लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या कामगार-कष्टकऱ्यांना मदत पोचवण्याचे काम नौजवान भारत सभा अविरत करत आहे.

ह्याच मदतकार्याअंतर्गत कात्रज मधील सर्व्हे क्र ६२ येथील प्रवासी कामगारांसोबत २१ दिवसांपासून सामुदायिक किचन चालवले जात आहे. किचन १७ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले होते. एकतेच्या भावनेतून जनतेकडून मिळालेल्या सहयोगाच्या बळावरच किचन ३ आठवडे सतत चालू आहे. जनतेची कामगारवर्गाशी एकजूट हीच कोरोनामुळे आणि त्यानंतरच्या दुर्व्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्याची वाट आहे. हे किचन कार्यकर्त्यांच्या आणि कामगारांच्या सामूहिक श्रमातून चालवले जाते. सोबतच कामगारांनी राशन व निधी रूपाने देखील सहयोग दिलेला आहे. किचन सर्वार्थाने सामुदायिक पद्धतीने सुरु आहे. किचन मध्ये काम करताना सर्व कार्यकर्त्यांकडून व कामगारांकडून योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेतली…

स्त्री मुक्ती लीग व नौजवान भारत सभेच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर मधील सिद्धार्थनगर भागामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा*

रविवार दिनांक 8/3/2020 रोजी सायंकाळी 5:00 वाजता नौजवान भारत सभेच्या वतीने सिद्धार्थनगर,म्यूनिसिपल कॉलनी परिसरामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्त्री मुक्ती लीग च्या कार्यकर्त्या साथी अपेक्षा यांनी ‘अमन के हम रखवाले सब एक है’ हे क्रांती गीत गायले.यानंतर नौजवान भारत सभेचे साथी प्रवीण यांनी उपस्थितांना संबोधित केले.त्यांनी आपल्या बोलण्याची सुरूवात करताना ‘महिलाए अब उठी नही तो जुल्म बढता जायेगा’ क्रांती गीत गायले. 8 मार्च इतिहास सांगताना ते म्हणाले की 8 मार्च 1908 ला अमेरिकेच्या न्यूयार्क शहरामध्ये कापड उद्योगात काम करणार्‍या महिला कामगारांनी मतदानाचा अधिकार आणि युनियन बनवण्याचा अधिकार…

पुण्यातील काशेवाडी भागामध्ये नौभास आणि शाहीनबाग, मोमीनपुरा येथील महिला साथींनी एकञित सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात घरोघरी जाऊन अभियान राबविले.

पुण्यातील काशेवाडी भागामध्ये नौभास आणि शाहीनबाग, मोमीनपुरा येथील महिला साथींनी एकञित सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात घरोघरी जाऊन अभियान राबविले. अभियानाला स्थानिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर्वच धर्मांच्या लोकांनी एनपीआर प्रक्रियेवर सविनय बहिष्कार टाकण्याचे ठरविले. या कायद्याच्या समर्थकांनी दिल्लीमध्ये नुकत्याच केलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काशेवाडी परिसरात हे अभियान चालू होते. त्यामुळे कोणत्याही दंगलखोराला सदर परिसरात घुसू न देण्याचे आव्हान नौभास आणि इतर कार्यकर्त्यांनी केले. लोकांनी या आव्हानाचे प्रचंड स्वागत केले आणि शांतता पाळण्याचे आश्वासनही दिले.

जाती-धर्म में नही बटेंगे,मिलजूल कर संघर्ष करेंगे।

दिनांक 16/ 2/ 2020 रोजी सायंकाळी 7:00 ते रात्री 9:00 या वेळेमध्ये अहमदनगर शहरातील सिद्धार्थ नगर, म्युनिसिपल कॉलनी परिसरात NRC,NPR,CAA या गरीब विरोधी विभाजन कारी कायद्याबद्दल नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी जनजागृतीपर अभियान चालविले. यावेळी परिसरात ठिक-ठिकाणी चौक सभा घेऊन या कायद्याबद्दल उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच या कायद्याअंतर्गत होणार्‍या सर्वे ला विरोध करण्याबद्दल सांगण्यात आले. तसेच सायं. 5:00 ते रात्री 9:00 या वेळेत अहमदनगर येथील फकीर वाडा, रहेमानिया कॉलनी या ठिकाणी अहमदनगर शाहीन बाग सूरू झाला असून काल (दि.16) पासून या आंदोलनास सुरुवात झाली अाहे. आणखी दोन दिवस 16,17…

दि.२८/११/२०१९ रोजी जाती विरोधी समाजसुधारक, योद्धा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.

दि.२८/११/२०१९ रोजी जाती विरोधी समाजसुधारक, योद्धा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून भारतीय समाजाला लागलेली घान आहे व आज पर्यंत सर्व सत्ताधाऱ्यांनी जातीचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे काम केले व आपली सत्ता टिकवली आहे. तर दुसरीकडे जातीव्यवस्था संपवण्यासाठी अनेक समाजसुधारक व क्रांतिकारी योद्ध्यांनी संघर्ष केला आहे. त्यात जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचे अन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. ‘ब्राम्हणाची आणि इग्रजांची चामडी सोलल्यावर दिसून येते की, दोघांचे देखील रक्त एकच आहे.’ इंग्रजांनी ब्राम्हणी व्यवस्थेला सोबत घेऊन जनतेचे शोषण…

अतिरिक्त नुकसान भरपाई करिता विविध वसाहतींमधील नागरिक एकजूट

अतिरिक्त नुकसान भरपाई करिता विविध वसाहतींमधील नागरिक एकजूट दिनांक 3 नोव्हेंबार रोजी आंबिल ओढा (पुणे) परिसरातील *129 दांडेकर पूल, 130 दांडेकर पूल, 133 दांडेकर पूल, 134 दांडेकर पूल, 214 दांडेकर पूल, आंबेडकर वसाहत, टांगेवाला कॉलनी, राजेंद्रनगर , अण्णाभाऊ साठे वसाह्त,* येथील 200 पेक्षा जास्त पूरग्रस्त नागरिकांनी मिळून, नौजवान भारत सभेच्या समन्वयाने एकत्र येऊन, निळू फुले सभागृह (साने गुरुजी शाळा परिसर) येथे आंबिल ओढा पुरग्रस्त नागरिक संघर्ष समिती स्थापन केली आहे. सरकार देऊ करत असलेली रु. *15,000 मदत ही अत्यंत अपुरी आहे* आणि उपजिवीका, जीवनावश्यक वस्तू, रोजगार, घर, मुलांचे शालेय साहित्य,…

आंबिलोढा परिसर पूरग्रस्त आंदोलन अपडेट आज अण्णाभाऊ साठे वसाहत येथे पूरग्रस्त नागरिकांशी चर्चा करण्यात आली व नुकसानीचे व्हिडीओ डॉउमेन्टेशन केले तसेच विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. शासनाने देऊ केलेली रु 15000 मदत अत्यंत कमी आहे अशी संतप्त भावना सर्वांनी व्यक्त केली