साँडर्स हत्या प्रकरणानंतर भगतसिंहाला पोलिस आणि गुप्तचरांच्या जाळ्यातून बाहेर काढण्यात दुर्गा भाभींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भारताच्या क्रांतिकारी चळवळीच्या खंबीर समर्थक दुर्गा भाभी या भगवती चरण वोहरा यांच्या साथीदार होत्या.
भगवती चरण वोहरा बॉम्बस्फोटात शहीद झाल्यानंतरही त्या क्रांतिकारी कार्यात सक्रिय सहभागी राहिल्या. दुर्गा भाभी यांनी सार्वजनिक संघर्षात अनेक वेळेस अत्याचार सहन केले आणि अनेक वेळेस तुरुंगावास ही भोगला पण त्या कधीच मागे सरल्या नाहीत!
शहीदांचे जे स्वप्न अपुरे,
याच शतकात होतील पुरे!
याच शतकात नव्या वेगाने
परिवर्तनाची लहर उठेल!!
– नौजवान भारत सभा
