चर्चासत्राचे आयोजन

अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार, तालिबानची वाढती पकड आणि साम्राज्यवादी स्पर्धेत अफगाणी जनतेची दुरावस्था…

दि.25/7/ 2021 रोजी नौभास (मुंबई) च्या वतीने वरील विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

तालिबान या धार्मिक कट्टरवादी संघटनेची अफगाणिस्तान वरील वाढती पकड त्या अगोदर अमेरिकेची माघार ही घटना जागतिक राजकारणावरील प्रभाव टाकणारी आहे. अफगाणिस्तानला गेल्या कित्येक वर्षांपासून साम्राज्यवादी हस्तक्षेप आणि अंतर्गत यादवी युद्धाने पोखरून टाकले आहे.

अशात अफगाणी जनतेला नाममात्र लोकशाहीने जे थोडेफार अधिकार मिळाले होते ते सुद्धा अतिशय निर्घृणपणे चिरडण्यास साम्राज्यवादाने आणि धार्मिक कट्टरवादी संघटांनी धुमाकूळ घातला आहे.

या सर्व घटनेला समजून साम्राज्यवादी आणि धार्मिक कट्टरवादी तालिबानने गेल्या कित्येक वर्षांपासून अफगाणिस्तानला युद्धाने मैदान बनवले आहे. यात जनतेचे अधिकार चिरडले जात आहेत.

अशात भारतीय हिंदुत्ववादी फासिस्ट भारतीय जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी कशा पद्धतीने या मुद्द्याला तापत ठेवत आहेत. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Related posts

Leave a Comment

sixteen − 12 =