क्रांतीच्या ध्येयपूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्या युद्धाच्या शेवटी, सर्वहारा वर्गाच्या सर्वाधिकारशाहीची स्थापना होईल. ही सर्वाधिकारशाहीच क्रांतीच्या ध्येयाची पूर्ती करण्याचा मार्ग प्रशस्त बनवेल. क्रांती मानवजातीचा जन्मजात अधिकार आहे. श्रमिक वर्गच समाजाचा खरा पोशिंदा आहे. जनतेच्या सर्वंकष सत्तेची स्थापना हे श्रमिक वर्गाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या आदर्शांसाठी आणि या विश्वासासाठी आम्हांला जी काही शिक्षा होईल तिचे आम्ही सहर्ष स्वागत करू. क्रांतीच्या या पूजावेदीवर आम्ही आमचे यौवन नैवेद्य म्हणून आणले आहे, कारण या महान ध्येयासाठी मोठ्यात मोठा त्यागसुद्धा कमीच आहे. आम्ही समाधानी आहोत आणि क्रांतीच्या आगमनाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहोत. इंकलाब जिंदाबाद!
– भगतसिंह
नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील झाकीर हुसैन नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है, तोडो बंधन तोडो – प्रस्तुती करण्यात आली. नौभासच्या राहुल यांनी ‘मेरे प्यारे भगतसिंह’ हे स्वलिखित रॅप सादर केले. पोस्टरींग, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा केला गेला.
28 तारखेपर्यंत गोवंडी, मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये होणाऱ्या शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी संपर्क करा :-
नौजवान भारत सभा – 8826265960
स्त्री मुक्ती लीग – 7057088323
