Category: Activities
रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी नौजवान भारत सभेने शहीद भगतसिंह वाचनालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली
रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी नौजवान भारत सभेने शहीद भगतसिंह वाचनालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर साथी सूरज यांनी अण्णाभाऊंच्या कार्याचा आढावा घेत चळवळीतील त्यांच्या साहित्याचे महत्व सांगितले. तसेच त्यांच्या जीवन कार्याची समीक्षा करत योग्य कार्यदिशा काय असली पाहिजे यावर चर्चा घडवून आणली.
चर्चासत्राचे आयोजन
अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार, तालिबानची वाढती पकड आणि साम्राज्यवादी स्पर्धेत अफगाणी जनतेची दुरावस्था… दि.25/7/ 2021 रोजी नौभास (मुंबई) च्या वतीने वरील विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तालिबान या धार्मिक कट्टरवादी संघटनेची अफगाणिस्तान वरील वाढती पकड त्या अगोदर अमेरिकेची माघार ही घटना जागतिक राजकारणावरील प्रभाव टाकणारी आहे. अफगाणिस्तानला गेल्या कित्येक वर्षांपासून साम्राज्यवादी हस्तक्षेप आणि अंतर्गत यादवी युद्धाने पोखरून टाकले आहे. अशात अफगाणी जनतेला नाममात्र लोकशाहीने जे थोडेफार अधिकार मिळाले होते ते सुद्धा अतिशय निर्घृणपणे चिरडण्यास साम्राज्यवादाने आणि धार्मिक कट्टरवादी संघटांनी धुमाकूळ घातला आहे. या सर्व घटनेला समजून साम्राज्यवादी आणि धार्मिक कट्टरवादी…
अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार, तालिबानची वाढती पकड आणि साम्राज्यवादी स्पर्धेत अफगाणी जनतेची दुरावस्था चर्चासत्राचे आयोजन
दि.25/7/ 2021 रोजी नौभास (मुंबई) च्या वतीने वरील विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तालिबान या धार्मिक कट्टरवादी संघटनेची अफगाणिस्तान वरील वाढती पकड त्या अगोदर अमेरिकेची माघार ही घटना जागतिक राजकारणावरील प्रभाव टाकणारी आहे. अफगाणिस्तानला गेल्या कित्येक वर्षांपासून साम्राज्यवादी हस्तक्षेप आणि अंतर्गत यादवी युद्धाने पोखरून टाकले आहे. अशात अफगाणी जनतेला नाममात्र लोकशाहीने जे थोडेफार अधिकार मिळाले होते ते सुद्धा अतिशय निर्घृणपणे चिरडण्यास साम्राज्यवादाने आणि धार्मिक कट्टरवादी संघटांनी धुमाकूळ घातला आहे. या सर्व घटनेला समजून साम्राज्यवादी आणि धार्मिक कट्टरवादी तालिबानने गेल्या कित्येक वर्षांपासून अफगाणिस्तानला युद्धाने मैदान बनवले आहे. यात जनतेचे अधिकार…
24 जून रोजी महानगरपालिका, राज्यसरकार आणि पोलीस प्रशासन यांनी मिळून आंबीलओढा वसाहतीतील जनतेवर अमानुष कारवाई केली
24 जून रोजी महानगरपालिका, राज्यसरकार आणि पोलीस प्रशासन यांनी मिळून आंबीलओढा वसाहतीतील जनतेवर अमानुष कारवाई केली. त्या दिवसानंतर नौजवान भारत सभा सर्व कामगार-कष्टकऱ्यांना घराच्या हक्कासाठी एकजूट बनवण्याचे आवाहन करत आहे. एस.आर.ए. चा कायदा शहरातील सर्व मध्यवर्ती भागांमध्ये लागू करून आडव्या झोपडपट्ट्या उभ्या करून मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे धोरण आता राज्य सरकार वेगाने पुढे रेटत आहे. आज ही आग बाजूच्या वस्तीमध्ये लागली असली तरी त्याचा वणवा अपल्यापर्यंतही पोहोचणार आहे आणि त्यासाठी वस्तीपातळीवर समित्या बनवून एकजूट करण्याचे आवाहन नौभासचे कार्यकर्ते दांडेकर पूल भागातील वस्त्यांमध्ये जाऊन करत आहेत. या अभियानामध्ये आंबीलओढ्यातील जनता…
पुण्यातील दांडेकर पूल भागामध्ये 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त पत्रक वाटून भाषण देत अभियान करण्यात आले.
कामगार दिनाचा इतिहास, आजची कामगार वर्गाची परिस्थिती, भगतसिंहाचे अपूर्ण स्वप्न, मागच्या एक वर्षापासून कोरोनामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या कामगार वर्गविरोधी धोरणांमुळे कामगार-कष्टकरी वर्ग सहन करत असलेल्या हालअपेष्टा यांवर भाष्य करण्यात आले. कोरोना संकटाचा सर्वाधिक मार पडला आहे तो कामगार-कष्टकरी वर्गावर. अगोदर अनियोजित, अमानवी लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने काहीही मदत न करता कंबरडे मोडले, बेरोजगार केले, उपासमार घडवली, कोट्यवधी कामगारांना शेकडो-हजारो किलोमीटर पायी चालवले. वर्षभर भांडवलदारांच्या नफ्याच्या चिंतेत गुंतलेल्या राज्य-केंद्र सरकारांनी आता दुसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजन, औषधे, बेड, आयसीयू, लशीचे कारखाने वाढवलेच नाहीत. परिणामी आता काळ्याबाजारात लाखो-कोटी खर्चून सुद्धा इलाज दुर्लभ आहे. सर्वांना मोफत आणि…
23 मार्च भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त दांडेकर पूल परिसर, पुणे येथे “द लीजेंड ऑफ भगतसिंग” हा चित्रपट दाखवण्यात आला.
23 मार्च भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त दांडेकर पूल परिसर, पुणे येथे “द लीजेंड ऑफ भगतसिंग” हा चित्रपट दाखवण्यात आला. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट २००२ साली प्रकाशित झाला. चित्रपट “हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन” चे सहकारी सदस्यांसह व भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणार्या समाजवादी क्रांतिकारक भगतसिंह यांच्या क्रांतिकारी जीवनावर प्रकाश टाकणारा आहे. चित्रपट आशयाच्या अंगाने तोकडा असल्याकारणाने प्रदर्शन सुरू होण्याच्या आधी नौभास चे कार्यकर्ते रवी यांनी HSRA व क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांचा इतिहास थोडक्यात मांडला. सिनेमा संपल्यावर कार्यक्रमाची सांगता “भांडवलशाही मुर्दाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, इंकलाब जिंदाबाद” अशा क्रांतिकारी ऐतिहासिक वारसा…
शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदान दिनानिमित्त नौभास, मुंबई तर्फे कार्यक्रम व रॅलीचे आयोजन
27 फेब्रुवारी शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानाला आज 90 वर्षे पूर्ण झालीत. त्याच पार्श्वभूमीवर नौभास, स्त्री मुक्ती लीग, बिगुल मजदूर दस्ता, मुंबई तर्फे गोवंडीतील रफिक नगर भागात शहीद स्मृती अभियान व रॅली चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘लडाई जारी है’ ह्या क्रांतिकारी गीतांची प्रस्तुती करण्यात आली. चंद्रशेखर आझाद ह्यांच्या जीवनाबद्दल, तसेच क्रांतिकारकांच्या ‘स्वातंत्र्याच्या स्वप्नांबद्दल’ चर्चा करण्यात आली. त्यांनतर रफिक नगर भागात एक रॅली काढून पत्रकांचे वितरण करण्यात आले.
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनानिमित्त फिल्म स्क्रिनिंग चे आयोजन करण्यात आले.
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनानिमित्त फिल्म स्क्रिनिंग चे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत गोवंडी भागातील रफिक नगर मध्ये ‘द लेजन्ड ऑफ भगतसिंग’ हा चित्रपट दाखवण्यात आला. लहान मुलांपासून ते महिला व पुरुषांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाद्वारे फक्त नावे माहीत असलेल्या क्रांतिकरकांबद्दल अधिक माहिती मिळाल्याची तसेच भगतसिंग, चन्द्रशेखर आझाद व त्यांच्या क्रांतिकारी सहकाऱ्यांच्या स्वप्नातले स्वातंत्र्य आजही आपल्याला मिळाले नसल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी नोंदवली.
मुंबई मध्ये ‘नौभास’ वार्षिक आढावा बैठक संपन्न…
दि. 7/02/21 रोजी नौजवान भारत सभेच्या मुंबई युनिट ची वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीची सुरवात ‘मेरा रंग दे बसंती चोला’ ह्या गीताने करण्यात आली. साथी अविनाश यांनी नौजवान भारत सभेची ओळख व मुंबईतील मागील वर्षभराच्या कामाची माहिती दिली. डॉ. पूजा यांनी देशभरातील नौभास च्या कामांचा आढावा मांडला. नौजवान भारत सभेच्या सर्व सदस्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या सर्व क्रांतिकारकांच्या विचारांवर काम करत जनतेच्या सर्व न्यायपूर्ण संघर्षांत त्यांच्यासोबत राहण्याची शपथ घेतली. त्यांनतर पुढील वर्षभरासाठी डॉ.पूजा, प्रज्ञा व अविनाश यांची कार्यकारिणी म्हणून निवड करण्यात आली. शशीप्रकाश यांची ‘अगर तुम युवा…
