शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिनानिमित्त ( 28 सप्टेंबर ), नौजवान भारत सभा तर्फे शहरात विविध भागात ‘ शहीद स्मृती संकल्प अभियान ‘ राबवले जात आहे

शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिनानिमित्त ( 28 सप्टेंबर ), नौजवान भारत सभा तर्फे शहरात विविध भागात ‘ शहीद स्मृती संकल्प अभियान ‘ राबवले जात आहे. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या विचारांची आजच्या काळात लागू होणारी प्रासंगीकता समजून घेण्यासाठी, आजच्या समाजातील ज्वलंत प्रश्न उघडपणे मांडण्यासाठी, क्रांतीचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी नौजवान भारत सभा तर्फे होणाऱ्या ह्या संकल्प अभियानात विविध कलाप्रकार वापरले जात आहेत.
आज शहरातील शास्त्री रोड आणि एफसी रोड या भागात नौभास तर्फे ‘ राजाचा वाजला बाजा ‘ या सडक नाटकाची प्रस्तुती केली. बेरोजगारी, शिक्षण, या मूलभूत प्रश्नांकडे तरुणांचे, तरुणींचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे नाटक सादर केले गेले. नाटकानंतर पत्रके वाटून तरुणांशी चर्चा केली आणि जनतेने आर्थिक सहयोग देखील दिला.
स्पर्धा परीक्षांच्या मृगजळात अडकेलेले, तारुण्यातली महत्त्वाची वर्षे सरकारी नोकरीसाठी झटणारे लाखो तरुण तरुणी आज शहरात येतात. 5-7 वर्षे वेळ देऊन आज ना उद्या पद मिळेलच हा ध्यास घेऊन जीव तोडून अभ्यास करतात. प्रत्येक वेळी निराशा आल्याने स्वतःचीच कमतरता शोधून, स्वतःला दोष देऊन आत्महत्यांसारखे मार्ग स्वीकारतात. त्यांच्यासमोर व्यवस्थेचं वास्तव उघड करणे, बेरोजगारी मध्ये अडकलेले आपण एकटे नसून आपल्यासारखे करोडो आहेत, आणि याला आपण स्वतः जबाबदार नसून व्यवस्था जबाबदार आहे ही जाणीव आजच्या तरुणांना करून देणं खूप महत्वाचे काम आहे. शहीद क्रांतिकारकांनी व्यवस्थेचे हे वास्तव दाखवून दिले आणि आज तेच प्रत्येक कामगार कष्टकऱ्यांपर्यंत पोचवणे आजच्या तरुण वर्गाचे काम बनते.
शहीद स्मृती संकल्प अभियान ‘ अंतर्गत होणाऱ्या सडक नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन, चित्रपट स्क्रिनिंग, चर्चासत्रे’ अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि नवीन समतामुलक आणि न्यायप्रिय अशा समाजाच्या निर्मितीसाठी नौभासला जोडून घ्या.
संपर्क
रवि : 8956840785
सुस्मित : 8329869421

Related posts

Leave a Comment

1 × 4 =