Category: Statements
शहीद चंद्रशेखर आझाद यांना जन्मदिनानिमित्त (23जुलै) क्रांतिकारी अभिवादन!
इंकलाब झिंदाबाद!! भांडवलशाही, साम्राज्यवाद मुर्दाबाद!! जाती-धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा!!
भगतसिंह जनअधिकार पदयात्रा (BSJAY) अंतर्गत परीक्षा आणि भरती मधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात विशेष अभियान!
‘एन.टी.ए.’ रद्द करा ! तरुणांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करा! केंद्र आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी आणि भरती मध्ये झालेल्या गदारोळाविरोधात 9 ऑगस्ट रोजी चलो जंतर – मंतर, दिल्ली ! मित्र-मैत्रिणींनो, फॅशिश्ट मोदी सरकारचा कार्यकाळ विद्यार्थी तरुणांसाठी एखाद्या भयानक दुःखद स्वप्नापेक्षा कमी नाही. लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवणारे हे सरकार आता एन.टी.ए.द्वारे विद्यार्थी-तरुणांच्या भविष्यावर देखील बुलडोझर चालवत आहे. राज्यस्तरीय परीक्षा आणि भरती आयोजित करणाऱ्या संस्थांचा देखील असाच आंधळा कारभार सुरू आहे. केंद्रापासून ते राज्यांपर्यंत अंदाधुंदपणे पेपरफुटी होत आहे, भरती रद्द होत आहेत, घोटाळे होत आहेत आणि भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे. अलीकडेच एन.टी.ए.…
Scrap the UAPA case against Arundhati Roy and Dr. Sheikh Showkat Hussain!
The Lieutenant-Governor of Delhi, Vinay Kumar, has unearthed a 2010 Unlawful Activities Prevention Act (UAPA) case against Arundhati Roy and Sheikh Showkat Hussain and directed the Delhi Police to prosecute them under various sections of the UAPA, a draconian law that successive Congress and BJP governments have used to trample upon democratic civil rights activists time and again. That this case is being dusted off 14 years after the event – supposed “provocative” statements made by Roy and Dr. Hussain during a discussion on the history of Kashmir – reveals…
नौजवान भारत सभा ‘लोकसभा निवडणूक – 2024’मध्ये समान किमान कार्यक्रमाच्या आधारे भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाला (RWPI) पाठिंबा देते!
या निवडणुकीत धर्मवादी फॅसिस्ट भाजपवर पूर्ण बहिष्कार टाकावा असे आवाहन देशातील तरुण आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही आवाहन करत आहोत! निश्चितच, सध्याच्या निवडणुकीत इतर निवडणुकबाज पक्षही योग्य पर्याय नाहीत, पण फॅसिस्ट भाजप हा जनतेसाठी सर्वात धोकादायक आहे, त्यामुळे भाजपला कोणत्याही किंमतीत सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे! मित्रांनो, सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे ज्याचा कार्यक्रम नौजवान भारत सभेच्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या विरोधात जात नाही. ‘RWPI’ ने आपल्या जाहीरनाम्यात नौभासच्या लोकसभा निवडणुक मागणीपत्राचा समावेश केला आहे. या पक्षाची स्थापना अशा कार्यकर्त्यांनी केली आहे जे लोकांना त्यांच्या योग्य…
18वी लोकसभा निवडणुक- 2024 च्या संदर्भात ‘नौजवान भारत सभे’चे मागणीपत्र
नौजवान भारत सभा त्या पक्षाला आपला सशर्त पाठिंबा देऊ शकते जो आमच्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या विरोधात जाणार नाही, आमच्या अटी पूर्ण करेल, आमच्या संपूर्ण मागणीपत्राला त्यांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करेल आणि या मागण्यांसाठी संघर्ष करेल. मित्रांनो, देशात 18व्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. देशातील जनतेसाठी आणि विशेषतः तरुणांसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसे तर यापूर्वीच्या सर्व सरकारांनी जनतेच्या हिताशी तडजोड केली आहे परंतु तरी फॅसिस्ट भाजपच्या गेल्या 10 वर्षांच्या शासनात जनतेची अवस्था नरकमय झाली आहे. आपला देश आज धर्मवादी फॅसिस्ट शक्तींच्या तावडीत आहे. सर्व सरकारी संस्था, सरकारी यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांवर आतून…
जगातील सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे भाजप! तुरुंगात नाही, भ्रष्टाचाऱ्यांना संसदेत-मंत्रीपदी पाठवत आहे भाजप!
“ना खाऊंगा, ना खाने दूंगा” ची भाषा करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांना “चक्की पिसायला” तुरुंगात पाठवण्याची भाषा करणाऱ्या भाजपचे खरे चरित्र आता सर्वांसमोर उघडे पडले आहे. देशातील विविध भांडवली राजकीय पक्षातील भ्रष्टाचाराच्या चौकशीला सामोर जाणाऱ्या 25 नेत्यांना भाजपत सामील करून घेऊन आणि त्यापैकी 23 जणांना चौकशीतून दिलासा देऊन भाजपने सिद्ध केले आहे की त्यांचे एवढेच म्हणणे आहे की “भ्रष्टाचार करा, पण भाजपत येऊन करा!” कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल सारख्या पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. परंतु यापैकीच अनेक नेत्यांना शिक्षा देणे दूर, त्यांना सत्तापदी पोहोचवण्याचे वा त्यांचे गुन्हे माफ…
धर्माच्या नावावर जनतेला विभागण्याचा फॅसिस्ट भाजपचा डाव हाणून पाडा! जनविरोधी सीएए कायद्याविरोधात एकजूट होत जनआंदोलन उभे करा!! CAA NPR NRC रद्द करा!
सीएए कायद्याविरोधात देशात परत एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, दिल्ली सोबतच देशात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शने सुरु झाली आहेत. नेहमीप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आंदोलकांचे निर्घृणपणे दमन करत आहे. आंदोलन करणाऱ्यांना केवळ डिटेनच नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्यसत्तेचे जनताविरोधी चरित्र पुन्हा एकदा समोर येत आहे. मोदी सरकार निवडणुका तोंडाशी असताना जेव्हा इलेक्टोरल बॉण्ड्स च्या घोटाळ्यात अडकले आहे तेव्हा त्यांनी काही दिवसांपूर्वी 11 मार्च रोजी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्याबाबत अधिसूचना प्रसारित केली आहे, आणि सीएए कायद्यावर राजकारण…
FTII च्या विद्यार्थ्यांवर संघी गुंडांनी केलेल्या फाशिस्ट हल्ल्याचा तीव्र निषेध! संघी गुंडांची गुंडगिरी नाही चालणार!
नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेचे संयुक्त वक्तव्य आज 23 जानेवारीला फिल्म अँड टेलिविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या कॅम्पस मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी घुसून बॅनर जाळले व विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यार्थ्यांनी 22 जानेवारी रोजी “राम के नाम” ही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली डॉक्यूमेंट्रीचे प्रदर्शन केले होते. सध्या राम मंदिराच्या नावाने देशभरात जो धार्मिक उन्माद पसरवला जात आहे त्याची सुरुवात आर.एस.एस ने 1990च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाने केली होती. आनंद पटवर्धन यांची ही डॉक्यूमेंट्री याच प्रतिगामी आंदोलनाचे चित्रण करते ज्यामध्ये दाखवले गेले आहे की कशाप्रकारे भारतातील जनतेचे धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आले…
गदर लाटेतील 16 नोव्हेंबरच्या शहीदांना क्रांतिकारी अभिवादन!
गदर चळवळीचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद! जुलमी ब्रिटीश सरकारने ‘लाहोर षडयंत्र प्रकरण – 1’ अंतर्गत 16 नोव्हेंबर 1915 रोजी सात गदर योद्ध्यांना फाशी दिली. त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. या शहीदांपैकी एक होते कर्तारसिंह सराभा, ज्यांना वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी फाशी देण्यात आली. 16 नोव्हेंबर रोजी शहीद झालेले इतर सहा क्रांतिकारक बक्षीश सिंह, हरनाम सिंह, सुरेन सिंह, जगत सिंह, विष्णू गणेश पिंगळे, सुरेन सिंह (1) हे होते. रोजगार आणि चांगल्या संधीच्या शोधात कॅनडा आणि अमेरिकेत गेलेल्या भारतीयांनी 15 जुलै 1913 रोजी शोषण आणि भेदभावाविरुद्ध…
