नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात दर रविवारी चालवण्यात येणाऱ्या साप्ताहिक अध्ययन चक्रात ‘ पॅरिस कम्यून की अमर कहानी ‘ ह्या पुस्तकावर चर्चा करण्यात आली

नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात दर रविवारी चालवण्यात येणाऱ्या साप्ताहिक अध्ययन चक्रात ‘पॅरिस कम्यून की अमर कहानी’ ह्या पुस्तकावर चर्चा करण्यात आली. चर्चेच्या सुरवातीला रवी यांनी संपूर्ण पुस्तकाचा सारांश सर्वांसमोर मांडला. त्यानंतर खुशीने मांडले की पॅरिस कम्यून चा इतिहास खूप प्रेरणादायी आहे. लढाई ही शेवटपर्यंत लढायला हवी. अनमने सांगितले की आजच्या काळात मुलींना लुईस मिशेल प्रमाणे अन्याया विरोधात ठामपणे लढण्यास सक्षम असायला हवे. जगातील पहिल्या कामगारांच्या राज्याचा कालावधी लहान असला तरी त्याच्या शिकवणी अजरामर आहेत आणि हा इतिहास नेहमी आपल्यापासून लपवला जातो म्हणून आपण स्वतः अभ्यास करून कष्टकऱ्यांचा खरा इतिहास शिकला पाहिजे असे शाहीन ने मांडले. उपस्थित सर्वांनी चर्चेत सहभाग घेत कामगारांच्या पहिल्या राज्याच्या प्रयोगाबद्दल अत्यंत उत्सुकतेने आणि गांभीर्याने जाणून घेत आज समाज परिवर्तनाच्या मार्गात तरुण म्हणून शक्य ते योगदान देण्याचे ठरवले.

Related posts

Leave a Comment

thirteen + six =