नौजवान भारत सभे तर्फे दि. 12/09/2021 रोजी शहिद भगतसिंग पुस्तकाल, मानखुर्द, मुंबई येथे *मे दिवसाचा इतिहास* या पुस्तकावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित पुस्तकावर मांडणी करत असताना साथी संजीव यांनी सांगितले की, *”आठ तास काम, आठ तास आराम आणि आठ तास मनोरंजन या मागणी साठी कामगारांना इतिहासात प्रचंड संघर्ष केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला 8 तास कामाचा अधिकार मिळाला आहे परंतु आज नफ्याच्या लोभापोटी भांडवली व्यवस्थेत मालकांनी त्याच्या राजकीय दलालांच्या मदतीने हे अधिकार देखील कामगारांकडून हिरावून घेण्याचा सत्र चालू ठेवले आहे. अशा परिस्थितीत कामगारांनी आपल्या हक्क अधिकरांन…
डाव्या चळवळीतील कवी पाश यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची कविता ‘सबसे खतरनाक’ चा मराठी अनुवाद
सर्वात धोकादायक मेहनतीची लूट सर्वात धोकादायक नसते पोलिसी दमन सर्वात धोकादायक नसते गद्दारी, लोभाची लालूच सर्वात धोकादायक नसते बसल्या-बसल्या पकडले जाणे वाईट तर आहेच हबकून मौन होणे वाईट तर आहेच पण सर्वात धोकादायक नसते सर्वात धोकादायक असते निर्जीव शांततेने भरून जाणे तळमळीचा अंत आणि सर्व सहन करत जाणे घरातून जाणे कामावर आणि परतून घरी येणे सर्वात धोकादायक असते आपल्या स्वप्नांचा मृत्यू होणे
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात दर रविवारी चालवण्यात येणाऱ्या साप्ताहिक अध्ययन चक्रात ‘ पॅरिस कम्यून की अमर कहानी ‘ ह्या पुस्तकावर चर्चा करण्यात आली
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात दर रविवारी चालवण्यात येणाऱ्या साप्ताहिक अध्ययन चक्रात ‘पॅरिस कम्यून की अमर कहानी’ ह्या पुस्तकावर चर्चा करण्यात आली. चर्चेच्या सुरवातीला रवी यांनी संपूर्ण पुस्तकाचा सारांश सर्वांसमोर मांडला. त्यानंतर खुशीने मांडले की पॅरिस कम्यून चा इतिहास खूप प्रेरणादायी आहे. लढाई ही शेवटपर्यंत लढायला हवी. अनमने सांगितले की आजच्या काळात मुलींना लुईस मिशेल प्रमाणे अन्याया विरोधात ठामपणे लढण्यास सक्षम असायला हवे. जगातील पहिल्या कामगारांच्या राज्याचा कालावधी लहान असला तरी त्याच्या शिकवणी अजरामर आहेत आणि हा इतिहास नेहमी आपल्यापासून लपवला जातो म्हणून आपण स्वतः अभ्यास करून…
महान अय्यंकाली यांच्या वारशाला लक्षात ठेवा! क्रांतिकारी जातिअंताच्या आंदोलनाला पुढे न्या!
महान जतिविरोधी योद्धा अय्यंकाली यांच्या 158व्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाति विरोधी मंचा तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अय्यंकाली यांनी दमन आणि अत्याचाराविरोधात स्वतः सडकेवर उतरून संघर्ष केला. आज जाती अंतासाठी अश्याच क्रांतिकारी जनांदोलनाची गरज आहे. चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांनी अय्यंकाली यांचा वारसा नेहमी लक्षात ठेवून जाति अंताविरोधात क्रांतिकारी लढा उभारण्याचा संकल्प केला.
महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंच (ABJVM) तर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले
महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंच (ABJVM) तर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पदयात्रेमध्ये नौभास आणि अभाजाविम च्या कार्यकर्त्यांनी अय्यंकालींच्या लढ्याचा इतिहास जनतेसमोर मांडला. आज सुद्धा सुधारवाद आणि व्यवहारवादाचा विचार जातीअंताच्या आंदोलनात प्रभावी आहे. हाच विचार या आंदोलनाला अनेक दशकांपासून सरकारला अर्ज देणे, विनंत्या करणे, या नाही तर त्या भांडवली पक्षाचे शेपूट पकडून चालणे आणि अस्मितावादाच्या पोकळ विचारांच्या पुढे जाऊ देत नाहीये. अशामध्ये जातीअंताच्या आंदोलनाला योग्य रुपात पुढे नेण्यासाठी अय्यंकालींच्या आंदोलनाचा वारसा अत्यंत महत्वाचा आहे. अय्यंकाली…
शहीद शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्ताने फिल्म स्क्रिनिंग
दि.24/08/2021 रोजी नौभास आणि स्त्री मुक्ती लीग (मुंबई) ह्यांच्या द्वारे क्रांतीकारी शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त साठेनगर, खाडी (मानखुर्द) येथे ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ चित्रपटाचे फिल्म स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपटाच्या सुरुवातीला मांडणी करत सांगण्यात आले की, शहीद राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, अश्फाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पण प्रश्न आहे या सर्व क्रांतीकारकांना जसा स्वतंत्र भारत अपेक्षित होता आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील निर्माण होऊ शकला नाही. क्रांतीकारकांची स्पष्ट भूमिका होती की, काँग्रेस आणि गांधीच्या नेतृत्वामध्ये जे स्वातंत्र्य मिळणार आहे. ते स्वतंत्र अर्धवट…
महान क्रांतिकारी शहीद शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद
शहीद शिवराम राजगुरू यांच्या 113 व्या जन्म दिवसानिमित्त मुंबईतील मानखुर्द – गोवंडी येथे नौजवान भारत सभेद्वारे चालवण्यात येणाऱ्या शहीद शिवराम राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना राजगुरूंच्या महान क्रांतिकारी वारश्याचा परिचय करून देण्यात आला. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे आणि आज त्यांचे विचार, जीवन यांपासून प्रेरणा घेत पुन्हा त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी लढण्याची गरज आहे. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, इत्यादी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण वेचलेल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्यानंतर एका समतामुलक, समाजवादी देशाची अपेक्षा होती ज्यात सर्व कारखाने, शेती – बागा, संपत्ती निर्माण करण्याची साधने यांवर कामगार कष्टकऱ्यांची सामूहिक मालकी…
शहीद शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्ताने फिल्म स्क्रिनिंग…

‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले
शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभेने दि. 24 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले ज्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील तरुण सामिल झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना साथी प्रविण ने शिवराम राजगुरू यांच्या कार्याबद्दल सांगून नौजवान भारत सभेची ओळख दिली. स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास सांगत असताना साथी रवि ने देशातील क्रांतिकारी विचारांच्या विकासाच्या विविध टप्प्यांवर प्रकाश टाकत क्रांतिकारकांच्या स्वप्नाळू कल्पनांपासून ते वैज्ञानिक समाजवादापर्यंतच्या प्रवासावर मांडणी केली. यावर इतर सहभागी साथींनी आपले प्रश्न व मत मांडत चर्चेला रंगत आणली. शेवटी HSRA च्या क्रांतिकारकांचे…