आंबिलओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समितीतर्फे, तसेच `नौजवान भारत सभे’च्या पाठिंब्याने आज 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. 25 सप्टेंबर रोजीच्या ढगफुटीनंतर आंबिलओढा परिसरामध्ये अनेकांची घरे वाहून गेली, घरांच्या भिंती पडल्या, घरात गाळ साचून सर्व वस्तूंचे नुकसान झाले , मुलांच्या वह्यापुस्तकांपासून ते अंथरूण-पांघरूण सगळे नष्ट झाले, हातावर पोट असलेल्या कष्टकरी जनतेची आयुष्याची कमाई उध्वस्त झाली परंतू 3 आठवड्यांनंतरही सरकारी मदत पोहोचलेली नाही. यामुळे संतप्त असलेल्या नागरिकांना शेवटी आंदोलनाचाच मार्ग धरावा लागला.
यावेळी आचारसंहितेचे निमित्त सांगून मेगाफोन न वापरण्याचे आणि घोषणा न देण्याचा आग्रह पोलिस प्रशासनाकडून करण्यात आला. परंतु त्याला न जुमानता जनतेने जोरदार घोषणाबाजी करत आपली एकजूट व्यक्त केली. ‘नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे’, ‘लडेंगे, जितेंगे’, ‘इंकलाब जिंदाबाद’, ‘नुकसान भरपाई 20,000’, ‘ओढ्याची भिंती बांधून द्या’, ‘पक्के घर, आपला हक्क’, ‘कामगार-कष्टकऱ्यांची एकजूट जिंदाबाद’, ‘आचारसंहिता जीव घेणार काय?’ अशा घोषणा देत जनतेने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. अनेक नागरिकांनी यावेळी झालेल्या नुकसानीचे वर्णन करत आपले वक्तव्य मांडले.
प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आल्यानंतर, संघर्ष समितीचे सदस्य आणि ‘नौजवान भारत सभे’चे कार्यकर्ते डॉ. निखिल एकडे यांनी मांडले की प्रतिनिधी मंडळाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की रु. 5000 तत्काळ नुकसान भरपाई देण्यात येईल आणि अधिक रु. 10,000 शासनाकडून मान्यता मिळाल्यावर देता येईल. परंतु नागरिकांचे जे संपूर्ण नुकसान झाले आहे , घरे पडली आहेत, भिंती पडल्या आहेत, चीजवस्तूंचे जे नुकसान झाले आहे ती भरपाई देणे नियमातच बसत नाही असे धक्कादायक उत्तर त्यांनी दिले. सर्व जनता पुरस्थितीमुळे अत्यंत भीषण परिस्थितीमध्ये आहे, त्यामुळे सध्या मिळत असलेली मदत लगेच घेऊन थोडा दिलासा जनतेला मिळावा यासाठी आजचे आंदोलन स्थगित करावे, परंतु जनतेच्या फक्त पुनर्वसनाची मागणी ही नियमांच्या बाहेर आहे असे प्रशासनाचे म्हणणे असेल तर यापुढे नियम बनवून घेण्यासाठी आणि बदलवण्यासाठी, आणि इतर मागण्यांसाठी यापुढे लोकप्रतिनिधी, सरकार, कायदेमंडळ या सर्वांसोबत संघर्ष करावा लागेल असे डॉ. निखिल यांनी मांडले. 26/11 हल्ल्यानंतर टाटांना रु.. 500 कोटी मदत सरकारने दिली होती, विविध अपघातांमध्ये पीडीतांना 1 लाख ते 10 लाख सरळ मदत दिली जाते, मग पूरग्रस्त गरिब कष्टकरी जनतेबाबत जर भेदभाव होत असेल, तर जनतेला आता नियमांना बदलवून घेण्यासाठी लढावे लागेल असे डॉ. निखिल यांनी मांडले. यावेळी सर्व पूरग्रस्तांच्या मुख्य मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला आणि एकता टिकवून आंदोलन पुढे चालूच राहिले असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
तात्काळ मागण्या
1. पुढील 3 महिन्यांसाठी राशन व किराणा आणि गरजेनुसार कपडे, चादरी-ब्लॅंकेट्स, चटई, भांडे, लाईट-बल्ब इ. जीवनावश्यक, व संसारोपयोगी वस्तू घरटी पोहोचवण्यात याव्या
2. तात्काळ घरटी रु 20,000 आर्थिक मदत देण्यात यावी
3. निराधार व्यक्तीं: अपंग, वृद्ध, अनाथ, दीर्घकालीन आजारग्रस्त व्यक्तीची 4 महीने संसाराची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी
4. ज्यांची घरं पडलेली आहेत, असुरक्षित किंवा ओढ्याला लागून व अत्यंत धोक्याची आहेत किंवा खुप जास्त कोंदट आहेत किंवा ज्या घरात अजूनही जास्त पाऊस आल्यावर नाल्याचे-चेंबरचे पाणी शिरत आहे त्यांची घरं व्यवस्थित होईपर्यंत राहण्याची योग्य व्यवस्था करावी किंवा पर्यायी रहिवाशी व्यवस्थेसाठी वर्षभराचे घरभाड़े देण्यात यावे
5. सायकल, मोटरसायकल, रिक्षा, हातगाडी, टपरी, किराणा दुकान, धंद्याची अवजारं इ. उपजीविकेच्या साधनांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना उपजीविकेची साधनं किंवा पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा
6. विद्यार्थी तरुणांची आणि मुलांच्या शाळा-कॉलेजची फी, परीक्षा फी माफ करावी. विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकं, दप्तर व इतर शालोपयोगी वस्तू देण्यात याव्या
7. थकलेली विज बिलं माफ करण्यात यावी
8. घरांची डागडुजी, नळ, मीटरची आणि इतर निघालेली कामं शासना कडून करुन देण्यात यावी
9. येत्या 2महिन्यात आजारी पडणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा संपूर्ण उपचार खर्च शासनाने उचलावा
10. ओढ्याला ऊंच व मजबूत भींत बांधूंन देण्यात यावी
प्रमुख मागण्या
1. घरातील चिजवस्तूंची व इतर झालेली संपूर्ण नुकसान भरपाई लवकरात-लवकर देण्यात यावी
2. झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वांना पुररेषा लक्षात घेऊन पक्की सुविधायुक्त घरं देण्यात यावी
आंबिलओढा परिसर पूरग्रस्त नागरिक संघर्ष समिती
हनुमंत फड़के, हनुमंत कांबळे, आलम जमील शेख, युवराज माने, वनिता डोलारे, लक्ष्मीताई खंडू पवार, अज्जू शेख, चंद्रकांत भिसे, आफताब शेख, अप्पा भालशंकर, सुखदेव वाघमारे, गणेश गुंड, केशव माने, धनाजी कसबे, दीपक कांबळे, मुक्ताताई माने, लक्ष्मी तेलवड़े, सविता सचिन साठे, वंदना मोरे, लताताई आईवळे, शितल राजगुरु, समीर अडसुळ, राम खंडागळे, नितिन रोकड़े, डॉ निखिल एकडे, रवि पुर्णे
संपर्क
डॉ. निखिल एकडे 8669735643 (नौजवान भारत सभा)