शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले

आम्हाला तुझे नाव घ्यायचे आहे
कारण ‘ते’ सतत घेतात
तुझे नाव …
ज्यांना भय आहे
लोकांपर्यंत तुझे नाव पोहचल्याने
खऱ्या अर्थाने !!
– शशि प्रकाश
शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले.
नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील गौतम नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है, तोडो बंधन तोडो – प्रस्तुती करण्यात आली. नौभासच्या राहुल यांनी ‘मेरे प्यारे भगतसिंह’ हे स्वलिखित रॅप सादर केले. पोस्टरींग, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा केला गेला.
28 तारखेपर्यंत गोवंडी, मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये होणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी संपर्क करा :-
नौजवान भारत सभा – 8826265960
स्त्री मुक्ती लीग. – 7057088323

Related posts

Leave a Comment

two × one =