शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभेने दि. 24 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले

शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभेने दि. 24 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले ज्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील तरुण सामिल झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना साथी प्रविण ने शिवराम राजगुरू यांच्या कार्याबद्दल सांगून नौजवान भारत सभेची ओळख दिली. स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास सांगत असताना साथी रवि ने देशातील क्रांतिकारी विचारांच्या विकासाच्या विविध टप्प्यांवर प्रकाश टाकत क्रांतिकारकांच्या स्वप्नाळू कल्पनांपासून ते वैज्ञानिक समाजवादापर्यंतच्या प्रवासावर मांडणी केली. यावर इतर सहभागी साथींनी आपले प्रश्न व मत मांडत चर्चेला रंगत आणली. शेवटी HSRA च्या क्रांतिकारकांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी, देशात समाजवादी क्रांती घडवून आणण्यासाठी उपस्थितांना नौभासचे सदस्य बनण्याचे आवाहन करण्यात आले.
“इन्कलाब जिन्दाबाद…!”,”शहिद शिवराम राजगुरु अमर रहे…!” घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Related posts

Leave a Comment

18 − 3 =