आज घडीला अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वच निवडणूक बाज पक्ष आणि त्यांच्या बटीक बनलेल्या संघटना साजरी करता आहेत. साठे नगर मध्ये देखील विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल कडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खरंतर अशा संघटना व अशा प्रकारच्या पक्षाकडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे कार्यक्रम घेणे किंवा त्यांचे नाव घेणे देखील त्यांच्या विचाराचा व कर्तुत्वाचा अपमान आहे. असे म्हणावे लागेल कारण लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा लढा हा पूर्ण आयुष्य जातिव्यवस्था निर्मूलन झाले पाहिजे, गरीबी व श्रीमंती ही दरी पूर्णपणे संपून सर्वांना समान अधिकार व समान संधी मिळाली पाहिजे व सर्वांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि कामगार कष्टकऱ्यांचे राज्य तयार व्हावे कारण सुई पासून जहाजा पर्यंत सर्व निर्माण कार्य हे हेच कष्टकरी लोक करत असतात. याची साक्ष देत अण्णाभाऊ यांचे साहित्य जिवंत आज देखील खंबीरपणे उभे आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आणि इतर निवडणूक बाज पक्ष मतांचं राजकारण करण्यासाठी व बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटना आज दलितांच्या वेगवेगळ्या जातीय समूहांमध्ये त्या ठिकाणी तरुणांना भ्रमित करून, हिंदु राष्ट्र निर्मितीच्या गप्पा सांगून, मुस्लिम विरोधी गरळ ओकण्यासाठी तयार करत आहेत. साठे नगर मध्ये सुद्धा हाच प्रयोग गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने सुरू आहे तर दुसरीकडे ‘नौजवान भारत सभा’ अशा सर्व विषारी प्रयोगाच्या विरोधामध्ये खंबीरपणे उभी आहे. समाजात वैज्ञानिक, तर्कशील, विवेकवादी विचार रुजले पाहिजे. जाती, धर्म, भाषा, प्रांत हे सर्व मुद्दे आपल्याला परस्पर लढविण्यासाठी वापरले जातात. अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यामध्ये कधीही जातीचे गुणगाण गायले नाहीत किंवा मातंग असण्याचा गर्भ बाळगले नाही किंवा कोणत्याही अशा संघटना किंवा पक्षाच्या बरोबरीला उभे राहिली नाहीत. जे जाती व वर्णव्यवस्थेचे उघडपणे समर्थन करत असतील.
अशामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा पुन्हा एकदा नव्याने जागर करत अण्णाभाऊ साठे यांचा वैचारिक प्रेरणा स्त्रोत समजून घेत. खऱ्या अर्थाने कामगार, कष्टकरी वर्गीय एकजूट आणि यामध्ये तरुणांच्या भूमिकेवर प्रकर्षाने जोर देण्यात आला. पुढे अनेक सभा झाल्या आणि अनेकांनी आपले म्हणणे मांडले व अशा प्रकारच्या अण्णाभाऊ साठे यांच्या भगवेकरण करण्याच्या प्रक्रियेला विरोध करत. या दाम्भिकातेचा निषेध करण्यात आला.
नौभास की तरफ से आज अण्णा भाऊ साठे के बारे में साठे नगर के आम निवासियों को बताया गया। आज अण्णाभाऊ साठे को विश्व हिन्दू परिषद और बजरंग दल अपनाना चाहते है।जो उनके विचारों के विरुद्ध जाता है
