मागील 2 महिन्यांपासून मानखुर्द – गोवंडीतील साठे नगर आणि रफिक नगर भागात नौजवान भारत सभे तर्फे फिरते वाचनालय चालवण्यात येत आहे. झोळीत काही पुस्तकं घेऊन घरोघरी जाऊन ही पुस्तकं मुलांना, मोठ्यांना प्रति पुस्तक 2 रुपये घेऊन वाचायला दिले जाते. 4 दिवसांनी पुन्हा ही पुस्तकं परत घेऊन नवीन पुस्तकं वाचायला दिली जातात. एक संवेदनशील, न्यायप्रिय माणूस घडवण्यात प्रगतिशील पुस्तकं एक महत्वाचा वाटा उचलत असतात. आज मोबाईल वर सहजपणे उपलब्ध होणारे नानाविध डिजिटल गेम्स, छोट्या चित्रफिती बनवता येण्यासारखे अनेक एप्लिकेशन्स, व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी, इत्यादींमुळे वाचन संस्कृती आज जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कामगार – कष्टकरी वर्गात वाचना साठी संधी उपलब्ध नसतात, पुस्तकं विकत घेण्यासाठी किंवा वाचनालयातून वाचण्यास घेण्याची आर्थिक परिस्थिती नसते. आजच्या भांडवली व्यवस्थेत कला, साहित्य इत्यादी क्षेत्रांवर देखील नफाकेंद्री व्यवस्थेची मक्तेदारी आहे.
एक समतामूलक आणि न्याय्य समाजाच्या जडणघडणीसाठी ह्या संधी कामगार कष्टऱ्यांच्या वस्त्यांपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे.
नौजवान भारत सभा सर्व न्यायप्रिय तरुण मुलामुलींना फिरत्या वाचनालयाच्या उपक्रमात सहभागी होण्याचे तसेच फिरत्या वाचनालासाठी हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू पुस्तकं किंवा शक्य तितका आर्थिक सहयोग करण्याचे आवाहन करत आहे.
संपर्क –
पूजा :- 7057088323
प्रज्ञा :- 8779633808
