हलगर्जी प्रशासनाला हलवले ! शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नौजवान भारत सभा आणि आंबिलओढा परिसर पूरग्रस्त नागरिक संघर्ष समिती, पुणे तर्फे अतिरिक्त नुकसान भरपाई, थकीत असलेली रु. 15,000 ची मदत, पंचनामे, वीज बील माफी, शैक्षणिक सामान भरपाई, उपजीविका नुकसान भरापाइ, घरभाडे, इत्यादी प्रश्नांवर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले गेले. आंबिल ओढा परिसरातील 129 दांडेकर पूल, 130 दांडेकर पूल, 133 दांडेकर पूल, 134 दांडेकर पूल, 214 दांडेकर पूल, आंबेडकर वसाहत, टांगेवाला कॉलनी, राजेंद्रनगर , अण्णाभाऊ साठे वसाह्त, येथील शेकडो नागरिक आजच्या आंदोलनामध्ये सामील झाले होते. यापूर्वी…
Author: nbs_upload
अतिरिक्त नुकसान भरपाई करिता विविध वसाहतींमधील नागरिक एकजूट
अतिरिक्त नुकसान भरपाई करिता विविध वसाहतींमधील नागरिक एकजूट दिनांक 3 नोव्हेंबार रोजी आंबिल ओढा (पुणे) परिसरातील *129 दांडेकर पूल, 130 दांडेकर पूल, 133 दांडेकर पूल, 134 दांडेकर पूल, 214 दांडेकर पूल, आंबेडकर वसाहत, टांगेवाला कॉलनी, राजेंद्रनगर , अण्णाभाऊ साठे वसाह्त,* येथील 200 पेक्षा जास्त पूरग्रस्त नागरिकांनी मिळून, नौजवान भारत सभेच्या समन्वयाने एकत्र येऊन, निळू फुले सभागृह (साने गुरुजी शाळा परिसर) येथे आंबिल ओढा पुरग्रस्त नागरिक संघर्ष समिती स्थापन केली आहे. सरकार देऊ करत असलेली रु. *15,000 मदत ही अत्यंत अपुरी आहे* आणि उपजिवीका, जीवनावश्यक वस्तू, रोजगार, घर, मुलांचे शालेय साहित्य,…
आंबिलोढा परिसर पूरग्रस्त आंदोलन अपडेट आज अण्णाभाऊ साठे वसाहत येथे पूरग्रस्त नागरिकांशी चर्चा करण्यात आली व नुकसानीचे व्हिडीओ डॉउमेन्टेशन केले तसेच विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. शासनाने देऊ केलेली रु 15000 मदत अत्यंत कमी आहे अशी संतप्त भावना सर्वांनी व्यक्त केली
आंबील ओढा परिसर पूरग्रस्त आंदोलन अपडेट आज 129 दांडेकर पूल येथे नागरिकांची भेट घेऊन पूर्ण नुकसानभरपाई बद्दल चर्चा केली गेली
आंबील ओढा परिसर पूरग्रस्त आंदोलन अपडेट 130 दांडेकर पूल येथे अभियान राबवून पूरग्रस्तांना साथ देण्याचे आवाहन नौभास तर्फे करण्यात आले
15 ऑक्टोबर रोजी आंबिल ओढा परिसरातील पुरग्रस्त नागरिकांचे आंदोलन
आंबिलओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समितीतर्फे, तसेच `नौजवान भारत सभे’च्या पाठिंब्याने आज 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. 25 सप्टेंबर रोजीच्या ढगफुटीनंतर आंबिलओढा परिसरामध्ये अनेकांची घरे वाहून गेली, घरांच्या भिंती पडल्या, घरात गाळ साचून सर्व वस्तूंचे नुकसान झाले , मुलांच्या वह्यापुस्तकांपासून ते अंथरूण-पांघरूण सगळे नष्ट झाले, हातावर पोट असलेल्या कष्टकरी जनतेची आयुष्याची कमाई उध्वस्त झाली परंतू 3 आठवड्यांनंतरही सरकारी मदत पोहोचलेली नाही. यामुळे संतप्त असलेल्या नागरिकांना शेवटी आंदोलनाचाच मार्ग धरावा लागला. यावेळी आचारसंहितेचे निमित्त सांगून मेगाफोन न वापरण्याचे आणि घोषणा न देण्याचा आग्रह…
नौजवान भारत सभेची पंजाब समिती आणि सिरसा टीम द्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान नोटाचे बटण दाबण्याचा प्रचार करणाऱ्या अभियानाबद्दल त्यांनी जाहीर केलेले खोटे वक्तव्य आणि नौभास ची भूमिका
नौजवान भारत सभेची पंजाब समिती आणि सिरसा टीम द्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान नोटाचे बटण दाबण्याचा प्रचार करणाऱ्या अभियानाबद्दल त्यांनी जाहीर केलेले खोटे वक्तव्य आणि नौभास ची भूमिका ——————————————————— सर्व प्रथम ही माहिती देणे आवश्यक आहे की यापुढे नौभासच्या केंद्रीय फेसबुक पेज ची लिंक पुढीलप्रमाणे असेल: https://www.facebook.com/naubhas/ जुने पेज: https://www.facebook.com/naujavanbharatsabha/ इथून पुढे नौजवान भारत सभेच्या सर्वसाधारण सभेचे प्रतिनिधित्व करत नाही. जुन्या पेजवरून टाकण्यात आलेल्या कुठल्याही साहित्यासाठी नौजवान भारत सभा जबाबदार असणार नाही. हे जुने फेसबुक पेज आता भाषिक अस्मितावाद आणि भांडवली-राष्ट्रवादी विचलन झालेल्या नौभासच्या पंजाब समितीच्या नियंत्रणात आहे. नौभासच्या पंजाब समितीचे…
दिनांक 26, 27 रोजी पुण्यातील आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग, नौजवान भारत सभा आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान आणि औषध उपचार केंद्र चालवण्यात आले
पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्या नंतर दिनांक 26, 27 रोजी पुण्यातील आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग, नौजवान भारत सभा आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले. आधीच ओढ्यालगत असलेली कामगार-कष्टकऱ्यांची नाजुक, कच्ची खुराडांसारखी घरं, आयुष्य भराच्या कंबरतोड़ मेहनतीतुन जमा केलेली, कर्ज उचलून आणि नंतर फेडण्यात पाठ मोडेस्तोवर केलेल्या मेहनतीतुन घेतलेल्या संसाराच्या चीज-वस्तु, कपड़े, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य, लहान मुलांची खेळनी, वह्या-पुस्तकं, दप्तरं, कोणी नुकताच छोटा धंदा चालू करण्यासाठी कर्जावर काढलेला माल,…
पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्यानंतर 27 सप्टेंबरला आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात नौजवान भारत सभा, प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले.
पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्यानंतर 27 सप्टेंबरला आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात नौजवान भारत सभा, प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले. आधीच नाजुक, कच्ची खुराडयासारखी असलेली कामगार कष्टकऱ्यांची घरं, आयुष्य भराच्या कंबरतोड़ मेहनतीतून जमा केलेली, कर्ज उचलून आणि नंतर फेडण्यात पाठ मोडेस्तोवर केलेल्या मेहनतीतुन घेतलेल्या संसाराच्या चीज-वस्तु, कपड़े, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य, नुकताच छोटा धंदा चालू करण्यासाठी कर्जावर काढलेला माल, उदरनिर्वाहाचे साधन असं सगळ-सगळ उध्वस्त झाले आहे. लहान मुलांची खेळणी,…
दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द (मुंबई) याठिकाणी ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचाराचे खरे वारसदार कोण?’ या विषयाला घेऊन पूर्ण साठे नगर मध्ये अण्णाभाऊ यांच्या कविता, पोवाडे व साहित्यामधील परखड विचार पोस्टरच्या माध्यमातून ठीक – ठिकाणी लावण्यात आले
दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द (मुंबई) याठिकाणी ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचाराचे खरे वारसदार कोण?’ या विषयाला घेऊन पूर्ण साठे नगर मध्ये अण्णाभाऊ यांच्या कविता, पोवाडे व साहित्यामधील परखड विचार पोस्टरच्या माध्यमातून ठीक – ठिकाणी लावण्यात आले. त्यामध्ये ‘ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून, दलित – श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा प्रकारच्या वैज्ञानिक तर्कशील विवेकी व परंपरागत धार्मिक मूल्य मान्यता यांना छेद देणाऱ्या विचारांचा समावेश करण्यात आला तर, मुंबईत उंचावरी ! मलबार हिल इंद्रपुरी ! कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती ! परळात राहणारे ! रात्रंदिवस…
