आज दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द, (मुंबई) याठिकाणी लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘वसा आणि वारसा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या क्रांतिकारी विचारांचा’ या विषयाला घेऊन अभियान चालविण्यात आले.

आज घडीला अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वच निवडणूक बाज पक्ष आणि त्यांच्या बटीक बनलेल्या संघटना साजरी करता आहेत. साठे नगर मध्ये देखील विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल कडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खरंतर अशा संघटना व अशा प्रकारच्या पक्षाकडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे कार्यक्रम घेणे किंवा त्यांचे नाव घेणे देखील त्यांच्या विचाराचा व कर्तुत्वाचा अपमान आहे. असे म्हणावे लागेल कारण लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा लढा हा पूर्ण आयुष्य जातिव्यवस्था निर्मूलन झाले पाहिजे, गरीबी व श्रीमंती ही दरी पूर्णपणे संपून सर्वांना समान अधिकार व…

शहीद राजगुरु यांच्या 111व्या जन्मदिना निमित्त कामगार कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींना वक्तृत्वाची संधी!

संघर्ष आणि निर्माण या दोहोंची सांगड घालत नौभास शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या विचारांमधील क्रांतीकारी परिवर्तनाचा प्रचार करत आहे.”जनतेची सेवा करा” हा नौजवान भारत सभेचा नारा आहे. नौजवान भारत सभा, पुणे युनिटद्वारे हा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 130, दांडेकर पूल वस्तीमध्ये शिक्षण सहायता केंद्र व ग्रंथालय चालवते आणि कामगार-कष्टकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे याचा नेहमी प्रयत्न करत असते. शहीद शिवराम राजगुरू यांच्या 111व्या जन्मदिना(24 ऑगस्ट) निमित्त वस्तीमध्ये 7 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 25 ऑगस्ट, रविवार रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अनेक मुलांनी उत्साह दाखवत ‘भगत सिंह व…

दि. २५ ऑगस्ट रोजी नौजवान भारत सभा द्वारे क्रांतीकारी शहीद राजगुरू यांच्या १११ व्या जयंती निमित्त मानखुर्दमध्ये अभियान चालविण्यात आले.

दरम्यान जागोजागी चौक सभा घेण्यात आल्या व पत्रके वाटण्यात आले. राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, अश्फाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पण प्रश्न आहे या सर्व क्रांतीकारकांना ज्या जसा स्वतंत्र भारत आज स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर देखील निर्माण होऊ शकला नाही. क्रांतीकारकांची स्पष्ट भूमिका होती की, काँग्रेस आणि गांधीच्या नेतृत्वामध्ये जे स्वातंत्र्य मिळणार आहे. ते स्वतंत्र अर्धवट स्वतंत्र असेल, त्यामुळे मूठभर इंग्रज निघून जातील आणि भारतीय भांडवलदार, उद्योगपतींचे राज्य येईल आणि स्वतंत्र्या नंतर देखील हे शोषणाचा तंत्र याच पद्धतीने चालू राहील. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यासाठी…

दि.१८/०८/२०१९ रोजी ‘नौजवान भारत सभा’ द्वारे साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे ‘भारतीय स्वातंत्र्याचे ७२ वर्ष आणि कलम ३७० चा प्रवास…’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले

आज दि.१८/०८/२०१९ रोजी ‘नौजवान भारत सभा’ द्वारे साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे ‘भारतीय स्वातंत्र्याचे ७२ वर्ष आणि कलम ३७० चा प्रवास…’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दरम्यान ‘नौवजवान भारत सभा’ कडून अविनाश ने प्रास्ताविक करत असताना गेल्या ७२ वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतर देशाची परिस्थिती व आजच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भामध्ये म्हणणे मांडत असताना. आज सुद्धा बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, उपासमार, वाढती सांप्रदायिकता, कामगार कपात व ऑटोमोबाईल सेक्टर पासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाढत असलेली मंदी व डबघाईस आलेली देशाची परिस्थिती असे असताना बीजेपी सरकारने ‘माहितीचा अधिकार’ (आरटीआय) संपवणे, यूएपीए सारखे अन्यायकारी कायदे सक्तीने…

दिनांक ०१/०८/२०१९ रोजी साठेनगर,मानखुर्द, मुंबई येथे ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शिक्षण सहायत केंद्र’ चा उद्घाटन समारंभ पार पडला.

दिनांक ०१/०८/२०१९ रोजी साठेनगर,मानखुर्द, मुंबई येथे *लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शिक्षण सहायत केंद्र* चा उद्घाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले. कॉम्रेड नागेश धुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कॉम्रेड बबन ठोके यांनी शिक्षणाचे महत्व सांगत आपल्या साठेनगर सारख्या झोपडपट्टी मध्ये शिक्षणाच्या अभावामुळे होणाऱ्या दुर्दशेवर बोट ठेवले. तर आज आपल्याला जे शिक्षण मिळते ते पूर्णपणे भांडवली व नफा-तोटा यावर आधारित शिक्षण आहे आणि ज्यांच्याकडे जेवढा पैसा त्यांना त्या पद्धतीचे शिक्षण असं सूत्र प्रस्थापीत व्यवस्थेने तयार करून ठेवले आहे. खरंतर सर्वांना समान व मोफत शिक्षण मिळायला पाहिजे…

तरुणांना आवाहन – पीटर क्रोपोतकिन, अनुवाद – सोमनाथ केंजळे

प्रिन्स पीटर क्रोपोतकिन (१८४२-१९२१) एक प्रसिद्ध रशियन अराजकतावादी क्रांतीकारी होते. तसेच नावाजलेले भूगर्भ शास्त्रज्ञ आणि भुगोलाचे तज्ज्ञही होते. *पण १८७० च्या दशकांत हे सगळं सोडून क्रांतीकारी आंदोलनात सामील झाले. त्यांना अटक करण्यात आली, मात्र ते निसटून विदेशात गेले आणि १८८६ मध्ये इंगलंडमध्ये स्थायिक झाले. ‘अॅन अपील टू यंग’ नावाचा हा त्यांचा प्रसिद्ध लेख आहे जो त्यांनी आपला व्यवसाय निवडू पाहणाऱ़्या़् युवक-युवतींना संबोधीत करण्यासाठी लिहीला आहे. हा लेख सर्वात प्रथम क्रोपोतकिनचे पत्र ‘ला रिवोल्ट’ मध्ये १८८॰ मध्ये प्रकाशीत केला होता. त्यानंतर जगभरात तो एका पत्रकाच्या रूपामध्ये वारंवार छापण्यांत येत आहे. आजही…

डॉ पायल तडवी जातीय छळ आणि आत्महत्या मुद्द्यावर नौजवान भारत सभा, पुणे तर्फे मंगळवार 28 मे रोजी दांडेकर पूल चौकात निदर्शने करण्यात आली.

 नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून या आंदोलनाला आपले समर्थन व्यक्त केले. जातीयवाद मुर्दाबाद, ब्राह्मणवाद मुर्दाबाद, डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस भाग पडणाऱ्या डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे, नायर हॉस्पिटल प्रशासन मुर्दाबाद अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

नौभास आयोजित पाच दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराची सांगता.

२३ ते २७ मे दरम्यान विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचे आयोजन शहरातील महाराष्ट्र बालक मंदिर,अहमदनगर येथे करण्यात आले होते.मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट म्हणजे १२५ विद्यार्थी इतकी होती.सरासरी १०० विद्यार्थी संपूर्ण शिबिरा दरम्यान हजर राहिले. शिबिराच्या पहिल्या दिवशी चित्रकला विषयाबाबत प्रमोद तापकिरे यांनी मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनीही स्वतःची कल्पकता वापरून सुंदर चित्रे रेखाटली. दुसर्या दिवशी शाडू माती पासून शिल्प बनवण्याच्या उपक्रमात विषयी विकास कांबळे यांच्या सहवासात विद्यार्थ्यांनी बनवलेली शिल्पे आश्चर्यचकित करून सोडणारी होती. तिसरा दिवस सहलीच्या धम्माल मज्जेचा होता. साईबन-कृषी पर्यटन केंद्रामध्ये ही सहल नेण्यात आली होती, जिथे बोटिंग पासून…

नौजवान भारत सभा व इतर सहयोगी संघटनां तरफे जारी पत्रक

बलात्काऱ्यांच्या समर्थनात आंदोलने: न्यायाची नवीन संघी, भाजपाई व्याख्या! देशातील महिलांवरील वाढत्या अपरांधांविरोधात एकजूट व्हा! फासीवाद नष्ट करा! पितृसत्ता मुर्दाबाद ! संघी गुंड मुर्दाबाद! मार्ग मुक्तीचा घडवावा लागेल, जगायचं तर लढावं लागेल! साथींनो, गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या दोन अत्यंत निंदनीय घटना समोर आल्या आहेत. कठुआ, जम्मु-काश्मिर येथे आठ वर्षांच्या मुलीवर सहा लोकांनी सात दिवस सामुहिक बलात्कार केला आणि नंतर तीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सुद्धा या कामात बलात्काऱ्यांना साथ दिली. उन्नाव, उत्तर प्रदेश येथे भाजपचे आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून एका महिलेचा बलात्कार केला आणि विरोध केला म्हणून तिच्या वडिलांना मारहाण…

नौजवान भारत सभा, महाराष्ट्राच्या वतीने 2 एप्रिलच्या भारत बंदच्या निमित्ताने काढलेले पत्रक

मित्रहो, जर तुम्ही मानवतेच्या बाजूने असाल, जर तुम्ही मेहनत करणारे मजूर असाल किंवा साफ मनाचे बेरोजगार युवक असाल जे सर्व अडचणी असूनही आपल्या आसपासच्या लोकांच्या वेदनेने दुःखी होतात आणि काही करण्याचा विचार करतात, तर हे पत्रक तुमच्यासाठी आहे. तुम्हाला माहितच आहे की *देशभरात आजकाल जनतेच्या विविध हिश्श्यांच्या संरक्षणासाठी बनलेले कायदे कमजोर करण्याचा काळ चालू आहे.* काही कायदे सरळ संसदेत बदलले जात आहेत तर काही कोर्टाद्वारे आदेश घेऊन बदलवले जात आहेत. मोदी सरकार *’व्यापार करण्याच्या सुलभतेच्या’ नावाने विविध श्रम कायदे शिथिल करण्याची योजना बऱ्याच काळापासून बनवत आहे आणि या योजनेचा मसुदा…