नौजवान भारत सभे तर्फे दि. 12/09/2021 रोजी शहिद भगतसिंग पुस्तकाल, मानखुर्द, मुंबई येथे *मे दिवसाचा इतिहास* या पुस्तकावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
संबंधित पुस्तकावर मांडणी करत असताना साथी संजीव यांनी सांगितले की, *”आठ तास काम, आठ तास आराम आणि आठ तास मनोरंजन या मागणी साठी कामगारांना इतिहासात प्रचंड संघर्ष केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला 8 तास कामाचा अधिकार मिळाला आहे परंतु आज नफ्याच्या लोभापोटी भांडवली व्यवस्थेत मालकांनी त्याच्या राजकीय दलालांच्या मदतीने हे अधिकार देखील कामगारांकडून हिरावून घेण्याचा सत्र चालू ठेवले आहे. अशा परिस्थितीत कामगारांनी आपल्या हक्क अधिकरांन साठी सजग राहिले पाहिजे. ही छोटीसी पुस्तिका त्याकामी अत्यंत उपयोगी आहे. या पुस्तके मध्ये मे दिवसाच्या इतिहासाची संघर्षमय कहाणी जिवंतपणे रेखाटली आहे.”*
पुढे विषयाच्या अंतर्वस्तुवर सविस्तर मांडणी करत मुद्देवारपणे बोलण्यात आले. सत्राच्या शेवटी उपस्थितांकडून विषयाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
