24 जून रोजी महानगरपालिका, राज्यसरकार आणि पोलीस प्रशासन यांनी मिळून आंबीलओढा वसाहतीतील जनतेवर अमानुष कारवाई केली. त्या दिवसानंतर नौजवान भारत सभा सर्व कामगार-कष्टकऱ्यांना घराच्या हक्कासाठी एकजूट बनवण्याचे आवाहन करत आहे. एस.आर.ए. चा कायदा शहरातील सर्व मध्यवर्ती भागांमध्ये लागू करून आडव्या झोपडपट्ट्या उभ्या करून मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे धोरण आता राज्य सरकार वेगाने पुढे रेटत आहे. आज ही आग बाजूच्या वस्तीमध्ये लागली असली तरी त्याचा वणवा अपल्यापर्यंतही पोहोचणार आहे आणि त्यासाठी वस्तीपातळीवर समित्या बनवून एकजूट करण्याचे आवाहन नौभासचे कार्यकर्ते दांडेकर पूल भागातील वस्त्यांमध्ये जाऊन करत आहेत. या अभियानामध्ये आंबीलओढ्यातील जनता सुद्धा सामील होत आहे. एकमेकांच्या लढ्यात उभे राहण्यासाठी अनेक कामगार कष्टकरी लोक पुढाकार घेत आहेत. जनतेचा एस.आर.ए. प्रकल्पाला विरोध नाही. घरासारख्या मूलभूत गरजेच्या शाश्वतीसाठी ‘जागीच घर बांधून दिले पाहिजे’ आणि ‘एका ठराविक कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे’ याची लेखी हमी बिल्डर आणि एस.आर.ए. ने द्यावी अशी जनतेची मागणी बनत आहे.
24 जून रोजी महानगरपालिका, राज्यसरकार आणि पोलीस प्रशासन यांनी मिळून आंबीलओढा वसाहतीतील जनतेवर अमानुष कारवाई केली
