पुणे शहरातच गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची ही चौथी घटना आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) येथे ‘राम के नाम’ या चित्रपटाचे प्रदर्शन केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेच्या गुंडांनी येथील विद्यार्थ्यांवर नियोजनबद्धपणे हल्ला केला. तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडले. 23 जानेवारी रोजी झालेल्या या हल्ल्यामध्ये स्पष्टपणे पोलीसही सहभागी होते हे दिसून आले, कारण पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असून सुद्धा मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही, उलट ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांनाच ताब्यात घेऊन त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. ही घटना ताजी असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील…
Author: nbs_upload
एफ.टी.आय.आय. व ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या फॅसिस्ट हल्ल्याच्या विरोधातील आंदोलनाचे मिडियामध्ये आलेल्या बातम्या
नौजवान भारत सभेच्या आणि स्त्री मुक्ती लीग वतीने मुंबईच्या साठे नगर (खाडी) भागात प्रशासनातर्फे तोडण्यात आलेल्या कष्टकरी वस्तीत चालवले जात आहे शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र आणि सावित्री फातिमा अभ्यास गट!!
मुंबई येथील मानखुर्दच्या साठे नगर (खाडी) भागात 24 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेद्वारे 500 ते 700 कष्टकऱ्यांची घरं उध्वस्त करण्यात आली. आज आपल्या मेहनतीने संपूर्ण मुंबई चमकवणाऱ्या कामगार कष्टकरी जनतेच्या डोक्यावरचे छत प्रशासनाने हिरावून घेतले आहे. प्रशासनाद्वारे कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली असून इथल्या लोकांना कुठलीही पर्यायी व्यवस्था सुद्धा देण्यात आली नाही. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि भाजपचे खासदार मनोज कोटक यांसारख्या भांडवली निवडणूकबाज-धंदेबाज पक्षाचे नेते एकदा सुद्धा ह्या तोडलेल्या झोपड्या बघण्यासाठी किंवा लोकांच्या भेटीला आलेले नाहीत. अशा परिस्थितीत नौजवान भारत सभा…
नौजवान भारत सभा तर्फे “स्पर्धा परीक्षा घोटाळा आणि रोजगाराची स्थिती” या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र!
साथीनो महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती मध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्र सरकारने तलाठी भरतीची परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस या खाजगी कंपनीला दिली होती. यामध्ये 4793 जागांसाठी 11.5 लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. टीसीएस कंपनीशी संबंधित असलेल्या अनेक लोकांच्या नातेवाईकांना या परीक्षेत जास्त गुण मिळाले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही सेंटर वर तर पेपर सुरू होण्याच्या आधीच पेपर फुटल्याच्या सुद्धा बातम्या बाहेर आल्या आहेत. अनेक टप्प्यांमध्ये परीक्षा झाली असल्यामुळे नॉर्मलिझशन (normlization) ची जी पद्धत वापरण्यात…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “सलीम लंगडे पे मत रो” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!
नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 21 जानेवारी रोजी सईद अख्तर मिर्झा दिग्दर्शित “सलीम लंगडे पे मत रो” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. देशातील वाढता धार्मिक उन्माद आणि त्यामागील राजकारणाबद्दल हा चित्रपट भाष्य करतो. 1989 साली प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाची प्रासंगिकता आजही धडधडीत जाणवते. जातीधर्मांमध्ये द्वेष वाढवणे, आणि मंदिर मशिदीच्या मुद्द्यांना वापरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आज जोमाने सुरू आहे. चित्रपट उत्कृष्ट पद्धतीने दाखवतो की कसे कामगारांच्या मुलांना गुंडगिरीकडे नियोजनबद्ध पद्धतीने वळवले जाते. शाळांच्या वाढत्या फीज कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात आणि बेरोजगारीची टांगती तलवार सतत भविष्यावर…
FTII च्या विद्यार्थ्यांवर संघी गुंडांनी केलेल्या फाशिस्ट हल्ल्याचा तीव्र निषेध! संघी गुंडांची गुंडगिरी नाही चालणार!
नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेचे संयुक्त वक्तव्य आज 23 जानेवारीला फिल्म अँड टेलिविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या कॅम्पस मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी घुसून बॅनर जाळले व विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यार्थ्यांनी 22 जानेवारी रोजी “राम के नाम” ही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली डॉक्यूमेंट्रीचे प्रदर्शन केले होते. सध्या राम मंदिराच्या नावाने देशभरात जो धार्मिक उन्माद पसरवला जात आहे त्याची सुरुवात आर.एस.एस ने 1990च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाने केली होती. आनंद पटवर्धन यांची ही डॉक्यूमेंट्री याच प्रतिगामी आंदोलनाचे चित्रण करते ज्यामध्ये दाखवले गेले आहे की कशाप्रकारे भारतातील जनतेचे धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आले…
“राम के नाम” डाक्यूमेंट्री स्क्रिनिंग
दि. 22 जानेवारी रोजी अहमदनगर येथे नौभास कडून आनंद पटवर्धन द्वारे दिग्दर्शित प्रसिद्ध डाक्यूमेंट्री “राम के नाम” चे स्क्रिनिंग करण्यात आले. देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक तणावाच्या काळात जेव्हा राम मंदिर निर्माणाच्या निमित्ताने ‘प्राण प्रतिष्ठा’ करत असताना दुसरीकडे मात्र वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षणाचे बाजारीकरण व एकंदरीतच सर्वच बाजूने जनतेच्या लुटीला वाढवले जात आहे व जनतेला त्याच्या मुख्य मुद्यापासून भरकटवण्यासाठी धर्माचे राजकारण उभे केले जात आहे. तेव्हा ही डाक्यूमेंट्री 1980 ते 90 च्या दशकात धार्मिक फासीवादी ताकतींने बाबरी मशीद तोडत धार्मिक उन्माद पसरवत दंगलीचे जे राजकारण उभे केले ज्यात अडीच हजार…
नौजवान भारत सभा, महाराष्ट्र राज्य कमिटीची मासिक मीटिंग आज दिनांक 22/01/2024 रोजी पार पडली.
या मीटिंग मध्ये मागील महिन्यातील नौभासच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. कमिटीमधील सदस्यांनी येणाऱ्या दोन महिन्यात भगतसिंग जन अधिकार यात्रेचे प्रचार अभियान चालवण्यावर विशेष भर देण्याचे मान्य केले. तसेच नौभासची सदस्यता संख्या वाढवण्यासाठी युवकांच्या समस्यांवर आधारित ऑनलाईन चर्चासत्र चालवण्याचा ठराव मीटिंग मध्ये पारित केला गेला. महाराष्ट्रातील नौभासच्या कामांचा रिपोर्ट वेळेवर वेबसाईट आणि सोशल मीडियावर पोस्ट केला जावा यासाठी काही सदस्यांना विशेष जबाबदारी या मीटिंग मध्ये देण्यात आली. एकंदरीत महाराष्टातील नौभास चे काम अधिक गतीपूर्वक चालू करण्याचे नियोजन राज्य कमिटीने या मासिक मीटिंग मध्ये आखले आहे.
नौजवान भारत सभेतर्फे अनेक क्रांतिकारकांना त्यांच्या शब्दांनी प्रेरणा देणाऱ्या, आशेचे कवी (poet of hope) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिध्द टर्किश कवी नाझिम हिकमत यांच्या 122 व्या जन्मदिवशी त्यांना आठवत काव्यवाचन आणि चर्चा आयोजित केली होती
महान मानवता प्रवास करते जहाजेच्या डेकवर रेल्वेच्या थर्ड क्लास डब्ब्यांमध्ये पक्क्या सडकेवर पायी महान मानवता. महान मानवता आठ वाजता कामावर जाते विसाव्या वर्षी लग्न करते चाळीशीपर्यंत मरून जाते महान मानवता पुरेशी भाकरी प्रत्येकासाठी असते महान मानवतेला सोडून भातासोबतही तेच साखरेसोबतही तेच कपड्यांसोबतही तेच पुस्तकांसोबतही तेच पुरेश्या वस्तू असतात सर्वांसाठी महान मानवतेला वगळता. महान मानवतेच्या अंगणात सावली नसते तिच्या वाटेवर दिवे नसतात तिच्या खिडकीला काचा नसतात पण महान मानवतेकडे आशा असते आशेविना तुम्ही जिवंत राहू शकत नाही! – नाझिम हिकमत नौजवान भारत सभेतर्फे अनेक क्रांतिकारकांना त्यांच्या शब्दांनी प्रेरणा देणाऱ्या, आशेचे कवी…
नौजवान भारत सभा, मुंबई द्वारा दि. 7 जनवरी, रविवार के दिन “फ़ासीवाद क्या है?” विषय पर चर्चा सत्र का आयोजन किया गया।
आज फासीवादी ताकतें सत्ता में बैठी है, तब फासीवाद को समझना हमारे लिए एक जरूरी कार्यभार बन जाता है। चर्चासत्र की शुरुआत में साथी अविनाश ने बताया कि एक चिंतक का कहना है कि ‘फासीवाद पर उन सबको चुप रहना चाहिए, जो पूंजीवाद के विषय में नही बोलते है’। ऐसे में हमें अपनी बात पूंजीवाद के विषय से शुरू करनी चाहिए। पूंजीवादी व्यवस्था, एक ऐसी व्यवस्था है जो निजी मालिकाने पर आधारित है, जिसके केंद्र में मालिक का मुनाफ़ा होता है। इस व्यवस्था में मालिकों का पूरा वर्ग आपस में…
