जामिया युनिवर्सिटी प्रशासनाच्या विद्यार्थी विरोधी कारवाईचा तीव्र निषेध!!

 जामिया प्रशासनाने त्याचे विद्यार्थी विरोधी चरित्र पुन्हा उघडपणे सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांवर शारीरिक हल्ला केल्यानंतर प्रशासनाने जामिया मिलिया इस्लामिया परिसरात १७ विद्यार्थ्यांची नावे, पत्ते, संपर्क आणि इतर वैयक्तिक तपशील असलेली एक सूची मुख्य प्रवेशद्वार, कायदा संकुल प्रवेशद्वार आणि इतर परिसरात सार्वजनिकपणे लावली आहे. हे विद्यार्थी सोमवारपासून कॅम्पस लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या फाशिस्ट जामिया प्रशासनाविरोधात निदर्शने करत होते आणि त्यांना काल स्थानबद्ध करून नंतर निलंबित करण्यात आले. ही घटना विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचा भंग असून त्यांची सुरक्षितता धोक्यात आणते. यामध्ये काही तरुण विद्यार्थिनीही आहेत ज्यांचे फोन नंबरसुद्धा सार्वजनिक करण्यात आले आहेत. जामिया प्रशासन या विद्यार्थ्यांच्या जीवास धोका उत्पन्न होईल, अशी परिस्थिती निर्माण करत आहे. प्रतिक्रियावादी गुंडांकडून या विद्यार्थ्यांवर हल्ले झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी युनिवर्सिटी प्रशासनाची असेल. विद्यार्थिनींच्या “सुरक्षेचे” कारण देत प्रशासनाने हॉस्टेलमध्ये कर्फ्यू लावला, त्यांना कॅंपसमध्ये प्रवेश नाकारला आणि दुसरीकडे आंदोलनरत विद्यार्थिनींची वैयक्तिक माहिती जगजाहीर केली. हा ढोंगीपणा विद्यार्थ्यांचे लोकशाही हक्क हिरावून घेण्यासाठीच केला जात आहे. फाशिस्ट गोदी मीडियाने जामिया आणि त्याच्या प्रगतीशील विद्यार्थ्यांना बदनाम करण्याची संधी कधीही सोडली नाही. यावेळीही आंदोलनरत विद्यार्थ्यांना हिंसक म्हणून लेबल लावले. प्रशासन त्यांच्या कारवायांना समर्थन मिळवण्यासाठी गोदी मीडियाचा पुरेपूर वापर करून घेत आहे. हे कृत्य प्रशासनाच्या चारित्र्याचे दर्शन देत असून, दिवसेंदिवस देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये फासिस्ट शक्तींच्या वाढत्या घुसखोरीचा हा एक दाखला आहे. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करून त्यांना धमकवणे हा त्यांचा प्रतिकार रोखण्याचा अतिशय अमानवीय मार्ग फॅशिस्ट प्रशासनाने अवलंबला आहे.

नौजवान भारत सभा जामिया प्रशासनाच्या विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेच्या उल्लंघनाची तीव्र निषेध करते आणि जामियातील विद्यार्थ्यांच्या या फासिस्ट हल्ल्याविरोधातील लढ्याचे समर्थन करते. प्रशासनाच्या अत्याचाराचा विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे म्हणजे त्या विद्यार्थ्यांवर थेट हल्ला करणं आहे. आम्ही प्रॉक्टर आणि व्हाईस चॅन्सलरविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करतो, कारण त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या निलंबनाचे आदेश रद्द झाले पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा वैयक्तिक तपशील असलेली सूची सर्व परिसरातून आणि प्लॅटफॉर्म्सवरून त्वरित काढून टाकली पाहिजे. आम्ही मागणी करतो की विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या सुरक्षा कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे.
नौजवान भारत सभा, महाराष्ट्र

Related posts

Leave a Comment

8 − five =