23 मार्च भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त दांडेकर पूल परिसर, पुणे येथे “द लीजेंड ऑफ भगतसिंग” हा चित्रपट दाखवण्यात आला. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट २००२ साली प्रकाशित झाला. चित्रपट “हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन” चे सहकारी सदस्यांसह व भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणार्या समाजवादी क्रांतिकारक भगतसिंह यांच्या क्रांतिकारी जीवनावर प्रकाश टाकणारा आहे. चित्रपट आशयाच्या अंगाने तोकडा असल्याकारणाने प्रदर्शन सुरू होण्याच्या आधी नौभास चे कार्यकर्ते रवी यांनी HSRA व क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांचा इतिहास थोडक्यात मांडला. सिनेमा संपल्यावर कार्यक्रमाची सांगता “भांडवलशाही मुर्दाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, इंकलाब जिंदाबाद” अशा क्रांतिकारी ऐतिहासिक वारसा असणाऱ्या व तेवढ्याच आजसाठीही समर्पक व दिशादर्शक अशा घोषणा देत शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांना क्रांतिकारी अभिवादन करून झाली.
23 मार्च भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त दांडेकर पूल परिसर, पुणे येथे “द लीजेंड ऑफ भगतसिंग” हा चित्रपट दाखवण्यात आला.
