तरूण जेह्वा जेह्वा जागा झाला! इतिहासाने कूस बदलली आहे!! नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियाना अन्तर्गत चौक सभा व सांस्कृतिक कार्यक्रम काल दिनांक 27/09/2021 रोजी गोवंडीतील गौतम नगर भागात सादर करण्यात आला. ज्या मध्ये नाटक (राजा का बाजा), क्रांतिकारी गीतांची प्रस्तुती व पत्रकांचे वाटप करण्यात आले. नौभास तर्फे भगतसिंह जन्मदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क :- पूजा : 7057088323 अविनाश : 8826265960
Category: Activities
‘शहीद यादगारी अभियानाची’ सुरुवात
नौजवान भारत सभे तर्फे काल दि.25/09/2021 रोजी शहीद भगतसिंह जन्मदिवानिमित्त ‘शहीद यादगारी अभियानाची’ सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत खाडी भागात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला. या मध्ये क्रांतिकारी गीत, नाटक (राजा का बाजा), रॅप इत्यादि प्रस्तुत करण्यात आले. उपस्थित सर्वांना भगतसिंह व त्यांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली व पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच नौभासच्या कार्यक्रमांमध्ये सामिल होण्याचे आव्हान करण्यात आले व जनसहयोग गोळा केला गेला.
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियाना अन्तर्गत चौक सभा व सांस्कृतिक कार्यक्रम
नौजवान भारत सभेतर्फे मुंबई मानखुर्द येथे सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियाना अंतर्गत काल दिनांक 26 सप्टेंबर रोजी साठे नगर ते संविधान चौक, लल्लुभाई कंपाऊंड येथे रॅली चे आयोजन करण्यात आले. रॅली ची सुरुवात साठे नगर येथील बबन टी स्टॉल पासून करण्यात आली. ठिकठिकाणी चौकात थांबून भगतसिंहांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली. ‘ इंकलाब जिंदाबाद, भगतसिंग तुम जिंदा हो, हम सबके संकल्पो मे ‘ ह्या घोषणा देत पत्रकांचे वाटप करण्यात आले. क्रांतिकारी गीतांसोबतच ‘ राजा का बाजा ‘ ह्या नाटकाची प्रस्तुती करण्यात आली. नौभास तर्फे मुंबईत सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियानात…
शहीद स्मृती अभियाना अंतर्गत मुंबई तील मानखुर्द गोवंडी येथे आज नवीन सदस्यांना नौजवान भारत सभेची सदस्यता व शपथ देण्यात आली
नौजवान भारत सभे तर्फे काल दि.25/09/2021 रोजी शहीद भगतसिंह जन्मदिवानिमित्त ‘शहीद यादगारी अभियानाची’ सुरुवात करण्यात आली
नौजवान भारत सभे तर्फे काल दि.25/09/2021 रोजी शहीद भगतसिंह जन्मदिवानिमित्त ‘शहीद यादगारी अभियानाची’ सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत खाडी भागात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला. या मध्ये क्रांतिकारी गीत, नाटक (राजा का बाजा), रॅप इत्यादि प्रस्तुत करण्यात आले. उपस्थित सर्वांना भगतसिंह व त्यांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली व पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच नौभासच्या कार्यक्रमांमध्ये सामिल होण्याचे आव्हान करण्यात आले व जनसहयोग गोळा केला गेला. नौजवान भारत सभेच्या कार्यक्रमांमध्ये सामिल होण्यासाठी संपर्क :- अविनाश 8826265960 पूजा 7057088323
नौजवान भारत सभेतर्फे येत्या शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मानखुर्द येथील साठे नगरातील खाडी भागात ‘ द लिजेंड ऑफ भगतसिंह ‘ हा चित्रपट दाखवण्यात आला
नौजवान भारत सभेतर्फे येत्या शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मानखुर्द येथील साठे नगरातील खाडी भागात ‘ द लिजेंड ऑफ भगतसिंह ‘ हा चित्रपट दाखवण्यात आला. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, जतिन दास इत्यादी सर्व क्रांतिकारकांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याची गरज आहे असे चित्रपटाला उपस्थित अनेकांनी मांडले. उपस्थित सर्वांना भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभे तर्फे ह्या पंधरवाड्यात आयोजित वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, अभियानांमध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले.
साप्ताहिक अध्ययन चक्र : मे दिवसाचा इतिहास
नौजवान भारत सभे तर्फे दि. 12/09/2021 रोजी शहिद भगतसिंग पुस्तकाल, मानखुर्द, मुंबई येथे *मे दिवसाचा इतिहास* या पुस्तकावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित पुस्तकावर मांडणी करत असताना साथी संजीव यांनी सांगितले की, *”आठ तास काम, आठ तास आराम आणि आठ तास मनोरंजन या मागणी साठी कामगारांना इतिहासात प्रचंड संघर्ष केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला 8 तास कामाचा अधिकार मिळाला आहे परंतु आज नफ्याच्या लोभापोटी भांडवली व्यवस्थेत मालकांनी त्याच्या राजकीय दलालांच्या मदतीने हे अधिकार देखील कामगारांकडून हिरावून घेण्याचा सत्र चालू ठेवले आहे. अशा परिस्थितीत कामगारांनी आपल्या हक्क अधिकरांन…
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात दर रविवारी चालवण्यात येणाऱ्या साप्ताहिक अध्ययन चक्रात ‘ पॅरिस कम्यून की अमर कहानी ‘ ह्या पुस्तकावर चर्चा करण्यात आली
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात दर रविवारी चालवण्यात येणाऱ्या साप्ताहिक अध्ययन चक्रात ‘पॅरिस कम्यून की अमर कहानी’ ह्या पुस्तकावर चर्चा करण्यात आली. चर्चेच्या सुरवातीला रवी यांनी संपूर्ण पुस्तकाचा सारांश सर्वांसमोर मांडला. त्यानंतर खुशीने मांडले की पॅरिस कम्यून चा इतिहास खूप प्रेरणादायी आहे. लढाई ही शेवटपर्यंत लढायला हवी. अनमने सांगितले की आजच्या काळात मुलींना लुईस मिशेल प्रमाणे अन्याया विरोधात ठामपणे लढण्यास सक्षम असायला हवे. जगातील पहिल्या कामगारांच्या राज्याचा कालावधी लहान असला तरी त्याच्या शिकवणी अजरामर आहेत आणि हा इतिहास नेहमी आपल्यापासून लपवला जातो म्हणून आपण स्वतः अभ्यास करून…
महान अय्यंकाली यांच्या वारशाला लक्षात ठेवा! क्रांतिकारी जातिअंताच्या आंदोलनाला पुढे न्या!
महान जतिविरोधी योद्धा अय्यंकाली यांच्या 158व्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाति विरोधी मंचा तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अय्यंकाली यांनी दमन आणि अत्याचाराविरोधात स्वतः सडकेवर उतरून संघर्ष केला. आज जाती अंतासाठी अश्याच क्रांतिकारी जनांदोलनाची गरज आहे. चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांनी अय्यंकाली यांचा वारसा नेहमी लक्षात ठेवून जाति अंताविरोधात क्रांतिकारी लढा उभारण्याचा संकल्प केला.
महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंच (ABJVM) तर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले
महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंच (ABJVM) तर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पदयात्रेमध्ये नौभास आणि अभाजाविम च्या कार्यकर्त्यांनी अय्यंकालींच्या लढ्याचा इतिहास जनतेसमोर मांडला. आज सुद्धा सुधारवाद आणि व्यवहारवादाचा विचार जातीअंताच्या आंदोलनात प्रभावी आहे. हाच विचार या आंदोलनाला अनेक दशकांपासून सरकारला अर्ज देणे, विनंत्या करणे, या नाही तर त्या भांडवली पक्षाचे शेपूट पकडून चालणे आणि अस्मितावादाच्या पोकळ विचारांच्या पुढे जाऊ देत नाहीये. अशामध्ये जातीअंताच्या आंदोलनाला योग्य रुपात पुढे नेण्यासाठी अय्यंकालींच्या आंदोलनाचा वारसा अत्यंत महत्वाचा आहे. अय्यंकाली…
