पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्यानंतर 27 सप्टेंबरला आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात नौजवान भारत सभा, प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले.

पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्यानंतर 27 सप्टेंबरला आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात नौजवान भारत सभा, प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले.
आधीच नाजुक, कच्ची खुराडयासारखी असलेली कामगार कष्टकऱ्यांची घरं, आयुष्य भराच्या कंबरतोड़ मेहनतीतून जमा केलेली, कर्ज उचलून आणि नंतर फेडण्यात पाठ मोडेस्तोवर केलेल्या मेहनतीतुन घेतलेल्या संसाराच्या चीज-वस्तु, कपड़े, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य, नुकताच छोटा धंदा चालू करण्यासाठी कर्जावर काढलेला माल, उदरनिर्वाहाचे साधन असं सगळ-सगळ उध्वस्त झाले आहे. लहान मुलांची खेळणी, वह्या-पुस्तकं, दप्तर खराब झालीत. जड़-हताश मनानी लोकांनी ती विल्हेवाटीसाठी बाहेर काढली. काम न करू शकणाऱ्या अपंग, गरोदर बायका, लहान मूलं, म्हातारी माणसांची परिस्थितिचे तर वर्णनच होऊ शकत नाही. संपूर्ण वस्तीची स्थिति अत्यंत विदारक झालेली आहे.
घरात गाळ, पाणी घरातल्या चीज-वस्तु सडायला सुरु होऊन उग्र वास, चेंबर तुंबून घाण पसरली आहे. रस्त्यावर व घरात घाण आणि प्रचंड दुर्गंधी पसरत आहे, खचकन कुठेही सडलेल्या घाणीत, चिखलात पाय रुतुन बसेल अशी तेथली परिस्थिति आहे. वस्तीत शिरलेल्या पाण्यानी कष्टकरी कामगार जनतेचा पूर्ण संसार उध्वस्त झाला आहे.
त्यामुळे घरातल्या चीज-वस्तु सडायला सुरु होऊन उग्र वास, जिथे-तिथे चेंबर तुंबून घान भसाभस रस्त्यावर, घरात प्रचंड दुर्गंधि घेऊन  शिरत आहे. खचकन कुठेही सडलेल्या घाणीत, चिखलात पाय रुतुन बसेल असे पाऊल पडेल तेथली परिस्थिति आहे. वस्तीत शिरलेल्या पाण्यानी कष्टकरी कामगार जनतेचा संपूर्ण संसार उध्वस्त झाला आहे. पुणे मनपा आणि राज्य सरकारच्या गंभीर दुर्लक्ष, अव्यवस्था, असंवेदनशीलता आणि मदतीच्या तूटीने परिस्थिति अजुन जास्त गंभीर बनलेली आहे. त्यामुळे लोकांना मदतीची अत्यंत गरज आहे.
आम्ही पूर्ण ताकतीनी मदतीसाठी उतरलो आहोत आणि येते 3-4दिवस दांडेकर पुल 130, राजेंद्र नगर आणि अम्बिल ओढ्याचा उर्वरित भागात स्वच्छ्ता अभियान आणि औषध उपचार केंद्र चालू करणार आहोत. तुम्ही सुद्धा स्वयंसेवक बनून जरूर सामील व्हा आणि इतर स्वरूपातील जसे जीवनावश्यक गोष्टी, कपड़े, औषधे, आपात्कालीन संच-उपकरणे इ. (क्लोरीन गोळ्या, गम बूट, ग्लोव्स, मास्क इ.) आणि मोहिमेच्या खर्चास आर्थिक योगदान द्या, आम्हाला निधी एकत्रित करण्यास मदत करा.
संपर्क
रवीशंकर पूर्णे- 8956840785
निखिल- 8669735643
पूजा – 7588733724

Related posts

Leave a Comment

eighteen − seventeen =