणार असे सांगितल्यावर मुलांमध्ये खूप उत्सुकता होती. ह्या आठवड्यात मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात आले. बॉलिंग, बॅटिंग आणि क्रिकेट खेळाचे नियम शिकवण्यात आले. ह्या नंतर दोन संघांमध्ये विभागून एक क्रिकेटचा सामना खेळला गेला. सामना अतिशय रंगतदार झाला आणि मुलांना खेळायला मजा आली. तरीही मुलांनी दुसऱ्या दिवशी फुटबॉल खेळला जावा असा आग्रह धरला. आपल्या देशात क्रिकेट…
♦️16 मार्च को रविवार के दिन नौजवान भारत सभा,मुम्बई की मासिक इकाई बैठक सम्पन्न हुई, और शाम में ‘इंकलाब’ डॉक्यूमेंट्री की स्क्रीनिंग की गयी।♦️
नौजवान भारत सभा, मुम्बई द्वारा मासिक इकाई बैठक में अबतक के कामों की समीक्षा की गयी और 23 मार्च को क्रान्तिकारियों के शहादत दिवस पर ‘शहीद स्मृति संकल्प अभियान’ के तहत विभिन्न कार्यक्रमों की योजना बनायी गयी। शाम में क्रान्तिकारियों के जीवन संघर्ष और कुर्बानियों को जानने-समझने के लिए गौहर रज़ा द्वारा निर्देशित डॉक्यूमेंट्री ‘इंकलाब’ दिखायी गयी। डॉक्यूमेंट्री पर चर्चा के दौरान अलग-अलग साथियों ने अपने विचार रखे। शशांक ने डाक्यूमेंट्री के बारे में रखते हुए कहा कि 23 मार्च,1931 को अंग्रेज सरकार द्वारा भगतसिंह, राजगुरु और सुखदेव को फाँसी…
♦️नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित ‘शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात’ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले.♦️
मित्र-मैत्रिणींनो, नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे अभ्यास वर्ग सुरू आहेत. आगामी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. यात हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, मराठी इत्यादी विषयांसाठी अतिरिक्त शिकवणी वर्गांचा समावेश आहे. यामध्ये शंका निरसन सत्र, सराव परीक्षा घेणे आणि इतर महत्त्वाचे विषय पुन्हा शिकवले जात आहेत. आम्ही मानतो की सर्वांना निःशुल्क, समान आणि दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे; परंतु सरकार शिक्षणक्षेत्रातील आपल्या जबाबदारी फेटाळून देत आहे. आजच्या नफेखोर भांडवली व्यवस्थेमध्ये शिक्षणाला…
गेल्या चार आठवड्यापासून सुप्पर, बिबवेवाडी, पुणे येथे सुरू असलेल्या शहीद आझाद स्पोर्ट्स क्लबमध्ये शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त ( 27 फेब्रुवारी) मुलांना शहीद आझाद यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल माहिती देण्यात आली.
चंद्रशेखर आझाद! भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतिकारी आंदोलनातील असे नाव जे आजही अतिशय आदराने घेतले जाते, जे अजूनही कोणी विसरले नाही आणि विसरणे ही शक्य नाही! असे नाव ज्याने शोषणाविरुद्ध लढणाऱ्या आणि समतामुलक, न्याय्य समाजाचे स्वप्न बघणाऱ्या कित्येकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे, आणि आजही करत आहे. चंद्रशेखर आझाद खऱ्या अर्थाने भारताच्या क्रांतिकारी आंदोलनातील असा एक चकाकता तारा आहे, ज्याचा प्रकाश आजच्या घोर निराशेच्या काळात सुद्धा साम्राज्यवादी-भांडवली शोषणाविरुद्ध, हर प्रकारच्या असमानतेविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशेचा किरण देण्याचे काम करत आहे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कमालीची गरिबी, अशिक्षितता, धार्मिक कट्टरतेच्या वातावरणात झाला.…
Naujawan Bharat Sabha Organizes Discussion on “The Rise of Donald Trump and Its Significance”
Since Donald Trump swept the American presidential election last year, his series of executive orders—such as increasing tariffs on China, Canada, and Mexico and declaring a national emergency along America’s southern border—along with his numerous racist, xenophobic, and transphobic statements, have sent shockwaves across the world. Trump’s rise has sparked significant debate among progressives regarding whether the current political developments in the United States can be classified as fascism. A clear understanding of the distinctions between various forms of bourgeois reaction is crucial—not just for theoretical clarity but for developing…
नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक संगरूर, पंजाब येथे संपन्न!
मित्रांनो, नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान संगरूर, पंजाब येथे पार पडली. बैठकीत संघटनेच्या तात्कालिक व दीर्घकालीन योजनांवर चर्चा करण्यात आली. ह्यासोबतच संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला गेला आणि विविध आव्हानांवर चर्चाही करण्यात आली. तसेच कष्टकरी जनतेच्या समस्यांवर प्रचारात्मक आणि आंदोलनात्मक अभियाने व सदस्यत्वाचा विस्तार सुनिश्चित करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला. भगतसिंहांचा क्रांतिकारक वारसा देशातील व्यापक तरुणांपर्यंत नव्या उत्साहाने आणि दृढनिश्चयाने पोहोचवण्याचे आणि त्यांच्यामध्ये संघटनेचा जनआधार वाढवण्याचे देखील ह्यावेळी ठरले. परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर् ठराव मंजूर करण्यात आले आणि विविध विषयांवर भूमिका देण्यात आल्या.…
जामिया युनिवर्सिटी प्रशासनाच्या विद्यार्थी विरोधी कारवाईचा तीव्र निषेध!!
जामिया प्रशासनाने त्याचे विद्यार्थी विरोधी चरित्र पुन्हा उघडपणे सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांवर शारीरिक हल्ला केल्यानंतर प्रशासनाने जामिया मिलिया इस्लामिया परिसरात १७ विद्यार्थ्यांची नावे, पत्ते, संपर्क आणि इतर वैयक्तिक तपशील असलेली एक सूची मुख्य प्रवेशद्वार, कायदा संकुल प्रवेशद्वार आणि इतर परिसरात सार्वजनिकपणे लावली आहे. हे विद्यार्थी सोमवारपासून कॅम्पस लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या फाशिस्ट जामिया प्रशासनाविरोधात निदर्शने करत होते आणि त्यांना काल स्थानबद्ध करून नंतर निलंबित करण्यात आले. ही घटना विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचा भंग असून त्यांची सुरक्षितता धोक्यात आणते. यामध्ये काही तरुण विद्यार्थिनीही आहेत ज्यांचे फोन नंबरसुद्धा सार्वजनिक करण्यात आले आहेत. जामिया प्रशासन या…
