♦️नौजवान भारत सभा, पुणे तर्फे राबवल्या जाणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानातून जनतेला क्रांतिकारकांच्या विचारांची ओळख♦️

♦️नौजवान भारत सभा, पुणे तर्फे राबवल्या जाणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानातून जनतेला क्रांतिकारकांच्या विचारांची ओळख♦️

23 मार्च, शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे क्रांतिकारी विचार, त्यांची प्रासंगिकता, त्यांच्या स्वप्नातील भारत व आजचा भारत यात असलेलं जमीन-आसमानाचं अंतर आणि ते भरून काढण्याची दिशा, ह्याचा विद्यार्थी-तरुणांत आणि कष्टकरी जनतेत प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने नौजवान भारत सभा तर्फे पुणे शहराच्या विविध भागांत विभिन्न स्वरूपांची अभियाने राबवली जात आहेत. पोस्टर प्रदर्शने, भेटीगाठी, बैठका अशा अनेकविध अभियानांतून भेटलेल्या तरुणांनी बेरोजगारी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, महागाई, असुरक्षा अशा अनेक नैराश्यमयी गोष्टी आणि हे देणाऱ्या भांडवली व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त केला. अभियानांदरम्यान क्रांतिकारी शहीदांच्या स्वप्नातील भारत आणि आजचा क्रूर फॅशिस्ट सत्तेला बळी गेलेला भारत, ह्या फरकाला समजून घेत विद्यार्थी-तरुणांनी ह्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 23 मार्च रोजी शहीदांना खऱ्या अर्थाने क्रांतिकारी अभिवादन करण्यासाठी नौभास तर्फे आयोजित ‘शहीदांच्या स्मृतीत..’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा! #bhagatsingh #rajguru #sukhdev #shahiddivas #posters #books #revolution

Related posts

Leave a Comment

nineteen + 3 =