पुण्यातील सुप्पर बिबवेवाडी भागात उन्हाळी सुट्टीनंतर ‘नौजवान भारत सभे’तर्फे शहीद भगतसिंग वाचनालयात पुन्हा नव्याने शिक्षण सहायता केंद्र सुरू

शिक्षण सहायता केंद्रामध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय सध्या शिकवण्यात येत आहेत. यावेळी सुप्पर बिबवेवाडी भागातील इयत्ता 7वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांकडून ‘शिक्षण सहायता केंद्राला’ भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकणारी मुले-मुली ही कामगार कष्टकरी वर्गातून येणारी आहेत. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाल्यामुळे कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेणे अवघड आहे व सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना महामारीमुळे जवळपास 2-3 वर्ष शाळा बंद असल्यामूळे कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थांचे प्रचंड नुकसान झाले.अशा परिस्थितीत शिक्षण आणि रोजगाराच्या हक्काचा लढा उभारत असतानाच नौजवान भारत सभा शिक्षण सहायता केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
नौजवान भारत सभा चे काम हे पूर्णतः कामगार कष्टकऱ्यांच्या आणि न्यायप्रिय जनतेच्या आर्थिक सहयोगावर चालते. तुम्ही वाचनालयासाठी पुढील प्रकारे सहयोग करू शकता.
1. वाचनालयाच्या पुढील वर्षभराच्या डिपॉझीट आणि भाड्यासाठी, नवीन पुस्तके, फर्निचर, स्टेशनरी असे एकूण 60,000 रुपयांची गरज आहे.
2. कपाट, टेबल, खुर्च्या, चटई, फॅन, लॅपटॉप/ कॉम्प्युटर, कार्पेट, इत्यादी सहयोग.
3. पुस्तकं, स्टेशनरी चे सामान, white board, फिल्म स्क्रिनिंग साठी पडदा, प्रोजेक्टर, स्पीकर, इत्यादी.
4. चहा, जेवण बनवण्यासाठी भांडी, इंडक्शन किंवा गॅस शेगडी, इत्यादी
5. महिन्याच्या वीज बिलासाठी आर्थिक सहयोग.
6. तुमच्या वेळेचा सहयोग.
तुम्ही आम्हाला खालील अकाउंट वर सहयोग करू शकतात.
Name: Neha kailas Morkhade.
*Account no- 713902010000918
*Bank : Union bank of india
*Branch name: Siddhi vinayak complex railway station road , Shegaon , dist – buldhana .
*IFSC: UBINO571393
*Google pay: 7769858775
सर्वांना मोफत, समान, दर्जेदार शिक्षण मिळायलाच पाहिजे!
शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या मालकीचं!
इंकलाब झिंदाबाद!

Related posts

Leave a Comment

fifteen − fifteen =