स्त्री मुक्ती लीग आणि नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे अगोरा फिल्मचे स्क्रीनिंग आणि चर्चासत्र

सावित्री फातिमा स्मृती संकल्प अभियानांतर्गत अगोरा ह्या सिनेमाचे स्क्रिनिंग करण्यात आले व त्यावर चर्चा केली गेली. सिनेमा अलेक्जेंड्रिया, मिस्र मधील एक महान तत्त्ववेत्ती, गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ हाइपेशियाची कहाणी सांगतो. चौथ्या शताब्दीच्या काळात मूर्तिपूजक पेगन धर्म आणि नव्याने उदय, प्रचार – प्रसार होत असलेल्या ख्रिश्चन धर्मामध्ये होत असलेल्या युद्धकाळात हाइपेशिया अंधविश्वास, अवैज्ञानिक आणि तर्कहीन विचार आणि पितृसत्तात्मक विचारांच्या विरोधात खंबीर पणे उभी राहिली. चर्चासत्रा दरम्यान कला आणि विज्ञानाच्या उगमाबद्दल, अंधविश्वास आणि अवैज्ञानिक विचारांच्या विरोधात लढण्या बद्दल आणि शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात करण्याच्या महत्वाबद्दल चर्चा झाली.

3 जानेवारी, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने “नौजवान भारत सभा” तर्फे कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी नौभासचे साथी सिध्दार्थ यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्याबद्दलची मांडणी करत कार्यक्रमाची सुरुवात केली. साथी सिध्दार्थ यांनी मांडले की, सावित्रीबाई फुले यांनी ब्राह्मण्यवाद्यांशी संघर्ष करत दगड, माती, शेणाचा मारा अंगावर खात न डगमगता 1 जानेवारी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू केली. त्यासोबतच सावित्रीबाईंनी बालविवाह प्रथा, केशवपन तसेच सती प्रथा बंद व्हाव्यात यासाठी कार्य केले व बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांनतर साथी स्वप्नजा यांनी आजच्या शिक्षणाच्या परिस्थितीबद्दल मांडणी केली. साथी स्वप्नजाने सांगितले की शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे ज्यांच्या खिशात पैसे आहे तेच शिक्षण घेऊ शकतात यामुळे सामान्य जनतेची, गरिबांची…

आज़ाद स्पोर्ट्स क्लब नौजवान भारत सभा द्वारा संचालित शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों के साथ फुटबॉल खेला गया।

आज़ाद स्पोर्ट्स क्लब नौजवान भारत सभा द्वारा संचालित शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों के साथ फुटबॉल खेला गया। आज़ाद स्पोर्ट्स क्लब के तहत हम लोग पहले भी क्रिकेट और बैडमिंटन खेलते थे जो कुछ दिनों से बंद था फिलहाल अभी लगातार खेलेंगे। खेलना स्वास्थ्य के लिए लाभदायक होता है। खेल सभी के लिए शारीरिक व मानसिक रूप से लाभप्रद होता है। पर आज के मुनाफे की व्यवस्था ने हम बच्चों की खुशियां भी छीन ली है हम खेलने निकले तो एक भी खेलने लायक खेल मैदान नहीं था अंत में…

नौभास, पुणे तर्फे नवीन शिक्षण धोरण (NEP) यावर चर्चासत्र आयोजित

सतत होत असलेले शिक्षणाचे खाजगीकरण आणि मोदी सरकारचे विद्यार्थी विरोधी नवीन शिक्षण धोरण (NEP) यावर नौजवान भारत सभेकडून आज (रविवारी) शहीद भगतसिंह वाचनालय, दांडेकर पूल येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रामध्ये नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेकडून या धोरणाविरोधात काढण्यात आलेल्या संयुक्त पत्रकाचे व NEP वरील दिशा विद्यार्थी संघटनेच्या भूमिकेचे वाचन करण्यात आले. सहभागी साथींनी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वेगवेगळ्या आयामांवर भूमिका मांडल्या. साथी अरुणने मांडले की आजचे शिक्षण हे कशाप्रकारे भांडवली चाकर घडवण्याचे काम करत आहे आणि एकंदरीत आजच्या व्यवस्थेच्या संकटाच्या काळात जेव्हा की महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता यांसारख्या प्रश्नांनी…

केंद्र शासनाकडून फेलोशिप बंद केल्याविरोधात अभियान

केंद्र शासनाकडून गेल्या 8 डिसेंबरला आणखी एक विद्यार्थी विरोधी धोरणाला लागू करण्याची घोषणा करण्यात आली. माजी शिक्षण मंत्री स्मृती इराणीने मौलाना अब्दुल नॅशनल फेलोशिप (MANF) बंद करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आज आझम कॅम्पस मध्ये आणि “नौजवान भारत सभा” आणि “दिशा विद्यार्थी संघटना” या संघटनांतर्फे एकत्रितपणे अभियान करण्यात आले. ही शिष्यवृत्ती एम. फिल आणि पीएचडी साठी गरीब पार्श्वभूमीतून येणाऱ्या त्या शोधकर्त्यांसाठी होती जी या सहा अल्पसंख्यांक समूहातून येतात – मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, सिख, पारशी व जैन. आधीच शिष्यवृत्तीचा लाभ अतिशय थोड्या विद्यार्थ्यांना मिळत होता. MANF योजनेला…

मुंबई येथे ‘इब आले ऊ’ चित्रपटाचे स्क्रिनिंग

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे मागील आठवड्यात ‘इब आले ऊ’ चित्रपटाचे स्क्रिनिंग केले गेले. हा सिनेमा 2020 साली कोरोना साथीच्या काळात प्रतीक वत्स या दिग्दर्शकाने बनावला आहे. चित्रपट एका कष्टकरी परिवाराची स्थिती, बेरोजगारी मुळे झालेली हलाखीची स्थिती सांगतो. कथेचा नायक अंजनी हा एक प्रवासी कामगार आहे, जो कामाच्या शोधात उत्तर प्रदेशातून दिल्लीला आला आहे आणि त्याच्या बहिणीच्या घरी राहत आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाले नाही आणि डिग्री नसल्याने त्याला हवी तशी नोकरी मिळत नाही, नाईलाजास्तव तो दिल्ली शहरात प्रशासकीय इमारतींमधील माकडांना हुसकावून लावण्याचे काम स्विकारतो जे त्याला जमत नाही. दुसरीकडे…

मुंबई येथे “मृत्यू आणि निराशेचे कारखाने” ह्या माहितीपटाचे स्क्रिनिंग

नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे “मृत्यू आणि निराशेचे कारखाने” ह्या माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. अरविंद स्मृती न्यास यांच्या ‘ह्युमन लँडस्केप प्रोडक्शनद्वारे’ 2013 मध्ये निर्मित, हा माहितीपट देशाच्या राजधातील कारखान्यांमध्ये घडणारे दैनंदिन अपघात आणि औद्योगिक कामगारांच्या नरकासमान असलेल्या कामाच्या परिस्थितीवर केंद्रित आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या लोकशाहीतील कामगारांच्या जीवनाचे नारकीय वास्तव हा माहितीपट समोर आणतो. देशातील राजधानीच्या लखलखीत भागांच्या शेजारीच औद्योगिक क्षेत्र अस्तित्वात आहे जिथे कामगार अजूनही शंभर वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत काम करत आहेत. दोन वेळच्या भाकरीसाठी लाखो कामगार रोज मृत्यूच्या छायेखाली काम करतात. सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे रोज…

मुक्तिबोध यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा प्रसिद्ध लेखाचे वाचन व चर्चा

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे सुरु असलेल्या साप्ताहिक अध्ययन चक्रात हिंदी साहित्यातील प्रमुख कवी, समीक्षक, निबंधकार, कथाकार आणि कादंबरीकार गजानन माधव मुक्तिबोध यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा प्रसिद्ध लेख ‘नौजवान का रास्ता’ चे वाचन व चर्चा करण्यात आली. चर्चेच्या सुरवातीला सुप्रीथने मुक्तिबोध यांची ओळख मांडताना सांगितले की ते एक प्रगतिशील कवी आणि लेखक होते ज्यांनी न्यायाच्या पक्षात आपले लिखाण केले. चर्चेत पुढे मुक्तिबोधांनी लेखात मांडलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्थेचे खाजगीकरण यांचे आजच्या तरुणांच्या जीवनावरील परिणाम, समाजातील नियम, कायदे, रूढी, परंपरा इत्यादींकडे चिकित्सक वृत्तीने बघून योग्य…

साप्ताहिक अध्ययन चक्र – शहिद अशफाक उल्ला खाँ यांचा जीवन परिचय.

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे सुरु असलेल्या साप्ताहिक अध्ययन चक्राच्या शृंखलेत ‘शहिद अशफाक उल्ला खाँ यांचा जीवन परिचय’ ह्या विषयावर शहीद अशफाक उल्ला खाँ यांच्या जन्मदिवसानिमित्ताने (22 ऑक्टोबर) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सत्राच्या सुरवातीला शशांकने मांडले की आपल्याला अशफाक उल्ला खाँ यांचा परिचय काकोरी कांड किंवा त्यांची राम प्रसाद बिस्मिल यांच्यासोबत असलेली मैत्री एवढाच करून दिला जातो पण त्यांचे विचार आणि भारताच्या स्वातंत्र लढ्यात त्यांचे योगदान यावर फार कमी चर्चा केली जाते. अविनाशने अशफाक उल्ला खाँ यांचे भारताच्या स्वातंत्र्याविषयी काय विचार होते यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय, भारताला…

साप्ताहिक अध्ययन चक्र

नौजवान भारत सभा द्वारा हर हफ्ते साप्ताहिक अध्ययन चक्र/चर्चा सत्र चलाया जाता है। पिछले हफ्ते 9 अक्टूबर 2022 को अध्ययन चक्र का आयोजन किया गया, जिसमें भगत सिंह द्वारा लिखित लेख *”विधार्थी और राजनीति” को पढ़ा गया। हमारे विश्वविद्यालयों में *राजनीतिक डिस्कोर्स* के महत्व पर विस्तार से बात की गई। ऐसा क्यों है कि सरकार चाहे ब्रिटिश सरकार हो या वर्तमान फासीवादी सरकार, विश्वविद्यालयों और कॉलेजों को “अराजनीतिक” बनाना चाहती है, इस पर चर्चा की गई। सत्र का समापन हमारे समाज के प्रासंगिक मुद्दों को उठाने के लिए हमारे विश्वविद्यालयों…