अमर शहीद अश्फाक उल्ला खान यांची जयंती

आज अमर शहीद अश्फाक उल्ला खान यांची जयंती आहे. शहाजहानपूर, उत्तरप्रदेश मध्ये 22 ऑक्टोबर 1900 ला त्यांचा जन्म झाला. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HRA चे ते अग्रणी नेते होते. क्रांतिकारक कामांसाठी या संघटनेसोबत जोडलेले क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिडी, अश्फाक उल्ला खान, रोशन सिंह व इतर अन्य साथींनी काकोरी नावाच्या ठिकाणी इंग्रजी खजिना लुटला. त्यानंतर बहुतांशी क्रांतीकारकांना इंग्रजांनी अटक केले. राजेंद्र लाहिडी यांना 17 डिसेंबर व बिस्मिल, अश्फाक आणि रोशन सिंह यांना 19 डिसेंबर 1927 ला फासावर चढवण्यात आले. अश्फाक उल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांची मैत्री अतुलनीय होती. दोघांनाही शायरीची आवड होती.
जाऊंगा खाली हाथ मगर ये दर्द साथ ही जायेगा
जाने किस दिन हिंदुस्तान आज़ाद वतन कहलाएगा…
हे त्यांनी बिस्मिल सोबत लिहिले होते
फासावर जाण्याच्या ठीक आधी फैजाबाद जेलमधून पाठवलेल्या शहीद अश्फाक उल्ला यांच्या अंतिम संदेशावरून त्यांची संघटना व त्यांचे विचार अत्यंत स्पष्ट होतात.
“हिंदुस्तानातल्या भावांनो, तुम्ही कुठल्याही धर्म व संप्रदायाला मानत असाल, देशाच्या कामात सहकार्य करा. व्यर्थ आपापसांत भांडू नका.”
अशा वीर क्रांतिकारक अश्फाक उल्ला खान यांना नौजवान भारत सभेचा सलाम

Related posts

Leave a Comment

eighteen + seven =