स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन!

स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन! राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक राजगुरू यांचा आज जन्मदिवस आहे. इंग्रजी सत्तेच्या काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील खेड येथे 24 ऑगस्ट 1908 रोजी राजगुरू यांचा जन्म झाला. आज खेड हे राजगुरूंच्या स्मृतीमध्ये राजगुरू नगर म्हणून ओळखले जाते जे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. शिवराम हरी राजगुरू हे त्यांचे पूर्ण नाव. महाराष्ट्रात जन्माला आलेले राजगुरू तारुण्याच्या सुरवातीलाच क्रांतिकारक वैशंपायन ह्यांच्या सोबत झालेल्या अपघाती भेटींनंतर चंद्रशेखर आजादांच्या संपर्कात आले व त्या काळातील मुख्यतः पंजाब,…

शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभेने दि. 24 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले

शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभेने दि. 24 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले ज्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील तरुण सामिल झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना साथी प्रविण ने शिवराम राजगुरू यांच्या कार्याबद्दल सांगून नौजवान भारत सभेची ओळख दिली. स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास सांगत असताना साथी रवि ने देशातील क्रांतिकारी विचारांच्या विकासाच्या विविध टप्प्यांवर प्रकाश टाकत क्रांतिकारकांच्या स्वप्नाळू कल्पनांपासून ते वैज्ञानिक समाजवादापर्यंतच्या प्रवासावर मांडणी केली. यावर इतर सहभागी साथींनी आपले प्रश्न व मत मांडत चर्चेला रंगत आणली. शेवटी HSRA च्या क्रांतिकारकांचे…

नौजवान भारत सभे तर्फे मानखुर्द – गोवंडीत चालवण्यात येणाऱ्या फिरत्या वाचनालयाला जनतेचा उत्तम प्रतिसाद

मागील 2 महिन्यांपासून मानखुर्द – गोवंडीतील साठे नगर आणि रफिक नगर भागात नौजवान भारत सभे तर्फे फिरते वाचनालय चालवण्यात येत आहे. झोळीत काही पुस्तकं घेऊन घरोघरी जाऊन ही पुस्तकं मुलांना, मोठ्यांना प्रति पुस्तक 2 रुपये घेऊन वाचायला दिले जाते. 4 दिवसांनी पुन्हा ही पुस्तकं परत घेऊन नवीन पुस्तकं वाचायला दिली जातात. एक संवेदनशील, न्यायप्रिय माणूस घडवण्यात प्रगतिशील पुस्तकं एक महत्वाचा वाटा उचलत असतात. आज मोबाईल वर सहजपणे उपलब्ध होणारे नानाविध डिजिटल गेम्स, छोट्या चित्रफिती बनवता येण्यासारखे अनेक एप्लिकेशन्स, व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी, इत्यादींमुळे वाचन संस्कृती आज जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.…

नौजवान भारत सभे तर्फे मानखुर्द – गोवंडीत चालवण्यात येणाऱ्या फिरत्या वाचनालयाला जनतेचा उत्तम प्रतिसाद

मागील 2 महिन्यांपासून मानखुर्द – गोवंडीतील साठे नगर आणि रफिक नगर भागात नौजवान भारत सभे तर्फे फिरते वाचनालय चालवण्यात येत आहे. झोळीत काही पुस्तकं घेऊन घरोघरी जाऊन ही पुस्तकं मुलांना, मोठ्यांना प्रति पुस्तक 2 रुपये घेऊन वाचायला दिले जाते. 4 दिवसांनी पुन्हा ही पुस्तकं परत घेऊन नवीन पुस्तकं वाचायला दिली जातात. एक संवेदनशील, न्यायप्रिय माणूस घडवण्यात प्रगतिशील पुस्तकं एक महत्वाचा वाटा उचलत असतात. आज मोबाईल वर सहजपणे उपलब्ध होणारे नानाविध डिजिटल गेम्स, छोट्या चित्रफिती बनवता येण्यासारखे अनेक एप्लिकेशन्स, व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी, इत्यादींमुळे वाचन संस्कृती आज जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.…

नौजवान भारत सभा(नौभास) आणि आंबिलओढा नागरिक संघर्ष समिती तर्फे आयोजित दांडेकर पूल परिसर झोपडपट्टीवासीयांचे आवासाच्या अधिकाराकरिता “एकता आंदोलन”

133 दांडेकर पूल येथील झोपडपट्टी पाडण्याच्या कारवाईनंतर सचेतन झालेल्या विविध झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी, आज एकता दर्शवत आणि घरांच्या, विस्थापनाच्या, एस.आर.ए.च्या संदर्भात चालू असलेल्या अन्यायाला, लपवालपवीला, दडपशाहीला समोर आणत दांडेकर पूल चौक येथे आज आज 11 ऑगस्ट रोजी, सकाळी 10:30 वाजता आंदोलन केले. यावेळी 133 दांडेकर पूल, 52 चाळ, 214 दांडेकर पूल, पान   मळा वसाहत, शाहू वसाहत, हनुमान नगर या वसाहतींमधील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नौजवान भारत सभेचे निखिल एकडे यांनी सूत्रसंचालन केले. नौजवान भारत सभेतर्फे समन्वयक रवी पुर्णे, 133 दांडेकर पूल येथील हनुमंत फडके, पानमळा येथील…

*नौजवान भारत सभा(नौभास) आणि आंबिलओढा नागरिक संघर्ष समिती तर्फे आयोजित* *दांडेकर पूल परिसर झोपडपट्टीवासीयांचे आवासाच्या अधिकाराकरिता “एकता आंदोलन”*

___________________ 133 दांडेकर पूल येथील झोपडपट्टी पाडण्याच्या कारवाईनंतर सचेतन झालेल्या विविध झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी, आज एकता दर्शवत आणि घरांच्या, विस्थापनाच्या, एस.आर.ए.च्या संदर्भात चालू असलेल्या अन्यायाला, लपवालपवीला, दडपशाहीला समोर आणत दांडेकर पूल चौक येथे आज आज 11 ऑगस्ट रोजी, सकाळी 10:30 वाजता आंदोलन केले. यावेळी 133 दांडेकर पूल, 52 चाळ, 214 दांडेकर पूल, पानमळा वसाहत, शाहू वसाहत, हनुमान नगर या वसाहतींमधील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नौजवान भारत सभेचे निखिल एकडे यांनी सूत्रसंचालन केले. नौजवान भारत सभेतर्फे समन्वयक रवी पुर्णे, 133 दांडेकर पूल येथील हनुमंत फडके, पानमळा येथील किशोर…

आंबिल ओढा नागरिक संघर्ष समिती आणि नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी आज दांडेकर पूल भागातील पानमळा, बावन्न चाळ आणि रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये एस. आर. ए‌. च्या प्रश्नाबद्दल कामगार कष्टकरी जनतेमध्ये भाषण देत आणि पत्रकं वाटत अभियान राबविले

आंबिल ओढा नागरिक संघर्ष समिती आणि नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी आज दांडेकर पूल भागातील पानमळा, बावन्न चाळ आणि रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये एस. आर. ए‌. च्या प्रश्नाबद्दल कामगार कष्टकरी जनतेमध्ये भाषण देत आणि पत्रकं वाटत अभियान राबविले. बुधवारी, ११ तारखेला सकाळी १० वाजता आयोजित घराच्या हक्कासाठी दांडेकर पूल परिसरातील नागरिकांच्या एकता प्रदर्शन आंदोलनात परिसरातील कामगार कष्टकरी बंधूंनी आणि भगिनींनी सामिल व्हावं म्हणून देखील प्रचार केला गेला त्याच बरोबर जागोजागी पोस्टर लावण्यात आले. या अभियानांत आंबिल ओढा वस्ती मधील नागरिक देखील सक्रिय सहभागी झाले होते. समिती व नौभास आपल्या कामगार कष्टकरी सहकाऱ्यांना…

9 ऑगस्ट रोजी काकोरी ऍक्शन प्लॅन दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बिबवेवाडीच्या सुप्पर येथील दुर्गामाता गार्डन येथे नौजवान भारत सभेकडून चर्चासत्र आयोजित करण्यात आले

काल, 9 ऑगस्ट रोजी काकोरी ऍक्शन प्लॅन दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बिबवेवाडीच्या सुप्पर येथील दुर्गामाता गार्डन येथे नौजवान भारत सभेकडून चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. काकोरी ऍक्शन प्लॅन व हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीच्या क्रांतिकारी वारश्यावर चर्चा झाली. शहीद क्रांतिकारकांचे शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट आजही पूर्ण झालेले नाही, व आज देखील तरुणांना ह्याच उद्दिष्टाने संघटित होण्याची गरज आहे. तसेच आजच्या सर्वांगीण कोंडीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ऑगस्ट क्रांती सारख्या कामगार-कष्टकऱ्यांच्या जनऊठावातून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा कामगार-कष्टकऱ्यांना एकजूट करावे लागेल असे नौजवान भारत सभेचे साथी सुस्मित ह्यांनी मांडले. ह्यानंतर साथी निमिष…

रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी नौजवान भारत सभेने शहीद भगतसिंह वाचनालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली

रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी नौजवान भारत सभेने शहीद भगतसिंह वाचनालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर साथी सूरज यांनी अण्णाभाऊंच्या कार्याचा आढावा घेत चळवळीतील त्यांच्या साहित्याचे महत्व सांगितले. तसेच त्यांच्या जीवन कार्याची समीक्षा करत योग्य कार्यदिशा काय असली पाहिजे यावर चर्चा घडवून आणली.