पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्या नंतर दिनांक 26, 27 रोजी पुण्यातील आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग, नौजवान भारत सभा आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले.
आधीच ओढ्यालगत असलेली कामगार-कष्टकऱ्यांची नाजुक, कच्ची खुराडांसारखी घरं, आयुष्य भराच्या कंबरतोड़ मेहनतीतुन जमा केलेली, कर्ज उचलून आणि नंतर फेडण्यात पाठ मोडेस्तोवर केलेल्या मेहनतीतुन घेतलेल्या संसाराच्या चीज-वस्तु, कपड़े, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य, लहान मुलांची खेळनी, वह्या-पुस्तकं, दप्तरं, कोणी नुकताच छोटा धंदा चालू करण्यासाठी कर्जावर काढलेला माल, उदरनिर्वाहाचे साधन सगळ-सगळ उध्वस्त झाले आहे. जड़-हताश मनानी लोकांनी हे सर्व विल्हेवाटीसाठी बाहेर काढले. काम न करू शकणाऱ्या अपंग व्यक्ति, गरोदर बायका, लहान मूलं, म्हाताऱ्या माणसांच्या परिस्थितिचे तर वर्णनच होऊ शकत नाही. संपूर्ण वस्तीची स्थिति अत्यंत विदारक झालेली आहे.
प्रत्येक घरात गाळ, पाणी साचलेले आहे त्यामुळे घरातल्या चीज-वस्तु सडायला सुरु होऊन उग्र वास, जिथे-तिथे चेंबर तुंबून घान भसाभस रस्त्यावर, घरात प्रचंड दुर्गंधि घेऊन शिरत आहे. खचकन कुठेही सडलेल्या घाणीत, चिखलात पाय रुतुन बसेल असे पाऊल पडेल तेथली परिस्थिति आहे.
वस्तीत शिरलेल्या पाण्यानी कष्टकरी कामगार जनतेचा संपूर्ण संसार उध्वस्त झाला आहे. पुणे मनपा आणि राज्य सरकारच्या गंभीर दुर्लक्ष, अव्यवस्था, असंवेदनशीलता आणि मदतीच्या तूटीने परिस्थिति अजुन जास्त गंभीर बनलेली आहे. त्यामुळे लोकांना मदतीची अत्यंत गरज आहे.
आम्ही पूर्ण ताकदीने मदतीसाठी उतरलो आहोत आणि येते 3-4 दिवस दांडेकर पुल 130, राजेंद्र नगर आणि अम्बिल ओढ्याचा उर्वरित भागात स्वच्छ्ता अभियान आणि औषध उपचार केंद्र चालू करणार आहोत. तुम्ही सुद्धा स्वयंसेवक बनून जरूर सामील व्हा.
निखिल पंढरीनाथ एकडे,
ए / सी क्रमांक: 98260100010701
आयएफएससी: BARB0DRCBJM,
बँक ऑफ बडोदा बी.जे.एम.सी विस्तार शाखा, पुणे
(आपण आपले योगदान हस्तांतरित केल्यावर कृपया डॉ. निखिल यांना कळवा.)
आपल्या मदतीचा हात शक्य तितका वाढवा! देशातील तरुण ह्या नात्याने आपण आपल्या समाजाच्या गरजांसाठी उभे राहिले पाहिजे.
प्रत्येक प्रयत्न हा महत्वाचा असतो
संपर्क
डॉ निखिल- 8669735643
डॉ पूजा – 7588733724
रवीशंकर पुरणे – 8956840785
