FTII च्या विद्यार्थ्यांवर संघी गुंडांनी केलेल्या फाशिस्ट हल्ल्याचा तीव्र निषेध! संघी गुंडांची गुंडगिरी नाही चालणार!

नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेचे संयुक्त वक्तव्य आज 23 जानेवारीला फिल्म अँड टेलिविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या कॅम्पस मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी घुसून बॅनर जाळले व विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यार्थ्यांनी 22 जानेवारी रोजी “राम के नाम” ही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली डॉक्यूमेंट्रीचे प्रदर्शन केले होते. सध्या राम मंदिराच्या नावाने देशभरात जो धार्मिक उन्माद पसरवला जात आहे त्याची सुरुवात आर.एस.एस ने 1990च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाने केली होती. आनंद पटवर्धन यांची ही डॉक्यूमेंट्री याच प्रतिगामी आंदोलनाचे चित्रण करते ज्यामध्ये दाखवले गेले आहे की कशाप्रकारे भारतातील जनतेचे धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आले व दंगे घडवून निरपराध लोकांची हत्या केली गेली आणि शेवटी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदी पाडली गेली. एक अशी डॉक्यूमेंट्री जी ऑनलाइन यूट्यूब वर उपलब्ध आहे, सेन्सॉर बोर्डाने ज्याला “यू” सर्टिफिकेट दिलं आहे, जी राष्ट्रीय आणि जागतिक पुरस्कारांनी सन्मानीत आहे अशी डॉक्यूमेंट्री फिल्म बघणं मोदी सरकारच्या राज्यात गुन्हा आहे. या हिंदुत्ववादी संघटनांचे जे नेते लोकांमध्ये भडकाऊ भाषणे करतात, दंगे करवतात ते मोकाट फिरत आहेत पण जे अशा राजकारणाचा विरोध करत आवाज उठवत आहेत त्यांच्यावर हल्ले करण्यात येत आहे. अशा हिंदुत्ववादी शक्तींना पोलिस यंत्रणेची सुद्धा साथ असते हे आतापर्यंत वारंवार दिसून आले आहे. FTII जी एक केंद्र सरकारची संस्था आहे तिथे अशा प्रकारे एखादा हिंसक जमाव पोलिस यंत्रणेच्या मदतीशिवाय कसा घुसू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांवर झालेल्या या फॅसिस्ट हल्याचा तीव्र निषेध करते आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करते. नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटना FTII च्या विद्यार्थ्यांसोबत खंबीरपणे उभी आहे आणि सर्व विद्यार्थी तरूणांना आवाहन करत आहे की त्यांनी या हल्ल्याचा व त्या सोबतच आज देशात सुरू असलेल्या सांप्रदायिक राजकारणाचा तीव्र निषेध केला पाहिजे आणि आपल्या लोकशाही अधिकारांसाठी एकत्र आले पाहिजे. इंकलाब जिंदाबाद!

Related posts

Leave a Comment

nineteen − one =